Friday, March 8, 2013

Happy Womens Day

३ प्रेरणा www (वा-वू-वे) नेहमीच जगावर राज्य करीत आल्या आहेत. आणि  बहुतेकवेळा  दोन्ही प्रेरणांच्या मध्यस्थानी असलेली प्रेरणाच दोन्ही साठी कारणीभूत असते.अशी हि प्रेरणा पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली वर्षानुवर्षे चूल आणि मुल ह्या मध्येच  बंदिस्त राहिली असे चित्र काही वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर लक्षात येईल.पण आता शहरात तरी हे चित्र बदलत चालले आहे. शहरात स्त्री आणि पुरुष ह्यांच्यातील विषमतेचे अंतर कमी कमी होत चालले आहे परंतु दूर गावा कडे खेड्यांमध्ये अजूनही हे अंतर खूप आहे. शिक्षण नसणे आणि त्यामुळे आर्थिक दृष्ट्या पुरुषांवरच अवलंबून रहायची स्थिती आणि महिले कडे बघण्याचा समाजाचा एकूणच दृष्टीकोन ह्या स्थितीला जबाबदार आहे.पण हळू हळू हि परिस्थिती बदलेल. 
वरील दोन करणाव्यतिरिक्त आणखी एक सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे स्त्री हीच स्त्रीच्या मार्गात जास्त अडथळा निर्माण करत असते आणि ते सर्व मला मिळाले नाही मग तुला तरी का मिळावयास हवे ह्याच भावनेतून निर्माण झालेले असते. आणि हि भावना माझ्या मते working women मध्ये कमी असते असे माझे मत आहे.थोडक्यात न आवडणाऱ्या कामात जास्त काळ घालवावा लागला कि महिला असो वा  पुरुष अश्या प्रकारच्या नकारात्मक भावना निर्माण होणारच हेच सत्य आहे.


"पुरुष म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे सहनशक्ती "असे चित्र 
"स्त्री म्हणजे शक्ती आणि पुरुष म्हणजे सहनशक्ती "
होउनये म्हणजे झाले.

आपण नेहमी देशाची प्रगती GDP growth rate बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर
Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधायला हवे. आणि हि Happy Family Index वाढवायला सर्वात महत्वाची भूमिका स्त्रीच करू शकते. 

!!! महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा !!!






Thursday, February 28, 2013

My मराठी

मराठी राजभाषा दिनानिमित्त थोडे आपल्या मराठी भाषेबद्दल .अर्थात मराठी भाषेबद्दल अधिकारवाणीने बोलावे असे माझ्या जवळ  ती माझी मातृ भाषा आहे एवढेच प्रमाणपत्र आहे. ती कागदावर लिहितांना अजूनही माझ्याकडून शुद्ध लेखनाच्या खूप चुका होऊ शकतात हि वस्तुस्थिती आहे तरीपण मी कमीत कमी शुद्ध लेखनाच्या चुका करून माझे ब्लॉग मराठीत लिहू शकतो हि नवीन तंत्र ज्ञानाची कमाल आहे. त्या बद्द्ल सविस्तर तुम्ही खालील लिंकवर वाचू शकता .


आपल्या मातृभाषेशिवाय ज्या भाषेमुळे आपल्या  कारकिर्दीची वाढ होऊ शकते ती भाषा आपण शिकावयास हवी हि काळाची गरज आहे पण खर्या सुखाचा अनुभव  घेण्यासाठी मातृभाषेची जाण ठेवणे अनिवार्य आहे.
काही भावना कळायला भाषेची गरज नसते पण असे  नेहमीच घडत नसते समोरच्या व्यक्ती पर्येंत तुमच्या भावना पोहचवायला मातृभाषे सारखे दुसरे साधे सरळ सोपे साधन नसते. 
मी ह्या लेखाचे नाव मुद्दाम "My मराठी" असे लिहिले आहे कारण ती आजच्या आपल्या बोलीभाषेची खरी स्थिती आहे.जे घडते आहे ते चूक का बरोबर ह्या वादात मला पडायचे नाही.



मी १९९२ मध्ये  In Search Of Chyren असे शीर्षक असलेले एक पुस्तक प्रकाशित केले होते.
मी जेव्हा ते पुस्तक एका लेखन क्षेत्रातील संबधित असलेल्या व्यक्तीला दाखवायला गेलो तेव्हा पुस्तकाचे शीर्षक बघुन आणि मी जळगावचा आहे ह्या दोन मुद्द्यांवरून त्या पुस्तकात काहीच नाही हे त्याने पुस्तक न वाचता मत मांडले होते.

त्या पुस्तकातील काही लेख येथे देत आहे 



आत्मपरीक्षण - एक चिंतन


शेवटी एवढेच माझ्या अनुभवाचे बोल सांगेन .
मला पैसा संगणकाची भाषा शिकल्यामुळे आणि इंग्रजीचे ज्ञान असल्यामुळे मिळाला  आणि आनंद मातृभाषेत आपल्या लोकांशी संवाद साधून आणि मराठीत ब्लॉग लिहून मिळाला.

Wednesday, February 13, 2013

FDP - Faculty Development Program






मागच्या रविवारी Naralkar Institute येथे FDP- Faculty development program अंतर्गत ERP Implementaion ह्या विषयावर सेमिनार घेण्याची संधी मिळाली. शिकवायला मला मनापासून आवडते त्या मुळे तो रविवार एक आठवणीतला रविवार होऊन गेला. डॉ. दीपक शिकारपूर आणि त्यांच्या टीमने मिळून हा जो  FDP - Faculty Development Program सुरु केला आहे  तो खरोखर खूप स्तुत्य उपक्रम आहे आणि  ती काळाची एक गरज आहे.  ह्या उपक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या संस्थेतील शिक्षक, डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. शिरुडे , डॉ. एकनाथ खेडकर , डॉ.इनामदार , डॉ. शिंपी  ह्या शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तीशी भेटण्याचा योग आला आणि त्या निमित्ताने विचारांची देवाण घेवाण झाली आणि तो रविवार खरोखरच एक  knowledge sharing रविवार म्हणून कायम आठवणीत राहील .

FDP @ Naralkar Institute- Photo Link

Notes to Share


  • मला आवडलेले काही विचार
  • Balancing Your Life
  • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
  • Mentor , गुरु आणि Friend
  • How to be happy in Any Job
  • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
  • जागृतीचा एक क्षण
  • शोध
  • आणि मी तिला सोडले आणि बरेच काही 
  • आत्मपरीक्षण - एक चिंतन
  • मर्यादेचे महत्व आणि कर्मयोग
  • वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही
  • चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस
  • आणि वाल्याचा वाल्मिकी झाला 
  • Happy Family Index
  • My मराठी
  • Meet, Discuss and ask. पुछनेमे में क्या जाता है!
  • स्वदेश
  • EveryDay Exercise - एक प्रात्यक्षिक सुरुवात



  • Sunday, January 27, 2013

    Real story of a Phoenix Plant





    हि गोष्ट आहे वर चित्रात दाखविलेल्या रोपट्याची . मला ते माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून आमच्या कंपनी कडून (Fluent India ) सन २००२ मध्ये मिळाले होते. घरातील एका कुंडीत मी ते लावले . त्या वेळेस मी माझ्या जुन्या फ्लाट मध्ये राहत होतो . साधारण एक वर्ष ते टिकले. घरात असल्या मुळे म्हणा किंवा कदाचित पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे म्हणा पण ते कोमेजुन गेले आणि आमच्या दृष्टीने ते मरण पावले  .मग त्या कुंडीत दुसरे कोणतेच झाड लावले नाही आणि त्या कुंडीचा  उपयोग फक्त उदबत्ती लावण्या साठी होऊ लागला . त्यानंतर २००६ मध्ये आम्ही आमच्या नवीन फ्लाट मध्ये आलो . त्याला असलेल्या सुंदर टेरेस मध्ये आमच्या कुंड्या ठेवल्या. त्यात हि रोप नसलेली पण उदबत्तीची राख असलेली कुंडी पण होती.
    .
    ..आणि एक दिवस चमत्कार झाला राख असलेल्या त्या कुंडीतून त्या कोमेजुन गेलेल्या आमच्या दृष्टीने मरण पावलेल्या रोपट्याने पुन्हा जन्म घेतला बघता बघता ते वाढू लागले बहरू  लागले आणि त्याला चक्क सुंदर फुले येऊ लागली. मला त्या रोपाचे नाव माहित नाही म्हणून मी त्याला Phoenix Plant म्हणतो.


    Sunday, January 20, 2013

    एक विचार १२ रात्री


    • चांगले खेळणे / Gadget मिळावे
    • चांगले मार्क्स अथवा चांगला score मिळावा 
    • चांगल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न व्हावे 
    • चांगली नौकरी मिळावी 
    • स्वतःचे चांगले घर असावे
    • मुलांना चांगली शाळा ,चांगले विद्यालय मिळावे 
    • चांगली health, figure (36-24-36)  मिळवावी
    • सध्याची जे काही आहे त्यापेक्षा आणखी चांगले मिळावे 
    • स्वतःचा business असावा
    • आहे तो business आणखी वाढवावा 

    • तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही वयाच्या वळणावर असाल वरील पैकी एक विचार तुमच्या मनात घर करून बसलेला असतो आणि नसेल तर सगळे विचार करून प्रयत्न करून करून तुम्ही शेवटच्या विचारापर्येंत पोहोचलेले असतात ...
    एक साधे सरळ सोपे सुखी आयुष्य असावे

    तुमचा विचार आणि ध्येय  विस्तारित करून तुम्ही तुमच्या मनाच्या पटलावर तुमच्या इच्छाशक्तीच्या पेनाने लिहून काढा आणि झोपण्यापूर्वी रोज त्याचे आकलन  करा असे म्हणतात १२ रात्री हा नियम तुम्ही पाळला तर तुमचा विचार प्रत्यक्षात येतो.
    (अर्थात  त्याला तुमच्या कर्मयोगाची साथ असेल तर....!!!)
    So try it to enjoy better life

    अगर लगन सच्ची हो और इरादा पक्का हो तो 
    Nothing is Impossible...


    Sunday, December 16, 2012

    एक धुंद से आना हैं एक धुंद में जाना हैं !



    ह्या आठवड्यात १४-डिसेंबर-२०१२ ला पडलेल्या दाट धुक्याने मला धुंद चित्रपटातील साहीर लुधियानवी ह्यांनी लिहिलेल्या आणि रवि यांनी संगीत बद्ध केलेल्या गाण्याची आठवण झाली. मला आवडणाऱ्या काही philosophical सुंदर गाण्यां पैकी हे एक अप्रतिम गाणे
    संसारकी की हर शय का इतनाही फ़साना हैं 
    एक धुंद से आना हैं एक धुंद में जाना हैं !

    ये राह कहाँ से हैं ये राह कहाँ तक हैं 
    ये राज़ कोई राही समझा हैं न जाना हैं !

    एक पल की पलक पर है ठहरी हुई ये दुनिया 
    एक पल के झपकने तक हर खेल सुहाना हैं !

    क्या जाने कोई किस पल किस मोड़ पर क्या बीते 
    इस रह में ऐ राही हर मोड़ बहाना हैं !






    Saturday, December 8, 2012

    SAVE Water SAVE life



    Do one thing Each Day that will save water

    अशी एक गोष्ट रोज करा ज्याने पाणी वाचेल.
    त्यापैकी एक म्हणजे फक्त लघवीला गेल्यानंतर पूर्ण फ्लश वापरून आपण जे पाणी वाया घालवतो आहे ते कमी  फलश वापरून किंवा  मगने पाणी ओतून आपण किती तरी पाणी वाचवू शकतो.
    विचार करा आणि रोजची तुमची सवय बदला. 
    तुमची एक साधी सवय किती तरी पाणी वाचवू  शकते.
    Why does the toilet "flush" when you pour a mug of water into it? Or use half-flush and save water.
    खरे म्हणजे बिल्डर आणि राजकारणी मिळून मोठ मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स बांधतांना ह्या गोष्टीचा विचार करून त्या दृष्टीने 
    आधीच पाऊले उचलू शकतात . त्या दृष्टीने आधीच तशे Toilets दिले तर तो  अधिक योग्य उपाय असू शकतो.
    मला असे वाटते   मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स ला परवानगी देण्यापूर्वी सरकार जर खालील गोष्टी बंधनकारक करेल तर भविष्यात 
    भेडसावणारा पाण्याचा प्रश्न आपण कमी करू शकू.
    1)Toilets with water saving facilities.  Example: Half flush facility.
    2)Dual Plumbing system  & water harvesting for reuse of water


    More tips to Save Water


    There are a number of ways to save water, and they all start with YOU.
    • Check all faucets, pipes and toilets for leaks.
    • Install water saving showerheads and ultra-low-flush toilets.
    • Take shorter showers.
    • Never use your toilet as an ashtray or wastebasket.
    • Turn off the water while brushing your teeth or shaving.
    • Instead of cleaning terrace everyday with pouring water by Buckets clean  it with wet cloth.
    • बादल्या  ओतून रोज टेरेस धुण्यापेक्षा अधून मधून ओल्या फडक्याने पुसायची सवय लावा !
    • तुमच्या बाईला समजावून तुम्ही कितीतरी पाणी वाचवू  शकतात.
    Save water it will save you later!