Friday, March 8, 2013

Happy Womens Day

३ प्रेरणा www (वा-वू-वे) नेहमीच जगावर राज्य करीत आल्या आहेत. आणि  बहुतेकवेळा  दोन्ही प्रेरणांच्या मध्यस्थानी असलेली प्रेरणाच दोन्ही साठी कारणीभूत असते.अशी हि प्रेरणा पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली वर्षानुवर्षे चूल आणि मुल ह्या मध्येच  बंदिस्त राहिली असे चित्र काही वर्षापूर्वीचा इतिहास बघितला तर लक्षात येईल.पण आता शहरात तरी हे चित्र बदलत चालले आहे. शहरात स्त्री आणि पुरुष ह्यांच्यातील विषमतेचे अंतर कमी कमी होत चालले आहे परंतु दूर गावा कडे खेड्यांमध्ये अजूनही हे अंतर खूप आहे. शिक्षण नसणे आणि त्यामुळे आर्थिक दृष्ट्या पुरुषांवरच अवलंबून रहायची स्थिती आणि महिले कडे बघण्याचा समाजाचा एकूणच दृष्टीकोन ह्या स्थितीला जबाबदार आहे.पण हळू हळू हि परिस्थिती बदलेल. 
वरील दोन करणाव्यतिरिक्त आणखी एक सगळ्यात महत्वाचे कारण म्हणजे स्त्री हीच स्त्रीच्या मार्गात जास्त अडथळा निर्माण करत असते आणि ते सर्व मला मिळाले नाही मग तुला तरी का मिळावयास हवे ह्याच भावनेतून निर्माण झालेले असते. आणि हि भावना माझ्या मते working women मध्ये कमी असते असे माझे मत आहे.थोडक्यात न आवडणाऱ्या कामात जास्त काळ घालवावा लागला कि महिला असो वा  पुरुष अश्या प्रकारच्या नकारात्मक भावना निर्माण होणारच हेच सत्य आहे.


"पुरुष म्हणजे शक्ती आणि स्त्री म्हणजे सहनशक्ती "असे चित्र 
"स्त्री म्हणजे शक्ती आणि पुरुष म्हणजे सहनशक्ती "
होउनये म्हणजे झाले.

आपण नेहमी देशाची प्रगती GDP growth rate बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर
Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधायला हवे. आणि हि Happy Family Index वाढवायला सर्वात महत्वाची भूमिका स्त्रीच करू शकते. 

!!! महिला दिनाच्या सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा !!!


No comments: