Sunday, November 27, 2016

भावनांचा तू भुकेला रे मुरारी

कधी कधी मनात उठलेल्या भावनांचे कल्लोळ कोणत्याच शब्दात व्यक्त करता येत नाही 
तेव्हा 
मौन हि एक उत्तम साधना असते  , किंवा तुम्ही  नशीबवान असाल तर तुम्हाला पूर्ण नाही पण काही अंशी ओळखणाऱ्या  आणि तुमच्यावर निर्मळ  प्रेम करणाऱ्या व्यक्ती कडून मिळालेली "जादूकी झप्पी (Magical Happy Hug)" उत्तम उतारा असतो पण करोडो व्यक्ती आजूबाजूला असतांना असे भावनांचे बांध जोडायला  आणि असा "भावनांचा मुरारी मित्र किंवा राधा  " शोधायला आनंद सिनेमामधील आनंद सारखे सुंदर मन आणि प्रयत्नही लागतात. 

अश्याच सुंदर भावना असलेले हे एक सुंदर गीत   
"भावनांचा तू भुकेला रे मुरारी "





भावभोळया भक्तीची ही एक तारी
भावनांचा तू भूकेला रे मुरारी

काजळी रात्रीस होसी तूच तारा
वादळी नौकेस होसी तू किनारा 
मी तशी आले तुझ्या ही आज दारी 

भाबडी दासी जनी, गाताच गाणी 
दाटून आले तुझ्या डोळयात पाणी 
भक्तीचा वेडा असा तू चक्रधारी


शापिलेली ती अहिल्या मुक्त केली 
आणि कुब्जा स्पर्श होता दिव्य झाली
वैभवाचा साज नाही मी भिकारी 

अंतरीची हाक वेडी घालते रे 
वाट काट्यांची अशी मी चालते रे
जाणिसी माझी व्यथा ही तूच सारी


गीतकार : मंगेश पाडगांवकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : श्रीनिवास खळे