Friday, May 5, 2023

Parrot visited 4th time to our house

 


आज परत एकदा पोपट आमच्या घरी चौथ्यांदा आला.  



२१ ऑक्टोबर २०२१ ला एक पोपट सरळ घरात आला आणि हर्षद च्या  केसांना स्पर्श करून घरात बेसिन वर बराच वेळ बसला  आणि त्या नंतर ज्या खिडकीमधून तो आला होता त्याच खिडकीमध्ये कितीतरी वेळ बसून होता . 




१५-ऑक्टोबर २०२१ ला मीना अचानक दसऱ्याच्या दिवशी आम्हाला सोडून गेली त्या नंतर लगेच हा प्रसंग घडला . 




त्या नंतर बरोबर एक  वर्षा  नंतर  वर्ष श्राद्धाला पोपट बाल्कनी मध्ये आला होता. 


त्या नंतर आता मागच्या आठवड्यात हर्षद रात्रभर खोकल्यामुळे जागा होता तेव्हा सकाळी ३ पोपट खिडकीमध्ये बसून प्रियंकाला उठवून गेलेत . 




आणि आज तर आकस्मित घडले. 

आज सकाळी आम्ही अभिषेक बरोबर  वीडियो कॉल  वर होतो आणि त्यात मीनाची खूप आठवण काढली 

आणि संधयाकाळी  आभाळ भरून आले होते म्हणून प्रियांका बाल्कनी मध्ये गेली आणि तिने मला आवाज दिला . मी बाल्कनी मध्ये  जाऊन आभाळ बघितले आणि  परत घरत आलो . प्रियंकाने परत आवाज दिला आणि ह्या बाजूचे आभाळ बघा म्हणून मला बोलावले मी परत गेलो आणि आमचे हे सगळे बोलणे  तो पोपट शांतपणे बसून ऐकत होता पण उडून गेला नाही.  




त्यांनतर आमचे त्या पोपटा  कडे लक्ष गेले .

प्रियांका म्हणाली बाबा फोटो काढा,

मी हा फोटो काढला. त्या नंतर त्या पोपटा बरोबर एक सेल्फी घ्यावी अशी मला खूप इच्छा झाली आणि मी वळून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होतो तर चमत्कार झाला . तो पोपट सरळ माझ्या पाठीवर येऊन बसला . 

प्रियंकाने माझ्या हातून फोन घेतला आणि  खूप फोटो आणि विडिओ घेतला. 

बराच वेळ माझ्या पाठीवर बसून माझ्या गालाला पण त्याने छान  स्पर्श केला. आणि त्या नंतर 

जाताना प्रियंकाला स्पर्श करून थँक यू  म्हणून तो उडून गेला. 

 आमच्या साठी ती पोपट मैना म्हणजे आमची मीनाचा आहे. 

आणि त्या परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद जो  आम्हाला त्याच्या अद्भुत चमत्काराचे साक्षीदार बनवतो. 



 




Wednesday, March 22, 2023

चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस




चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस. सृष्टी निर्मिती हा विचारच मनात अनेक प्रश्नं आणि कुतुहुल निर्माण करून जातो. हि सृष्टी कशी निर्माण झाली असेल , फक्त मानवच ह्या पृथ्वीवर येवढा प्रगत कसा झाला . मानव विचार केव्हा करायला लागला . हजोरो वर्षापूर्वी मानवाच्या मनात आलेला विचार मला आजही अंतर्मुख करतो 

सृष्टि निर्माण होण्या पूर्वी सत असत नव्हते
अन्तरिक्ष पण नव्हते अणि आकाशही नव्हते 
पण असे काय लपले होते कोणी कोणाला झाकले होते. 
त्यावेळेस अगम असे पाणीही नव्हते. 


गणितातली अत्यंत कठीण गणिते आपण 'क्ष' मानून सोडवतो. 'क्ष'ला तशी किंमत नसते. पण त्याच्या मदतीशिवाय गणित सुटत नाही.
शेवटी आपल्याला उत्तर सापडल्यावर मानलेला 'क्ष' नामानिराळा होतो. मग जीवनातल्या अवघड समस्या व न सुटणारी कोडी सोडवण्यासाठी लोकांनी हा हातचा 'क्ष' म्हणजे देव मानायला सुरुवात केली असावि. मग कोणी X , कोणी Y तर कोणी Z अशी वेगवेगळी नावे देऊन आपापली उत्तरे शोधू लागलेत. 

परमेश्वर आहे का ?श्रद्धा असावी का ?
श्रद्धा आणि अंधविश्वास ह्याला विभागणारी सूक्ष्म रेषा म्हणजे काय?

ह्याचे खरे उत्तर कुणाकडेही नाही पण मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून एवढेच सांगावेसे वाटते

"श्रद्धा हि असावीच लागते मग ती दगडाच्या ठिकाणी का असेना"
"शून्याची किंमत मानावीच लागते जरी ते शुन्य का असेना "



"Om Poornam Adah Poornam Idam

Poornaat Poornam Udachyate

Poornasya Poornam Aadaay 

Poornam Evaa Vashishyate" 



 पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते

पूर्णश्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥

 शान्तिः शान्तिः शान्तिः ॥


Infinity minus infinity equal to infinity




जीवनातल्या अवघड समस्या सोडवण्यासाठी हा हातचा 'क्ष' किंवा देव मानला, तर जीवनाच्या बऱ्याच समस्या चिंतेशिवाय आनंदाने सूटू शकतात.

असो हि सृष्टी निर्माण करणारा कुणी आहे का नाही पण तुमचे स्वतःचे जग मात्र तुम्हालाच निर्माण  करायचे असते हे मात्र खरे.
त्या साठी साडेतीन मुहूर्तातील हा एक मुहूर्त चुकवू नका .

!!!कल करे सो आज कर आज करे सो अभी !!!



!!! तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!

⛳⛳गुढीपाडवा व मराठी नूतन वर्षाच्या  आपणास व आपल्या परीवारास हार्दिक शुभेच्छा...!!!⛳⛳




Learngeeta – ॥ गीता पढ़ें, पढ़ायें, जीवन में लायें