वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही
वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय ? असा मी माझ्याच मनाला प्रश्न विचारला तर उत्तर आले "भारत देशाच्या लोकशाहीवर आधारित घटनेच्या चौकटीत बसणारी आपण निवडलेली जीवन जगण्याची पद्धत म्हणजे आपले वैयक्तिक स्वातंत्र्य" पण ते वैयक्तिक स्वातंत्र्य जगतांना तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ह्याचे भान ठेवावयास हवे.
Consider the rights of others before your own feelings, and the feelings of others before your own rights. John Wooden
देशाच्या घटनेच्या चौकटीत तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची चौकट बसावितांना तुम्हाला आणखी एका चौकटीचा विचार करावा लागतो ती म्हणजे तुमच्या जन्मामुळे तुम्हाला मिळालेली सामाजिक चौकट. तिचे
अस्तित्व मानायचे कि नाही हे सर्वसी तुमच्यावर अवलंबून असते आपल्या घटनेने तेवढे अधिकार आपलाल्या दिले आहेत ह्यावरच आपली घटना किती चांगली आणि उच्च प्रतीची आहे ह्याची तुम्हाला आज नाही पण काही वर्षानंतर नक्कीच प्रचीती येईल. चीन प्रगती करतो आहे आणि आपणही Developing Countries च्या शर्यती मध्ये आहोत पण माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे. सध्या विश्वास बसायला अवघड जाईल पण येणारा काळ नक्कीच ह्याचे होकारात्मक उत्तर देईल.
घटना म्हणजे नियम आलेच आणि नियमा बद्दल मागील एका ब्लॉग मध्ये मी माझे विचार लिहिले आहेतच.
"नियम हे समाज सुधारणे साठी समाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक नियमात एक पळवाट लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते."
असाच एक "सहकार" कायदा ज्याचा खरा उद्देश खूप चांगला पण "मिल बाटके खाव" वृत्तीने पार वाट लागून वाया गेलेली एक चळवळ. Professional, Attitude ह्या नावाखाली आत्मकेंद्रित झालेल्या तरुण पिढीला तर सहकार ह्या बद्दल किती माहिती असेल ह्याबद्दल शंकाच वाटते. पण सहकारात जो सावळा गोंधळ चाललेला असतो ते बघून त्यांची अनास्था योग्यच वाटते.पण हे चित्र बदलायला हवे आणि सरकारने उचललेल्या पाउलास आपण योग्य प्रतिसाद देऊन एक आशावादी चित्र निर्माण करावयास हवे.
अर्थात सोशल मीडिया , सोशल एंटरप्राइज ,सोशल बिझनेस हि सगळी सहकाराची २१ व्या शतकातील नवीन रूपे आहेत आणि तरुण पिढी ती आत्मसात करीत आहेत किंवा नसेल तर त्यांनी नक्कीच त्याबद्दल माहिती करून घ्यावीत. काळाच्या ओघात परिस्थिजन्य बदल हे आवश्यकच असतात टिकून आणि तग धरून राहण्या साठी .