Sunday, September 30, 2012

PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना...

झाडे लावा झाडे लावा असे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत पण फक्त झाडे लावल्यामुळे आपले कर्तव्य संपते असे नाही. झाडे लावल्यानंतर ती जगवणे जास्त महत्वाचे असते . त्या साठी काही महिने काही वर्ष ती झाडे स्वावलंबी होई पर्येंत त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. जी गोष्ट आपल्या मुलांसाठी लागू होते आणि आपण आपले कर्तव्य म्हणून पार पडतो तशीच काळजी आपण झाडांची घ्यावयाची असते.

आमच्या सोसायटीच्या मागे टेकडी आहे त्या टेकडीवर एक हनुमान मंदिर आहे आणि बरीच मंडळी सकाळ संध्याकाळ ह्या टेकडीवर झाडे लावून त्यांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात. ह्या पावसाळ्यात

मी पण त्या टेकडीवर १५ झाडे लावली आहेत. आणि झाडे लावण्याचे एक तंत्र मी ह्या मंडळीन कडून शिकलो आहे. झाड लावताना खोल खड्डा खणल्या नंतर त्या झाडा शेजारीच ते एक बुड कापलेली बाटली

लावावी. मग रोज टेकडीवर फिरायला येतांना पाण्याच्या बाटल्या घेवून याव्यात आणि ह्या बाटलीत ते पाणी घालावे म्हणजे कमी पाणी झाडाच्या मुळा पर्येंत पोहचण्याची सोय होते आणि कमी पाण्यात झाडे जागविता येतात.

तर तुम्हीपण फिरायला जातांना पाण्याची बाटली बरोबर घेऊन जात जा आणि काही झाडे दत्तक घेउन त्यांना
स्वावलंबी होई पर्येंत वाढवण्याची जबाबदारी स्वीकारा. मी ह्याला PSR - Personal Social Responsibility असे म्हणतो.

हाच नियम मूला - मुलींसाठी सुद्धा लागू पडतो . तुमची मुले स्वावलंबी होई पर्येंत त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आपले कर्तव्य असते. आणि आता तर फक्त चांगल्या विद्यालयातून चांगली डिग्री मिळवली म्हणजे नौकरी मिळेल असे चित्र आता राहिले नाही. चांगल्या डिग्री सोबत नवीन अद्यावत कौशल्ये शिकणे (Adding additional current new skill sets to our resume) हि काळाची गरज झालेली आहे. ईश्वर कृपेने माझा IT - Information technology क्षेत्रात चांगला अनुभव झाला आहे. तोच अनुभव आणि ज्ञान नवीन तरुण पिढीशी Share करावे हे माझ्या PSR (Personal Social responsibility) मधील एक Target असेल.

तर तुम्ही पण तुमचे PSR Target ठरवा आणि पूर्ण करा.


दिनांक :५-ऑक्टोबर-२०१२
जनहित याचिका

काल टेकडीवर गेलो असतांना एका विचित्र घटनेने मन विचलित झाले.
आमच्या मागील हनुमान टेकडीवर सेवाभावी मंडळींनी झाडांच्या शेजारी मुळा पर्येंत पाणी झीरपण्यासाठी बुड कापून लावलेल्या ३0-३५ बाटल्या कुणी तरी काढून टाकल्या होत्या.
प्रथम मला वाटले हे भंगारवाल्यांचे काम असावे. पण नंतर असेही कळले कि हे टेकडी स्वच्छ करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे पण काम असू शकते. आणि तसे असेल तर त्या सेवाभावी संस्थेचे जाहीर कौतुकच करावयास हवे. टेकडी प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी त्यांना फक्त नेमक्या त्याच
३०-३५ बाटल्या दिसल्या ह्या बद्दल ते जाहीर सन्माना साठी नक्कीच लायक आहेत. त्या व्यतिरिक्त तेथे पडलेला दुसरा कचरा त्यांना दिसला नाही. तर तुम्हाला ह्या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यान बद्दल काही माहिती असेल किंवा त्यांना माहिती देणार्यान बद्दल काही माहिती असल्यास त्वरित कळवावे

त्या सेवाभावी माणसाला मला एक सुचवावेसे वाटते कि बाटल्या काढून टाकण्या ऐवजी बाटल्या लावणाऱ्या सेवाभावी लोकांना झाडे जगल्यानंतर काही महिन्यांनी बाटल्या काढून टाकाव्यात अशी सूचना केली असती तरी समजण्या सारखे होते.
पण....असो.


देव तारी त्याला कोण मारी.

सकाळ पासून पडणारा उत्तम पाउस झाडांना जागविण्या साठी पुरेसा आहे.काही लोक नियमांचा उपयोग फक्त लोकांना त्रास देण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठीच करतात
तर काही लोक नियम धाब्यावर बसवून लोकांच्या भल्यासाठी काम करतात. ह्या पैकी योग्य अयोग्य हे ठरविणारी रेषा खूप सूक्ष्म असते.

नियम ह्यामधील जो "यम" आहे तो कधीच बदलत नसतो "नियम" मात्र कालानुरूप बदलत असतात. खरे बघितले तर नियम हे समाज सुधारणे साठीसमाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक नियमात एक पळवाट लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते.


Sunday, September 23, 2012

जागृतीचा एक क्षण


आपण जन्मलो हे एक सत्य आहे आणि एक दिवस हे जग सोडून जाणार ज्याला मृत्यू म्हणतात ते एक सत्य आहे. ह्या दोन सत्य क्षणांना जोडणारी तुमची आयुष्य रेषा किती विविध घटनांनी एका चित्रपटाप्रमाणे
भरलेली असते ते सिंहावलोकन करतांना तुम्हाला नक्कीच जाणवेल. खूप वर्षापूर्वी मेल्यानन्तरच्या स्वर्गाची कल्पना दाखवून काही लोकांनी खूप लोकांना रिझविले परंतु काही जाणत्या माणसांनी मरणा
आधीच ह्या जन्मी ह्या देही स्वर्गीय सुख उपभोगायची व्यवस्था निर्माण केली. फक्त तिच्या पर्येंत पोहचण्यासाठी तुम्हाला हवा असतो जागृतीचा एक क्षण. जागृतीचा तो एक क्षण तुमचे आयुष्यच बदलवू शकतो.

ह्या जागृतीच्या एका क्षणाच्या वळणावर तुमच्या घडून गेलेल्या आयुष्याचे सिंहावलोकन करतांना एक गोष्ट तुम्हाला मान्यच करावी लागते ती म्हणजे तुमच्या आयुष्यात पैश्याचे असणारे महत्व.
पैसा म्हणजे पाप तुमच्या अंतिम ध्येयात अडथळा निर्माण करणारे एक साधन असे सांगणारे तथा कथित गुरूंचे संपत्तीचे साम्राज्य तुम्ही बघितले तर त्याच्या विधानातील फोलपणा तुम्हाला नक्कीच कळेल.
पण ह्याचा अर्थ पैसा म्हणजेच सर्वस्व असाही होत नाही म्हणून तर म्हटले आहे.

"कहते हैं पैसा खुदा तो नहीं हैं
मगर खुदासे से कम भी नहीं हैं"

थोडक्यात तुमच्या त्या इच्छित स्वर्गीय सुखापार्येंत पोहचण्याचे पैसा एक साधन नक्कीच होऊ शकते.फक्त पैश्या सोबत तुम्हाला हवा असतो समंजसपणा आणि व्यवहार ज्ञान.
समंजसपणा आणि व्यवहार ज्ञान गुण आत्मसात करायला आयुष्यातील बरेच उन्हाळे पावसाळे खर्च करावे लागतात म्हणून तर कोणीतरी अनुभवाचे बोल म्हटले आहे.

"Real life starts after 40"
४० हा एक सामायिक नंबर म्हणता येईल. व्यक्ती आणि त्याचा आयुष्यरेषेनुसार त्याचे स्थान बदलू शकते. पण अश्या भावनेच्या जागृतीलाच आयुष्यातील तो एक जागृत क्षण म्हणता येईल आणि ज्याने त्याने तो आप आपला ठरवायचा असतो किंवा न ठरवताही आयुष्य जगता येतेच .

"You only live once but if you live it right once is enough"
"तुम्ही आयष्य एकदाच जगतात पण ते योग्य पद्धतीने जगलात तर एकदाच मिळालेले हे आयुष्यही पुरेसे असते "


आपण योग्य पद्धतीने आयुष्य जगतो आहे का हे तुम्ही तुमच्या 3 गोष्टी तपासून ठरवु शकतात
१)तुम्हाला तुमचे ८ तासाचे काम आवडते काय?
२)काम केल्यानंतर तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी तुमच्याजवळ पुरेसा वेळ आहे का?
३)तुमच्या जवळ स्वकष्टाचा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे का?

फक्त पुरेसा पैसा आणि गरजा मोजण्यासाठी स्वतःचे योग्य माप वापरा!
दुसऱ्याच्या मापाने तुमचे गणित सोडवू नका!

जर उत्तर नाही असेल तर पुन्हा प्रयत्न करा...
आणि तूमच्या जवळ कामच नसेल तर मत देण्यापूर्वी ३ वेळा विचार करा..
3 things to cross check if we are enjoying GOOD LIFE...
1)Are you enjoying your 8 hr work?
2)Do you have enough time to spend with your family and friends?
3)Do you have hard earned ENOUGH MONEY to fulfill all your REQUIREMENTS?

Just use the right units for ENOUGH MONEY and REQUIREMENTS and answer will return TRUE to you...

Don't use other's UNIT to solve your math.
If answer is false try hard and re-analyze your requirements..

If you don’t have work then think thrice while voting....


आत्मपरीक्षण एक चिंतन
Saturday, September 1, 2012

Guide..The movie

गाईड हा माझा all time favorite चित्रपट आहे .R.K. Narayanan ह्यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा . खास करून नवीन पिढीने जुन्या पिढीतील हा चित्रपट न बघणारा विरळाच . मानवी आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उताराचे अतिशय सुंदर चित्रण ह्या चित्रपटाद्वारे बघायला मिळते . मनाला पडणारे प्रश्न देव आहे का नाही ,श्रद्धा असावी का नसावी ह्याचे समर्पक उत्तर तुम्हाला ह्या चित्रपटात बघायला मिळेल .

सरळ मार्गाने जीवन जगणारा राजू गाईडच्या आयुष्यात अपघाताने लग्न झालेली रोजी येते .रोजी एका श्रीमंत म्हाताऱ्या archaeologist मार्को ची पत्नी असते .आपल्या शोध कार्यात मग्न असणाऱ्या मार्कोला रोजी
कडे लक्ष द्यायला वेळ नसतो .

रोजी एका वेश्येची सुंदर मुलगी असते आणि आपल्या मुलीने ह्या
वेश्या व्यवसायात राहू नये म्हणून तिच्या आईने तडजोड स्वीकारून हे लग्न जुळवलेले असते .

रोजीला नृत्याची खूप आवड आहे ह्याची जाणीव राजू गाईडला एकदा फिरत असतांना उत्स्फूर्त पणे रोजीने केलेल्या नृत्यावरून येते .एकदा रोजी मार्को च्या दुर्लक्षित स्वभावाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण राजू गाईड एक मित्र म्हणून तिला सावरतो आणि तिच्या हक्काची जाणीव करून देतो .परंतु रोजीला जेव्हा मार्कोच्या बाहेरख्याली पणाची जाणीव होते तेव्हा ती त्याला सोडून सरळ राजू गाईडच्या घरी येते . पण मध्यम वर्गीय राजू गाईडचे घर सामाजिक दबावा मुळे तुटते . राजू गाईडचा मामा आईला घेऊन निघून जातो .हा धक्का सहन करून राजू गाईड रोजी बरोबर नवीन प्रवास सुरु करतो . तिच्या अंगात असलेल्या नृत्याच्या कलागुणांना त्याचे मार्केटिंग गुण वापरून तो एका प्रतिष्ठित उंचीवर पोहोचवतो .
परंतु पैश्या सोबत मित्राच्या संगतीमुळे दारू आणि जुगाराचे राजू गाईडला लागलेले व्यसन दोघांमध्ये थोडा दुरावा निर्माण करते .
दिल के मेरे पास हो इतने
फिर भी हो  कितनी दूर
तुम मुझसे में दिल  से परेशान
दोनों है मजबूर
ऐसे में किसको कौन मनाये
दिन ढल जाए हाय रात न जाए
तू तो  न  आये तेरी याद सताए
अश्या मनस्थितीत मार्को कडून आलेली दागिन्याची भेट जी तिच्या सहीमुळे तिला मिळणार असते ,राजू गाईडला अस्वस्थ (insecure) करते . परंतु मार्कोच्या ह्या भेट वस्तूची कल्पना रोजीला नसते .
रोजीला मार्कोची परत आठवण होऊ नये म्हणून in-secured राजू गाईड रोजीची खोटी सही कागदपत्रांवर करतो आणि फसतो . त्याला जेलमध्ये जावे लागते आणि रोजीच्या नजरेतून तो पूर्णपणे उतरतो .
त्यावेळेस त्याने म्हटलेला dialogue खूपचं छान आहे .


रोजी  समज़ रहा था दुनिया समजे न समज़े पर रोजी जरुर समज जाएगी पर हाय ये समज भी कितनी नासमज़ निकली"

"चलो सुहाना भरम तो टूटा जाना के हुस्न क्या हैं
कहती हैं जिस को प्यार दुनिया क्या चीज क्या बला हैं "जेल मधून बाहेर आल्या नंतर कुठे जावे ह्या संभ्रमात राजू गाईड एका गावात येवून पोहचतो आणि एका मंदिरात राहायला लागतो . खूप अनुभवी आणि शिक्षित असलेल्या राजू गाईडच्या विवेकी कथा ऐकून गावकरी त्याला महात्मा समजू लागतात आणि एके वर्षी त्या गावावर दुष्काळाचे सावट येते ....
अश्या दुष्काळ ग्रस्थ परिस्थितीत एका गावकरयाच्या गैरसमजुतीतून राजू गाईड पाउस पडे पर्येंत आमरण उपवास करणार आहे असा गैरसमज गावात पसरतो आणि त्यांच्या अंध श्रद्धे पुढे झुकून राजू गाईडला उपवासाला बसावे लागते 


राजू गाईडच्या ह्या उपवासाची गोष्ट गावोगाव पसरते आणि असंख्य लोक ह्या महात्म्याच्या दर्शन साठी गर्दी करू लागतात आणि तेथे त्याची सोडून गेलेली आई आणि रोजी पण येते . त्यावेळेस त्याच्या मनातील द्वंद्व शब्दात वर्णन करणे अशक्य .....