Friday, May 5, 2023

Parrot visited 4th time to our house

 


आज परत एकदा पोपट आमच्या घरी चौथ्यांदा आला.  



२१ ऑक्टोबर २०२१ ला एक पोपट सरळ घरात आला आणि हर्षद च्या  केसांना स्पर्श करून घरात बेसिन वर बराच वेळ बसला  आणि त्या नंतर ज्या खिडकीमधून तो आला होता त्याच खिडकीमध्ये कितीतरी वेळ बसून होता . 




१५-ऑक्टोबर २०२१ ला मीना अचानक दसऱ्याच्या दिवशी आम्हाला सोडून गेली त्या नंतर लगेच हा प्रसंग घडला . 




त्या नंतर बरोबर एक  वर्षा  नंतर  वर्ष श्राद्धाला पोपट बाल्कनी मध्ये आला होता. 


त्या नंतर आता मागच्या आठवड्यात हर्षद रात्रभर खोकल्यामुळे जागा होता तेव्हा सकाळी ३ पोपट खिडकीमध्ये बसून प्रियंकाला उठवून गेलेत . 




आणि आज तर आकस्मित घडले. 

आज सकाळी आम्ही अभिषेक बरोबर  वीडियो कॉल  वर होतो आणि त्यात मीनाची खूप आठवण काढली 

आणि संधयाकाळी  आभाळ भरून आले होते म्हणून प्रियांका बाल्कनी मध्ये गेली आणि तिने मला आवाज दिला . मी बाल्कनी मध्ये  जाऊन आभाळ बघितले आणि  परत घरत आलो . प्रियंकाने परत आवाज दिला आणि ह्या बाजूचे आभाळ बघा म्हणून मला बोलावले मी परत गेलो आणि आमचे हे सगळे बोलणे  तो पोपट शांतपणे बसून ऐकत होता पण उडून गेला नाही.  




त्यांनतर आमचे त्या पोपटा  कडे लक्ष गेले .

प्रियांका म्हणाली बाबा फोटो काढा,

मी हा फोटो काढला. त्या नंतर त्या पोपटा बरोबर एक सेल्फी घ्यावी अशी मला खूप इच्छा झाली आणि मी वळून सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होतो तर चमत्कार झाला . तो पोपट सरळ माझ्या पाठीवर येऊन बसला . 

प्रियंकाने माझ्या हातून फोन घेतला आणि  खूप फोटो आणि विडिओ घेतला. 

बराच वेळ माझ्या पाठीवर बसून माझ्या गालाला पण त्याने छान  स्पर्श केला. आणि त्या नंतर 

जाताना प्रियंकाला स्पर्श करून थँक यू  म्हणून तो उडून गेला. 

 आमच्या साठी ती पोपट मैना म्हणजे आमची मीनाचा आहे. 

आणि त्या परमेश्वराचे खूप खूप धन्यवाद जो  आम्हाला त्याच्या अद्भुत चमत्काराचे साक्षीदार बनवतो.