Thursday, December 31, 2020

Happy New year





बंड्या : बाबा घृणा आणि द्वेष एकच आहेत का? का दोघां मध्ये फरक आहे ?. मी घृणा चा अर्थ शोधण्यासाठी साठी गुगल केले घृणा (द्वेष) असे ऊतर मिळाले.

बाबा: दोघांचा अर्थ एक असेल किंवा काही अंशी फरकही असेल पण दोघेही तुमच्या मनातील प्रेमाचा झरा अडवणारे दगड आहेत. ते मनातून काढून टाकले की मनात उरते फक्त प्रेम .

नवीन वर्षात मनातील हे प्रेमाचा झरा आडवणारे दगड काढून टाकू या .
आपणा सर्वांना व आपल्या कुटुंबियांना येणारे नवीन 2021 हे वर्ष सुखदायक, भरभराटीचे , आरोग्यदायी आणि कोरोना फ्री जावो.

Wish you and your family a very happy, healthy prosperous  CORONA FREE New Year-2021.


Top 5 technologies to learn in 2021  for High-level job in IT  Industry

1. AI , RPA, Blockchain
2. ML - Hyper Automation, VR, AR
3. CYBER Security
4. DevOps , Edge Computing,
5. IoT , BIG DATA Analytics
6. Quantum Computing



Top 5 technolgies to learn in 2021 for Freshers to enter into  IT  Industry

1.Cloud Computing
2. Knowledge of at least one Language ( Python, JAVA,C#,C/C++,R,Go Lang)
2a. Other add on Script Languages to learn (JAVASCRIPT, AngularJS, ReactJS, SWIFT, PHP)
3. Understanding of web technology
4. Database ( SQL and NOSQL Database, NewSQL)
5. Knowledge of repository systems like GIT,CVS etc.


Other technolgies to learn for non Techno students in 2021  to get job in Industry or start their own business

1. Understanding Digital Business and Digital Marketing
2. Blogging and Content writing
3. Script Writer and Digital Video production
4. Selling services and products using an online business model.
5. Online Training, Coaching, and mentoring Career


Some Important Technology to Follow in year 2021

1. Cognitive Cloud Computing
2. Industry 4.0
3. Education 4.0
4. 5G
5. Web 4.0


Friday, October 30, 2020

Trusted Online Election Solution

Online Nomination Committee Election Process for Rotary Club


This is simple two step process


1.Once members  join the online meeting,  Attendance form link will be shared in the meeting chat 

 Just click that ATTENDANCE FORM link select your name  and mark your attendance


2. Once attendance is confirmed by the Election Committee VOTING FORM will be shared in the meeting chat. Click that form link to cast your vote. 

  1. Select Your Name

  2. Select at the most  or Exact  6/7 NC Candidates Name ( as confirmed by club policy)

And submit the form


Voting form will be disabled Once Voting done by all members who marked their attendance.


Result will be emailed in pdf format to the Convenor of Election Committee and  Election Committee member and President , Secretary

It will  contain

  1. Result sheet

  2. Attendance list

  3. Vote received list without name who voted whom.


The convener of the Election Committee will announce the result.

We immediately delete the data at our end.

Building TRUST through Simplicity and Technology


For More Customized Solutions and Live Demo Contact:


Rtn Sanjeev Chaudhary
9422317539

We simplify life with EASy and Trusted Cloud Solutions



We Successfully Conducted First Online NC Committee Election for Rotary Club Pune Central, Pune Parvati and Pune Shivajinagar



" It was indeed well designed and quite user friendly. Great job done."
Thank you PE Amitabh Mukhopadhyay , President Ajay Dube and Rtn. Lekha Nair



Completed Online Nomination Committee Election for  RC Pune Parvati

Thank you very much 
"it was a pleasure ... Thanks for d total help " DG Rashmi Kulkarni, 
President Maya Phatak, Rtn. Hon. Secretary Shekhar, PP.  Sharad Joshi , PP. Mohan Paranjape   and Rtn. Mahesh Saptarshi




RC Pune Shivajinagar



"Sanjeev is a great asset. He made difficult thing look so simple. 🍬💐" - PP Appa Chipalkatti

Thank You Appa, President Sharad, PP. Yashwantrao and Club Secretary Ravikaran Desai and all My Club members.




If you missed the online live demo meeting of this solution , you can view it here




Sunday, October 25, 2020

Happy Dussehra-धर्मयुद्ध






Happy Dussehra


Celebrate the victory of the forces of Good over Evil


It means VICTORY over TEN BAD qualities within you


Hence, also known as 'Vijaydashami - विजयादशमी  signifying "Vijaya- विजय  over these  ten bad qualities within you.
  1. Ahankara - (Ego)  - अहंकार 
  2. Amanavta -(Cruelty) - अमानवता 
  3. Anyaaya - (Injustice)  - अन्याय 
  4. Kama vasana - (Lust)  - काम वासना 
  5. Krodha- (Anger)  - क्रोध 
  6. Lobha -(Greed)  - लोभ 
  7. Mada -(Over Pride) - मद 
  8. Matsara -(Jealousy) - मत्सर 
  9. Moha -(Attachment) - मोह  
  10. Swartha (Selfishness) - स्वार्थ 

    I loved the concept:(Received on social media. )

    There are four yugas widely accepted in Hinduism. They are :
    1. Satya yug
    2. Treta yug (Ramayana)
    3. Dwapara yug(Mahabharata)
    4. Kal yug(Present)

    In Satya yug, the fight was between two worlds (Devalok & Asuralok). 
    Asuralok being the evil, was a different WORLD.

    In Treta yug, the fight was between Rama and Ravana. 
    Both rulers from two different COUNTRIES.

    In Dwapara yug, the fight was between Pandavas and Kauravas. Both good and evil from the SAME FAMILY.

    Kindly note how the evil is getting closer. For example, from a DIFFERENT WORLD to a DIFFERENT COUNTRY to the SAME FAMILY.


    Now, know where is the evil in Kaliyug???


    It is inside us.

     BOTH GOOD AND EVIL LIVE WITHIN. The battle is within us. Who will we give victory to, our inner goodness or the evil within??


    Conclusion:


    Think, identify and fight against all evil within you or in your religion. Don't be a  blind follower of your religion or yourself.
    It is nothing but your own Dharmayuddha -धर्मयुद्ध  - न्यायपूर्ण युद्ध

    तुमच्या स्वतः मध्ये आणि धर्मा मध्ये दडलेल्या सैतानाला ओळखा शोधून काढा आणि त्याच्या विरूद्ध युद्ध करून  संपवून टाका . अंधळे  होऊन  स्वतः चे  किंवा  तुमच्या धर्माचे अनुयायी होऊ नका . हेच आहे तुमचे धर्मयुद्ध  - न्यायपूर्ण युद्ध. 
       







    Happy Dussehara to all of you and your Family






    Saturday, September 5, 2020

    शिक्षक दिन - Happy Teacher's Day




    Happy Teacher's Day 

    for my free online training sessions visit below link

    Cloud Computing Digital Skills



    आज शिक्षक दिना निमित्ताने मी माझ्या आयुष्यात येऊन मला वेळोवेळी शिकवून गेलेल्या माझ्या सर्व गुरूंना - TIME,Books, Teacher ,Mentor , Google आणि माझे अंतर्मन - ह्यांना वंदन करतो
    Knowledge is most important tool to servive in the 21st century. पूर्वी माहिती मिळविण्या साठी खूप फिरावे लागायचे . पण आता तुमच्या कडे कॉम्पुटर आणि Internet असेल तर घरी बसल्या बसल्या तुम्ही माहितीचे भांडार उघडू शकतात .
    आणि हे माहितीचे भांडार उघडायची सोपी किल्ली म्हणजे "Google"
    www.google.com

    ह्या सहा  अक्षराच्या मंत्राने माहितीचे भांडार सर्व सामन्यापार्येंत पोहचविण्याचे खूप मोठे कार्य केले आहे . आणि तुम्हाला ते माहित नसेल तर तुमचा मुलगा किंवा नातू तुम्हाला  अज्ञानी  समजेल .
    तर हा सहा  अक्षरांचा  मंत्र कसा वापरायचा ह्याची माहिती तुम्ही करून घ्या . तुमच्या पेक्षा वयाने लहान असणाऱ्याला सुद्धा तुमचा गुरु करायला मागे पुढे बघू नका . पण एकदा का माहितीच्या ह्या भांडाराची किल्ली तुम्हाला सापडली कि बघा माहितीचा पूर तुमच्या घरात तुमच्या पर्येंत कसा येतो ते . तर ह्या शिक्षक दिनानिमित्त माझ्या ह्या गुगल गुरूला त्रिवार वंदन .

    It is the supreme art of the teacher to awaken joy in creative expression and knowledge.-Albert Einstein

    "A teacher's purpose is not to create students in his own image,but to develop students who can create their own image."


    for my free online training sessions visit below link

    Cloud Computing Digital Skills


    Online Training

    Cloud Computing Digital Skills



    Tuesday, May 12, 2020

    Healthy lifestyle key to fight against Corona





    Everybody, please add *KAPALBHATI* or any breathing exercise to your everyday exercise routine. And check your stamina to hold your *BREATHE*. You can use mobile clock stopwatch.
    Mine is 40-45 second. What is yours?
    Improving your inner power is the best way to fight against Corona.


    In fighting against Corona Virus,  the most important thing you should do in your lockdown period is , “improve your inner fighting power, improve your immune system” . To do this you should try to follow a healthy lifestyle. Regular exercise, Yoga , enough sound sleep and healthy diet habits are the key points of the healthy lifestyle. 

    Other than this one morning drink I found really very effective and that is after waking up,  drink a glass of warm water with Haldi (Turmeric ) and lemon juice. In case of throat infection, you can gargle with turmeric mixed warm water.


    कोरोनासे   डर  लगता  है  फिर  आप  लेते  क्यूँ  नही !

    Add caption



    One day on my terrace I was having this glass of water with Haldi (Turmeric ) and lemon morning healthy drink and discussed this with our neigbhour uncle Chakraborty and from that day he aslo started having this morning healthy drink of 
    haldi with warm water and  lemon and confirmed that it is very useful.

    Photograph on 11-May-2020


    My dad is a Doctor by profession but long back I told him, about this 
     haldi with warm water and  lemon monrning drink  and sicnce then my dad and mom (84 & 80) both are having this morning healthy haldi with warm water and  lemon drink regularly.  

    Photograph on 31-Jan-2020



    रोज सकाळी उठल्यावर दात घासायच्या आधी मी हळद,लिंबू आणि थोड्या प्रमाणात मिरपूड अश्या सशक्त पेयाने दिवसाची सुरुवात करतो. तुम्हीहि करून बघा काही दिवसातच फरक जाणवेल.


    थोडे रोजच्या व्यायामा विषयी

    तुमचे स्वस्थ आणि निरोगी शरीर हीच तुमची खरी शक्ती असते . तुमचे शरीर स्वस्थ आणि निरोगी नसेल तर प्रेम आणि ज्ञान मनातल्या मनात मरून जातील. मग तुम्ही कितीही कमावलेली पैश्याची शक्ती तुमच्या काही उपयोगी येणार नाही . पैसा आयुष्यात महत्वाचा आहेच पण प्रेम आणि ज्ञान ह्याशिवाय सुखाचा शोध पूर्ण होऊ शकत नाही . प्रेम आणि ज्ञान ह्यांना तुमच्या जीवनात आणायचे असेल तर बळाची (पैसा आणि निरोगी शरीर) ह्याची नितांत आवश्यकता असते. बलवान निरोगी शरीर , निर्मळ आणि सतेज बुद्धी आणि प्रेमळ परंतु प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होणारे ह्रुदय ह्या सर्वांची जीवनातील खर्या सुखाचा शोध घेण्यासाठी नितांत आवश्यकता असते. ह्या निरोगी ,स्वच्छ ,स्वस्थ शरीराच्या द्वारा सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असतो. 

    म्हणून नियमित व्यायामाची सवय असणे खूप गरजेचे असते. तुमच्या व्यायामात खालील तिन्ही प्रकाराचा समावेश असणे आवश्यक आहे.


    महत्वाची सूचना: कोणताही व्यायाम करण्या आधी वॉर्म अप करणे आवश्यक असते 

    1)Stamina and Power- Aerobics, Running, Walking, Weight lifting,Pushups
    १)शक्ती आणि क्षमता ( धावणे आणि वजन उचलणे,पुशप , सूर्यनमस्कार )

    2)Stretching - ( Yoga - stretching exercise)
    २) ताणाचे व्यायाम ( योगासन ,सूर्यनमस्कार)

    3)Yoga - (Breathing exercise & Meditation)
    ३)योग - कपालभाती , प्राणायाम आणि ध्यान


    सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे.



    तुम्ही कोणत्याही वायोगटातील असाल आणि तुमचा आवडता व्यायाम प्रकार कोणताही असेना परंतु त्यात सुर्यनमस्काराची भर घालून तुम्ही काही दिवसातच अचंभित करणारे बदल तुमचे तुम्ही अनुभवू शकतात.

    तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार करीत असाल पण त्यासाठी शरीर आधी वार्म-अप करणे जरुरी असते हे तुम्हाला माहीतच असेल.तर तुमच्या वार्म-अप प्रकारात सुर्यानमस्काराची भर घालून बघा आणि काही दिवसातच तुम्हाला हवे असलेले बदल दिसावयास लागतील

    सूर्यनमस्कार म्हणजे १२ आसने आपण अनुक्रमाने करतो.
    प्रत्येक आसन घेतल्यानंतर त्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ थांबवायचा प्रयत्न तुम्ही करावयास हवा.
    थोडक्यात पोझिशन घेतल्या नंतर मनातल्या मनात १० ते २१ पर्येत जसे जमेल तसे मोजा आणि मग पुढच्या पोझिशन कडे वळा.
    तुमच्या वयानुसार आणि आवश्यकते नुसार तुम्ही असे ३ ते XXX सूर्यनमस्कार घालू शकता.
    त्यानंतर तुम्ही तुमचा आवडता व्यायाम करावा.
    कोणताही व्यायाम करितांना खालील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या

    १) शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा नाही तर फायद्या पेक्षा शरीराचे नुकसान होऊ शकते. थोडक्यात व्यायाम करतांना शरीराचे ऐका.
    २) व्यायामा सोबत शरीराची तेल मालिश सुद्धा खूप आवश्यक असते त्यामुळे रोज जमत नसेल तर आठवड्यातून १ किंवा २ दिवस मालिश साठी ठेवावा मालिश करणे हा एक प्रकारे व्यायामच आहे.
    ३) व्यायामाबरोबर संतुलित आहाराचीही गरज असते त्यामुळे तुमच्या शरीराला अनुरुप असा संतुलित आहार घ्या. गरज पडल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.
    ४)घ्यानाची आवड असल्यास ते पण करून बघा. खरे म्हणजे व्यायाम करतांना तुमच्या शरीराशी संवाद हे एक ध्यानच असते आणि तसे केले कि तुम्हाला हवे असलेले बदल तुम्ही लवकर घडवू शकतात.







    Thursday, March 26, 2020

    चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस



    नवा आरंभ नवा विश्वास 
    नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात 
    गुढी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना  हार्दिक शुभेच्छा!!
     हे नवीन  वर्ष आणि 
    कोरोनाचा नायनाट  करणारे 
    घरातील कौटुंम्बिक बंदिवासचे दिवस  
    तुम्हा सर्वांना  सुखाचे, समाधानाचे,ऐश्वर्याचे , आनंदाचे  आणि आरोग्याने समृद्ध असे जावो

    चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस. सृष्टी निर्मिती हा विचारच मनात अनेक प्रश्नं आणि कुतुहुल निर्माण करून जातो. हि सृष्टी कशी निर्माण झाली असेल , फक्त मानवच ह्या पृथ्वीवर येवढा प्रगत कसा झाला . मानव विचार केव्हा करायला लागला . हजोरो वर्षापूर्वी मानवाच्या मनात आलेला विचार मला आजही अंतर्मुख करतो
    सृष्टि निर्माण होण्या पूर्वी सत असत नव्हते 
    अन्तरिक्ष पण नव्हते अणि आकाशही नव्हते
    पण असे काय लपले होते कोणी कोणाला झाकले होते.
    त्यावेळेस अगम असे पाणीही नव्हते. 




    गणितातली अत्यंत कठीण गणिते आपण 'क्ष' मानून सोडवतो. 'क्ष'ला तशी किंमत नसते. पण त्याच्या मदतीशिवाय गणित सुटत नाही.
    शेवटी आपल्याला उत्तर सापडल्यावर मानलेला 'क्ष' नामानिराळा होतो. मग जीवनातल्या अवघड समस्या व न सुटणारी कोडी सोडवण्यासाठी लोकांनी हा हातचा 'क्ष' म्हणजे देव मानायला सुरुवात केली असावि. मग कोणी X , कोणी Y तर कोणी Z अशी वेगवेगळी नावे देऊन आपापली उत्तरे शोधू लागलेत.

    परमेश्वर आहे का ?श्रद्धा असावी का ?

    श्रद्धा आणि अंधविश्वास ह्याला विभागणारी सूक्ष्म रेषा म्हणजे काय
    ह्याचे खरे उत्तर कुणाकडेही नाही पण मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून एवढेच सांगावेसे वाटते



    "श्रद्धा हि असावीच लागते मग ती दगडाच्या ठिकाणी का असेना"
    "शून्याची किंमत मानावीच लागते जरी ते शुन्य का असेना "


    Wednesday, February 26, 2020

    Digital Marketing Workshop




    Conducted workshop on Digital Marketing and Cloud Technology at Arkey Conference Hall for Arkey Group Department staff members. .
    Thanks to Ravindra T Kulkarni for organizing this 3 days workshop.
    It is always better to upgrade skills of our own team rather than depending on third party and outsourcing our IT requirements






    Sunday, February 16, 2020

    आमच्या घरातील लग्न




    आमचा मोठा मुलगा हर्षवर्धन आणि प्रियंका  ह्यांचे लग्न ३१ जानेवारी २०२० ला  व्यवस्थित  पार पडले. ह्या साठी मी ,  माझी  पत्नी सौ  मीना आणि आमचे व्याही श्री. वामनराव  आणि सौ सविता किनगे ह्यांनी खूप  आधीपासून व्यवस्थित प्लॅनिंग केले होते.  सगळ्यात महत्वाचे म्हणजे  हे लग्न सूट सुटीत  व्हावे आणि सगळ्यांना आनंद देणारे ठरावे असा  आमचा सुरुवातीपासून प्रयत्न होता  आणि त्या साठी काही गरज नसलेल्या   प्रथा  बदलल्या तरी चालतील ह्या मतावर आमच्या दोन्ही कुटुंबाची सहमती होती.  त्या प्रमाणे सतत चर्चा करून  आम्ही लग्नाचे कार्यक्रम सहमतीने ठरविले.  आमच्या ह्या लग्नातील काही ठराविक घटना  नमूद  करतो जेणे करून ज्या घरा  मध्ये लग्न कार्य अपेक्षित आहे त्यांना आमच्या अनुभवाचा लाभ व्हावा.
    सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे हे लग्न ऍरेंज मॅरेज आहे. त्यामुळे आधी आम्ही उभयतांनी  प्राथमिक बोलणी केल्यानंतर  दोन्ही मुलांची मोबाइल  द्वारे ओळख करून दिली. हर्षवर्धन पुण्यात आणि प्रियांका बंगलोर येथे होती  .  कुटुंबाची मने जुळली होती  परंतु पुढे जायचे का नाही ह्याचे संपूर्ण अधिकार आम्ही दोन्ही मुलांना दिले होते त्यामुळे दोघांनी समक्ष भेटून चर्चा करून निर्णय घ्याचा होता आणि दोघे वेग वेगळ्या शहरामध्ये असल्यामुळे कोठे आणि कसे भेटायचे ह्यावर फक्त चर्चा व्हायची ठोस निर्णय होत नव्हता .
    आणि एक दिवस  प्रियंका आणि तिचा भाऊ कार्तिक यांनी  बंगलोर वरून पुण्याला आमच्या घरी येणाच्या निर्णय घेतला अर्थात त्यांच्या आई वडिलांच्या  संमतीने.  ते आमच्या घरी आले . हर्षवर्धन  आणि प्रियांका दोघांनी एक मेकांशी बोलून  पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या आई वडिलांच्या  संमतीने पुण्यातील तिचे मामा मामी सचिन व जयश्री कोलते  आमच्या कडे आले आणि आम्ही छोटे खानी कुंकवाचा कार्यक्रम  अक्षरशः ४ तासा  मध्ये आटोपला  . तत्परतेने मीनाने जेवणाची घरीच व्यवस्था  केली आणि दुपारच्या ३ च्या बस ने दोघे बहीण भाऊ बंगलोर ला  रवाना  पण झाले.




    ह्या नंतर लग्न कोठे करायचे ह्यावर चर्चा झाली आणि लग्न पुण्याला करण्याचा  निर्णय झाला. आणि कोथरूड  मधील सिद्धार्थ पॅलेस हा हॉल ३०-३१ जानेवारी साठी बुक केला .  ह्या हॉल ला एकूण १२ प्रशस्थ  एसी रूम्स  आहेत.  त्यामुळे  गावावरून येणाऱ्या पाहुण्यांची चांगली व्यवस्था हॉललाच  झाली . . ३० जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता हॉल मिळाला आणि नंदा डेकोरेटर्स च्या टीम ने उत्तम  डेकोरेशन  वेळेत तयार करून ठेवले होते त्यामुळे आम्ही ७ वाजता साखरपुडा आणि त्यानंतर हळद असे कार्यक्रम आम्ही वेळेत सुरु करू शकलो . हळदी नंतर  आम्ही संगीत हा कार्यक्रम ठेवला होता. ठरल्या प्रमाणे सगळे वेळेत घडले .  फक्त एक गोष्ट नियंत्रित  करायची राहुल गेली त्यामुळे संगीत १५मिनिट पुढे ढकलावे लागले ते काय इथे लिहीत नाही .
    ज्यांना  माहिती  हवे असेल त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधावा 😃

    आमच्या लग्ना  मधील संगीत हा कार्यक्रम थोडक्यात पण खूपच छान झाला असे मत सर्वांनी त्याच वेळेस दिले आणि त्यानंतर यूट्यूब  आणि  फेसबुक वरील views  (१००० च्या   वर ) आणि कंमेंट्स बघून  ते खरोखरच खूप उत्तम झालेत  ह्याची  प्रचिती आली.   विशेष म्हणजे आता पर्येंत आमच्या फॅमिली मध्ये डान्स ह्या क्षेत्रात माझी मोनोपॉली होती पण बाप से बेटा और बेटी सवाई हे सिद्ध  करत  हर्षवर्धन आणि प्रियंकाने खूप सुंदर परफॉर्मन्स देऊन सर्वांची मने जिंकली . प्रियंकाने  कुणालाच कोणतीही पूर्व कल्पना न देता  केलेला कौटूंबिक  नात्यांवर  सादर केलेला परफॉर्मन्स  सर्वांची मने जिंकून गेला .


    हर्षवर्धन प्रियांका 




    प्रियांका चा  कौटूंबिक  नात्यांवर  सादर केलेला परफॉर्मन्स







    संजीव मीना 













    हे लग्न कार्य निर्विघ्न पणे पूर्ण होण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या ज्या सर्वांचा सहभाग झाला त्या सर्वांचे आणि परमेश्वराचे मनापासून आभार असाच स्नेह आणि लोभ आमच्या कुटूंबावर असू दे!

    धन्यवाद