Friday, October 20, 2017

जिंदगी इत्तेफाक है



जिंदगी इत्तेफाक है !


फेब्रुवारी २००१  ची हि खरी  घटना  आहे, आम्ही  माझ्या भाचीच्या लग्नासाठी  संपूर्ण कुटुंब नवीनच घेतलेल्या एसटीम कार ने  पुण्याहून नागपूरला  गेलो  होतो.   तेव्हा परतीच्या  प्रवासात घडलेली हि घटना आहे.
दुपारची वेळ होती.  वाहनांची गर्दीपण नव्हती त्यामुळे मी थोडा वेगानेच गाडी चालवीत होतो.  मी वेगाने एका  ट्रक  ला  oevertake  करीत होतो तेव्हड्यात समोरून  एक   टेंम्पो ट्रॅक्स येतांना दिसली  आणि  मी  सिग्नल दिला  मला वाटले तो त्याचा वेग कमी करून मला oevertake  करू देईल  पण त्याने उलट सिग्नल देऊन त्याचा वेग वाढविला . आणि तो एक क्षण आम्ही सर्वांनी साक्षात समोरून मृत्यूचा अनुभव घेतला . शेजारी ट्रक  समोर टेम्पो ट्रॅक्स .  तो एक क्षण head on collision च्या रूपात मृत्यूचे साक्षात दर्शन करून गेला , काय करावे ... मी झुपकन उजवीकडून  गाडी रोडच्या खाली उतरवून  रोड  भाषेत ज्याला wrong cut मारून झुपकन गाडी काढली.
तो त्याच वेगाने सरळ गेला , आणि अपघात टळला .
पण त्याने पण माझ्या सारखाच त्याच क्षणी wrong cut मारला  असता  तर ?
गाडीतील सगळे स्तब्ध झाले होते. मीना म्हणाली तिच्या  तर  पायातले  त्राणच  गेले होते. कारण रस्त्याच्या कडेवर  एक माणूस पण उभा होता त्याच्या अगदी जवळून गाडी गेली. पण मला मात्र तो माणूस खरंच दिसला नव्हता .
दिसला असता तर कदाचित इतका fine wrong cut मला जमलाही नसता.  एकंदरीत काय एका बेसावध क्षणी मृत्यूचे साक्षात दर्शन घेऊन आम्ही सुखरूप बचावलो.   ह्यात माझे  स्वतःचे क्रेडिट घेण्यासारखे कर्तृत्व  कोणतेच नव्हते . खरे बघितले तर wrong oevertake   करणे आणि wrong cut  घेणे दोन्ही माझ्याच चुका होत्या. पण मनुष्य म्हटंले म्हणजे चुका होऊ  शकतात  . आपण काही पुरुषोत्तम असू शकत नाही सदा सर्वदा परिपूर्ण आदर्श आयुष्य जगायला. पण  असे अनुभव एक अनुभव देऊन जातात  एका अज्ञात शक्तीच्या असण्यावर

ह्या अनुभवावर मी मीनाला गमतीने म्हणतो आपल्या कुंडलीतील मंगळाचे (आम्ही  दोघे मांगलिक आहोत ) युद्ध होते हे.  पण माझ्या धनु लग्नातील  गुरु ने वाचविले.


अर्थात आमचे लग्न कुंडली बघून मुळीच झाले नाही. लग्ना नंतर दोघांना  मंगळ आहे  हा  निव्वळ  योगा  योग  आहे हे कळले.


आणि म्हणूनच गाण्याचे बोल आठवतात


जिंदगी  इत्तेफाक है !

  कल  भी इत्तेफाक थी
    आज भी इत्तेफाक हैं !!

- संजीव चौधरी






You can read this article and many in below Rotary club of pune shivajainagar Diwali Issue.

Rotary Club of Pune Shivajainagar - PUSH Diwali Issue

Click this to download pdf RCPS PUSH DIWALI ISSUE 2017

Click this to view all pages




Tuesday, October 10, 2017

सहस्रचंद्रदर्शन सोहळा

डॉ . सी . एस चौधरी

सहस्रचंद्रदर्शन सोहळा
७ ऑक्टोबर २०१७
मुक्ताईनगर 



धन्यवाद आजच्या डिजिटल युगात वेळात  वेळ  काढून आमच्या कौटुंबिक  सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी   उपस्थित   राहिलेल्या  (किन्ही- भुसावळ  खान्देश ) येथून आलेल्या आणि विदर्भातून आणि थेट नागपूर येथून आलेल्या आमच्या सर्व  नातेवाईकांना  मनापासून धन्यवाद.   ५६ वर्षे मुक्ताईनगर  येथे वैद्यकीय व्यावसाय आणि शैक्षणिक  संस्थेशी संलग्न सामाजिक कार्य करून दादांनी जोडलेली माणसे त्यांची  उपस्थिती  आणि कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यासाठी क्षणोक्षणी  केलेली निःस्वार्थ मदत  आणि दादांवरील प्रेम मनाला स्पर्श करून गेले.त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद


खास  करून  आशाताईने नागपूर येथून करून आणलेल्या १०८ पणत्या आणि व्यक्त केलेले मनोगत अप्रतिम होते. ५६ वर्षे मुक्ताईनगर  येथे वैद्यकीय व्यावसाय आणि सामाजिक कार्य करून दादांनी जोडलेली माणसे आणि त्यांची  उपस्थिती  आणि दादांवरील प्रेम मनाला स्पर्श करून गेले.

खास आठवण ठेऊन सौ. मंदाकाकू खडसे आणि सौ.रोहिणी खडसे खेवलकर (अध्यक्ष जे  डी  सी सी बँक जळगाव ) हे कार्यक्रमाला उपस्थित होते. 

 सौ. रोहिणी ह्यांनी उत्तम मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल धन्यवाद.  

आमदार खडसे काका  बाहेर गावी  गेल्या कारणाने उपस्थित  राहू शकले नाहीत पण त्यांनी आवर्जून फोन केला त्याबद्दल धन्यवाद.  

खासदार रक्षा खडसे  ह्यांना  बाहेरगावी जायचे होते त्यामुळे त्या आठवण ठेऊन सकाळीच  घरी येऊन  दादांना शुभेच्छा देऊन  गेल्यात  त्या बद्दल त्यांचे धन्यवाद.



 प्रि . व्ही आर पाटील  सर ह्यांनी मनोगत  व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.प्रा  साळवीं सर ह्यांनी  उत्तम निवेदन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद .  प्री  सुजित पाटील सर , उ.प्रा एस एन पाटील  सर , राजू पाटील आणि  मुक्ताईनगर मधील दादांचे अनेक सहकारी  सर्वांची नावे  घेऊ शकलो नाही त्या साठी क्षमस्व  आणि सर्वांचे मनापासून आभार