Monday, April 29, 2013

Meet, Discuss and ask. पुछनेमे में क्या जाता है!

Dictionary defines a meeting as an act or process of coming together as an assembly for a common purpose

सभा - दोन किंवा अधिक  (म्हणजे दोनापेक्षा जास्त, कृपया  अधिक चा वेगळा अर्थ घेऊ नये  :-)) लोकांनी  एकत्र येउन सामायिक ध्येय गाठण्यासाठी अयोजलेले चर्चा सत्र म्हणजे सभा . आयुष्यात आपण  कधी न कधी सभे ला हजेरी लावीत असतो किंवा सभा आयोजित करीत असतो. सोसायटी सभा , नौकारीतील सभा ( प्रोजेक्ट मीटिंग ), आणि राजकारणात असाल तर राजकीय सभा . काही फक्त हजेरी लावतात , काही मते मांडतात , काही फक्त टीका करतात पण हे सगळे होत असले तरी show must go on प्रमाणे हे सर्व आदि अनादी काळापासून  चालत आलेले आहे आणि चालत रहिल. 

हजोरो वर्षापूर्वी कृष्ण आणि अर्जुन ह्यांच्यामध्ये रणांगणावर झालेली सभा आणि त्यातून  निष्पन्न झालेला गीता उपदेश आजही वाचला जातो. तुमच्या आयुष्यातील तुमच्या मनातील द्वंद्व आणि कृष्ण रुपी तुमच्याच मनातील सद सद विवेक बुद्धी अशी सभा ( Meeting)  तुमच्या मनात सतत सुरु असते. असो.  त्याची दाखल तुमाच्याशियाय दुसरे कोणी घेत नाहि. पण जेव्हा तुमचे स्वतःचे मत जे तुमच्या विचारातून किंवा कुणाच्यातरी प्रभावाने तयार झालेले असते. (बहुतेक वेळा मदिरा तुमची मते पक्की करायला उपयोगी पडते . म्हणून तर निवडणुकीत , corporate क्षेत्रात  तिचा सर्रास वापर केला जातो हे कटू असले तरी एक सत्य आहे ) .तुमच्या  मताची दखल सभेमध्ये घेतली जाते  पण तुमचे मत बहुमताने विजयी झालेल्या निर्णयाच्या बाजूचे होते का विरोधात होते ह्यापेक्षा तुम्ही मत दिले ह्याला अधिक महत्व तुम्ही देऊन बहुमताचा आदर करावयास हवा असे आपली लोकशाही सांगते .  पण मत न देता तुमच्या मनातील खद खद  Facebook   किंवा सोशल ग्रुपवर दाखवू नका . 


If you want to change the system you should be in the system.
Voting is simplest way of being in the system


Meeting - सभेचे महत्व जाणून घ्यावयाचे  असेल तर तुमच्या कुटुंबात ती आयोजित करून बघा . नवीन एखादा निर्णय घेण्यासाठी वास्तू घ्यायची  असेल, मुलांचे शिक्षण विषय असेल, किंवा एखादी मोठी वस्तू घ्यायची असेल , ट्रीपला जायचे असेल किंवा वीकेंड ला हॉटेल मध्ये जेवायला जायचे असेल छोटीशी Meeting   करून सर्वांना सहभागी करून निर्णय घेऊन बघा तुम्हालाच पटेल Meeting  चे  महत्व.  घरातले लोक भेटत नसतील तर  tele conference, video conference  असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत  ते वापरून बघा पण मीटिंग करा. Internet, TV मधून वेळ काढून समक्ष भेटायला बोलायला चर्चा करायला वेळ काढा . रात्रीचे जेवण सर्व कुटुंबाने एकत्र घ्यावे आणि तेथेच एक छोटीशी मीटिंग आयोजित करून बघावी . बघा फरक पडतो का आणि Meeting चे महत्व पटते का?


काही लोक कॉफी साठी भेटतात , बोलतात आणि JAVA सारख्या संगणकीय भाषेचा जन्म होतो . This is one example of meeting and discussion. There are many and your's can be one of them in future. So meet, discuss and ask.पुछनेमे में क्या जाता है! • मला आवडलेले काही विचार
 • Balancing Your Life
 • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
 • Mentor , गुरु आणि Friend
 • How to be happy in Any Job
 • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
 • जागृतीचा एक क्षण
 • शोध
 • आणि मी तिला सोडले आणि बरेच काही 
 • आत्मपरीक्षण - एक चिंतन
 • मर्यादेचे महत्व आणि कर्मयोग
 • वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही
 • चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस
 • आणि वाल्याचा वाल्मिकी झाला 
 • Happy Family Index
 • My मराठी
 • Meet, Discuss and ask. पुछनेमे में क्या जाता है!
 • स्वदेश
 • EveryDay Exercise - एक प्रात्यक्षिक सुरुवात