कार्यवाही चुकीची म्हणजे दुसरी बाजू बरोबरच असा निर्णय असू शकत नाही. थोडक्यात तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल दोन्ही बाजूंकडून "समन्जसपणा" अपेक्षित होता. समाजात राहायचे म्हणजे "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" आणि कीबोर्ड आहे म्हणून बडवल्या कीज आणि टाकले कॉमेंट असे करून चालत नाही. त्यामुळे मुलांना social responsibility ची सुसंकृत जाणीव करून देणे हे त्याच्या पालकांचे आणि शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे तेथेच जर आपण चुकत असू तर असे प्रसंग वारंवार घडतील.
Freedom of expression comes with responsibilities, especially when it comes with serious implications for peace. - Mohammed Morsi
With great power comes great responsibility
29-Nov-2012
मी वर जे विचार मांडले तेच आज एका TV News Channel वर Responsible netizen ह्या मथळ्याखाली ऐकायला मिळाले. शेवटी एक गोष्ट सांगावीशी वाटते फक्त facebook likes साठी टाकण्यात आलेल्या immature विचारांना किती गांभीर्याने घ्यायचे ह्याचापण विचार सुजाण नागरिकांनी करावयास हवा. नाहीतर ज्या मुद्द्यासाठी आपण पेटून उठलो होतो तो मुद्दा बाजूला सारून आपापली राजकारणी पोळी भाजून घेण्यात एका पेक्षा एक डोकेबाज राजकारणी तुम्हाला पदोपदी बघावयास मिळतील.
तरुणांना एक सांगावेसे वाटते . मुद्दा विचारपूर्वक मांडा आणि त्यावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर मग मागे वळू नका .
मत करो विश्वास उसपर जो परंपरा से पास आया हैं!
मत करो विश्वास केवल इसलिए की गुरु ने बताया हैं!
स्वयंम ही परिख्षण करो निरिक्षण करो!
फिर पाओ जो विचार कल्याण का सब प्राणियोंका
तो जुड़कर रहो उससे!
वही होगा पथप्रदर्शक!
क्यूंकि वोह विचार होगा स्वनिर्मित..!
इसलिए होगा सुनिश्चित!
--गौतम बुद्ध!