जाहल्या काही चुका
जाहल्या काही चुका अन् सूर काही राहिले
तू दिलेले गीत माझे आवडीने गायिले
चांदण्यांच्या मोहराने रात्र केव्हा दाटली
काजळी काळ्या ढगांनी हाक केव्हा घातली
मी स्वरांच्या लोचनांनी विश्व सारे पाहिले
सौख्य माझे, दु:ख माझे, सर्व माझ्या भावना
मोर स्वप्नांचे निळे अन् विंधणार्या वेदना
मी असे गीतांतुनी सर्वस्व माझे वाहिले
संपता पूजा स्वरांची हात तू देशील का ?
दाटुनी काळोख येता तू घरी नेशील का ?
पूर्णतेसाठीच या मी सर्व काही साहिले
गीतकार : मंगेश पाडगांवकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : श्रीनिवास खळे
कधी कधी मनात उठलेल्या भावनांचे कल्लोळ कोणत्याच शब्दात व्यक्त करता येत नाही
तेव्हा
मौन हि एक उत्तम साधना असते , किंवा तुम्ही नशीबवान असाल तर तुम्हाला पूर्ण नाही पण काही अंशी ओळखणाऱ्या आणि तुमच्यावर निर्मळ प्रेम करणाऱ्या व्यक्ती कडून मिळालेली "जादूकी झप्पी (Magical Happy Hug)" उत्तम उतारा असतो पण करोडो व्यक्ती आजूबाजूला असतांना असे भावनांचे बांध जोडायला आणि असा "भावनांचा मुरारी मित्र किंवा राधा " शोधायला आनंद सिनेमामधील आनंद सारखे सुंदर मन आणि प्रयत्नही लागतात.
अश्याच सुंदर भावना असलेले हे एक सुंदर गीत
"भावनांचा तू भुकेला रे मुरारी "
गीतकार : मंगेश पाडगांवकर, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : श्रीनिवास खळे