देश तुमच्यासाठी काय करतो ह्या पेक्षा तुम्ही देशासाठी काय करता असा विचार करून बघा.आणि मग तुम्ही ज्या कुटुंबाचा हिस्सा आहात त्या कुटुंबाने तुम्हाला काय दिले आणि ते सुखी करण्या साठी तुम्ही काय केले असापण विचार करून बघा.
बऱ्याच गोष्टी आपण गृहीत धरतो आणि तिथेच आपण फसतो किंवा स्वतःची फसवणूक करून घेतो.
एक सुखी कुटुंब निर्माण करणे हि पण एक प्रकारे देशसेवाच आहे.
अतिरेकी हे बहूतांशी सुखी कुटुंबाच्या अभावामुळे निर्माण झालेले असतात.
तेव्हा प्रत्येकाने जर एक सुखी कुटुंब निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न केलेत तर एका प्रगत पण संपूर्ण देश्याच्या दिशेने आपण नक्कीच पहिल्या स्थानावर लवकर पोहचू शकतो.
उत्तम राष्ट्रासाठी उत्तम नागरिकांची गरज असते.उत्तम नागरिक हे चांगल्या कुटुंबातून येतात.
सुखी कुटुंब निर्माण करण्यासाठी माणुसकीची मुल्ले जपावी लागतात.
एका सुखी कुटुंबाच्या निर्मिती साठी प्रयत्न करून तर बघा वाटते तितके हे सोपे काम नाही.
प्रेम,जिव्हाळा,अनुकंपा आणि दयाळूपणा ह्या गुणांनी कुटुंब बांधले जाते.
कौटुंबिक मुल्ले समजून घेण्यासाठी खालील चार तत्वे विचारात घेतली जातात
१)एक स्त्री व एक पुरुष यामध्ये कधीही न तुटणारा बंध म्हणून विवाहाला पाठींबा.
सद्य परिस्थिती: वाढते घटस्फोटाचे प्रमाण चिंतेचा विषय.
२)कुटुंब संस्थेमध्ये नवरा हा कुटुंब प्रमुख आणि बायको हि कुटुंब उभारणी करणारी कार्यकर्ती
सद्य परिस्थिती: दोघांनी क्षमता ओळखून स्वताहून जबाबदारी स्वीकारावी आणि दुसर्याने त्याला योग्य तो सहयोग मानापमानाचा विचार न करिता द्यावा हि काळाची गरज.
३)मुलांचे शिक्षण त्यांच्यावर होणारे संस्कार आणि शिस्त हि आई वडिलांची जबाबदारी.
सद्य परिस्थिती: इंटरनेटमुळे नको त्या वयात नको ती माहिती आणि संस्कार ह्याची भीती त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.
४)कुटुंबातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारणे आणि इतर नाते संबंधांबरोबर सुसंवाद साधणे.
सद्य परिस्थिती: वेळेचा अभाव. सोप्या जीवन शैलीचा अभाव आणि उगाच न पेलवणाऱ्या उद्दिष्टांची कास निर्माण करते स्वकीयांपासून दुरावा.
थोडक्यात सुखी कुटुंब निर्माण करणे सोपे नाही.
मर्यादेचे महत्व ओळखून स्वत:वर प्रेम करितांना दुसऱ्याचाही विचार करायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण समंजस आणि सुसंस्कृत होण्याचा दिशेने वाटचाल करतो.अश्या व्यक्ती जेव्हा घरा-घरात ,
समाजात आणि पर्यायाने देशात वाढायला सुरुवात होते तेव्हा त्या घराची त्या समाजाची पर्यायाने त्या देशाची खरी प्रगती होते.
स्वत:वर प्रेम करणे जेवढे योग्य असते तेवढेच त्याचे अहंकारात रुपांतरीत न होऊ देणे आणि दुसऱ्याचा विचार करितांना स्वतःवर अन्याय होऊ न देणेही तेवढेच महत्वाचे असते.
आणि हि Balancing Act तुमची तुम्हालाच आत्मसात करायची असते. येथे Copy & paste चालत नाही.
आजकाल वैयक्तिक स्वातंत्र्याच्या नावाखाली कौटुंबिक मुल्यांचा नाश होतो आहे.प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते तशीच सुखाची किंमत त्याग असते.फक्त तुमची सुखाची कल्पना आणि त्याग दोघेही वास्तव असावयास हवेत.
सुंदर सकाळ आणि पक्षांचा किलबिलाट अनुभवायचा असेल तर
उन्हे येई पर्येंत अंथरुणात लोळत पडण्याच्या तुमच्या आनंदाचा त्याग तुम्हाला करावाच लागतो.
तुम्ही एका सक्षम सुखी कुटुंबाची निर्मिती केली आहे असा तुमचा विश्वास असेल तर मग तुमच्या कुटुंबाच्या सभासदांची कक्षा वाढवून बघा.
तुमच्या कुटुंबासाठी काम करणारा वर्ग तो पण तुमच्याच कुटुंबाचा हिस्सा आहे हा विचार करून बघा.
तुम्ही एखादी कंपनी चालवीत असाल किंवा एखादया संस्थेवर काम करीत असाल तर ते पण तुमचे कुटुंबच आहे असा विचार करून ते पण सुखी करण्या साठी प्रयत्न करून बघा.
तुमच्याच सुखात भर पडेल.
भ्रष्टाचार मुक्त भारत अशी आपण कल्पना करतो पण दान ज्याला आपण नवीन भाषेत tip म्हणतो ती देण्याची वृत्ती पण जोपावयास हवी.
आपण tip फक्त अलिशान हॉटेलवर वायफळ खर्च केल्यानंतर देतो. पण कुणी कष्टकरी चांगले काम किंवा सेवा करितांना दिसला तर त्याला उत्स्फुर्तपणे tip द्यावी हि वृत्ती आपल्यात नाही
ती जोपासण्याची गरज आहे. करून बघा नक्कीच आनंद मिळेल.
घेण्या पेक्षा देण्यात जास्त आनंद आहे फक्त जे द्याल ते तुमच्या स्व अर्जित कष्टाचे असावयास हवे.