Wednesday, February 26, 2020

Digital Marketing Workshop




Conducted workshop on Digital Marketing and Cloud Technology at Arkey Conference Hall for Arkey Group Department staff members. .
Thanks to Ravindra T Kulkarni for organizing this 3 days workshop.
It is always better to upgrade skills of our own team rather than depending on third party and outsourcing our IT requirements






Sunday, February 16, 2020

आमच्या घरातील लग्न




आमचा मोठा मुलगा हर्षवर्धन आणि प्रियंका  ह्यांचे लग्न ३१ जानेवारी २०२० ला  व्यवस्थित  पार पडले. ह्या साठी मी ,  माझी  पत्नी सौ  मीना आणि आमचे व्याही श्री. वामनराव  आणि सौ सविता किनगे ह्यांनी खूप  आधीपासून व्यवस्थित प्लॅनिंग केले होते.  सगळ्यात महत्वाचे म्हणजे  हे लग्न सूट सुटीत  व्हावे आणि सगळ्यांना आनंद देणारे ठरावे असा  आमचा सुरुवातीपासून प्रयत्न होता  आणि त्या साठी काही गरज नसलेल्या   प्रथा  बदलल्या तरी चालतील ह्या मतावर आमच्या दोन्ही कुटुंबाची सहमती होती.  त्या प्रमाणे सतत चर्चा करून  आम्ही लग्नाचे कार्यक्रम सहमतीने ठरविले.  आमच्या ह्या लग्नातील काही ठराविक घटना  नमूद  करतो जेणे करून ज्या घरा  मध्ये लग्न कार्य अपेक्षित आहे त्यांना आमच्या अनुभवाचा लाभ व्हावा.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे हे लग्न ऍरेंज मॅरेज आहे. त्यामुळे आधी आम्ही उभयतांनी  प्राथमिक बोलणी केल्यानंतर  दोन्ही मुलांची मोबाइल  द्वारे ओळख करून दिली. हर्षवर्धन पुण्यात आणि प्रियांका बंगलोर येथे होती  .  कुटुंबाची मने जुळली होती  परंतु पुढे जायचे का नाही ह्याचे संपूर्ण अधिकार आम्ही दोन्ही मुलांना दिले होते त्यामुळे दोघांनी समक्ष भेटून चर्चा करून निर्णय घ्याचा होता आणि दोघे वेग वेगळ्या शहरामध्ये असल्यामुळे कोठे आणि कसे भेटायचे ह्यावर फक्त चर्चा व्हायची ठोस निर्णय होत नव्हता .
आणि एक दिवस  प्रियंका आणि तिचा भाऊ कार्तिक यांनी  बंगलोर वरून पुण्याला आमच्या घरी येणाच्या निर्णय घेतला अर्थात त्यांच्या आई वडिलांच्या  संमतीने.  ते आमच्या घरी आले . हर्षवर्धन  आणि प्रियांका दोघांनी एक मेकांशी बोलून  पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या आई वडिलांच्या  संमतीने पुण्यातील तिचे मामा मामी सचिन व जयश्री कोलते  आमच्या कडे आले आणि आम्ही छोटे खानी कुंकवाचा कार्यक्रम  अक्षरशः ४ तासा  मध्ये आटोपला  . तत्परतेने मीनाने जेवणाची घरीच व्यवस्था  केली आणि दुपारच्या ३ च्या बस ने दोघे बहीण भाऊ बंगलोर ला  रवाना  पण झाले.




ह्या नंतर लग्न कोठे करायचे ह्यावर चर्चा झाली आणि लग्न पुण्याला करण्याचा  निर्णय झाला. आणि कोथरूड  मधील सिद्धार्थ पॅलेस हा हॉल ३०-३१ जानेवारी साठी बुक केला .  ह्या हॉल ला एकूण १२ प्रशस्थ  एसी रूम्स  आहेत.  त्यामुळे  गावावरून येणाऱ्या पाहुण्यांची चांगली व्यवस्था हॉललाच  झाली . . ३० जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता हॉल मिळाला आणि नंदा डेकोरेटर्स च्या टीम ने उत्तम  डेकोरेशन  वेळेत तयार करून ठेवले होते त्यामुळे आम्ही ७ वाजता साखरपुडा आणि त्यानंतर हळद असे कार्यक्रम आम्ही वेळेत सुरु करू शकलो . हळदी नंतर  आम्ही संगीत हा कार्यक्रम ठेवला होता. ठरल्या प्रमाणे सगळे वेळेत घडले .  फक्त एक गोष्ट नियंत्रित  करायची राहुल गेली त्यामुळे संगीत १५मिनिट पुढे ढकलावे लागले ते काय इथे लिहीत नाही .
ज्यांना  माहिती  हवे असेल त्यांनी प्रत्यक्ष संपर्क साधावा 😃

आमच्या लग्ना  मधील संगीत हा कार्यक्रम थोडक्यात पण खूपच छान झाला असे मत सर्वांनी त्याच वेळेस दिले आणि त्यानंतर यूट्यूब  आणि  फेसबुक वरील views  (१००० च्या   वर ) आणि कंमेंट्स बघून  ते खरोखरच खूप उत्तम झालेत  ह्याची  प्रचिती आली.   विशेष म्हणजे आता पर्येंत आमच्या फॅमिली मध्ये डान्स ह्या क्षेत्रात माझी मोनोपॉली होती पण बाप से बेटा और बेटी सवाई हे सिद्ध  करत  हर्षवर्धन आणि प्रियंकाने खूप सुंदर परफॉर्मन्स देऊन सर्वांची मने जिंकली . प्रियंकाने  कुणालाच कोणतीही पूर्व कल्पना न देता  केलेला कौटूंबिक  नात्यांवर  सादर केलेला परफॉर्मन्स  सर्वांची मने जिंकून गेला .


हर्षवर्धन प्रियांका 




प्रियांका चा  कौटूंबिक  नात्यांवर  सादर केलेला परफॉर्मन्स







संजीव मीना 













हे लग्न कार्य निर्विघ्न पणे पूर्ण होण्यासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रित्या ज्या सर्वांचा सहभाग झाला त्या सर्वांचे आणि परमेश्वराचे मनापासून आभार असाच स्नेह आणि लोभ आमच्या कुटूंबावर असू दे!

धन्यवाद