Thursday, May 23, 2019

भारतीय राजकारण आणि निवडणूक 2019मी २ फेब्रुवारी २०१४ ला त्या वर्षातील निवडणुकीचा आधी खालील ब्लाँग लिहिला होता 

Sunday, February 2, 2014


                                                 कर्मयोग आणि भारतीय राजकारण
सध्या भारतीय राजकारणातील अनेक राजकीय ग्रहांना सूर्य (पंतप्रधान) होण्याचे वेध लागले आहेत. बघू या कोण होते ते. मला राज कारणाचा जास्त अभ्यास नाही पण काही दिवसांपूर्वी वाचलेले मोदींच्या काल्पेनेतील भारत हे विचार आवडले.


चांगले विचार  हे चांगलेच असतात सत्तेवर कोणीही आले तरी त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावयास हवा.
फक्त विरोधाला विरोध म्हणून चांगल्या विचारांना विरोध कोणी करू नये.खैरात म्हणून मिळालेल्या पैश्या पेक्षा कर्मयोगाने कष्ट करून मिळविलेला पैसा श्रेष्ट ह्याची शिकवण आणि आठवण हि आपली खरी भारतीय संस्कृति आहे ह्याची जाण तळागाळा पर्येंत करून देण्याची गरज आहे आणि त्या साठी तश्या योजना आखण्याची खरी गरज आहे.
भ्रष्टाचार मिटवणे हे गरजेचे आहे पण त्यामागे विकासाचा मुद्दा मागे पडावयास नको ह्याची पण खबरदारी घेणे हीच काळाची आणि भारतीय राजकारणाची खरी गरज आहे.

 -------------------------------------------------------

दिनांक २९-जानेवारी-२०१९

माझ्या मते मोदींनी त्याच्या कल्पनेतील भारताचे स्वप्न पूर्ण करण्या साठी त्यांच्या दृष्टीने परिपूर्ण प्रयत्न केलेत . परंतु ५ वर्षात १००% बदल घडू शकत नाही हे सर्वांना पटत असेल पण मान्य  नसेल कारण ह्यालाच राजकारण म्हणतात . 
पण शेवटी खूप अभ्यास केल्यानंतर पाल्याला ७०% मार्क मिळाल्यानंतर मिळवलेल्या ७०% मार्कांचे अभिनंदन  करायचे का न मिळालेल्या ३०% बद्दल त्याला दोष द्यायचा का जागृत पालक होऊन मुलाचे खरे गुण   ओळखून पुढील ध्येय्या साठी प्रोत्साहित करायचे हे सर्वस्वी पालकांच्या प्रगल्फतेवर अवलंबून असते.  आणि ह्या निवडणुकीत पालकाच्या भूमिकेत  मायबाप जनता आहे.  

पालकाची जबादारी मुलांच्या फक्त परीक्षेतील मार्कांवर लक्ष ठेवणे इतकीच नसते तर परीक्षा पास झाल्यानंतर  पाल्याला नौकरी किंवा व्यायसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हि पण असते नाहीतर आयुष्यभर कमावलेल्या पुंजीचे लाखाचे १२ हजार व्हायला वेळ लागत नाही.   • गरिबांना किमान वेतन देऊन भागणार नाही. किमान वेतनात आनंदी  कसे राहायचे हे पण त्यांना शिकवावे लागेल.  राहुल गांधी आणि त्यांचे सर्व राजकारणी सहकारी स्वतः किमान वेतन घेऊन हा नवीन राम  राज्याचा मार्ग  जनतेला सउधाहरण दाखवून देतील
  • मग उरलेल्या १०% टॅक्स भरणाऱ्या लोकांनाही ह्या साध्या सरळ मार्गाची जाणीव होईल आणि आयुष्यात नौकरी आणि बिझनेस करून सुखाचा जीव दुःखात घालवला ह्याची प्रचिती त्यांनाही होईल आणि त्यांची चुकलेली वाट शेवटी ह्या राजमार्गाला मिळेल आणि भारत एक संपूर्ण किमान वेतनात सुखी आणि  समाधानानं जगणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जाईल.

पण भाऊ मग हे किमान वेतन देण्या साठी  पैसा कुठून येईल?
असो:

शेवटी लोकशाही आहे कल्पनेतला भारत कसा असावा ह्यावर कुणालाच निर्बंध नाही पण मतदारांनी  भविष्याची कल्पना करून आणि वास्तवाचे भान ठेऊन मतदान करावे एवढीच अपेक्षा आपण करू शकतो.