Monday, March 25, 2013

आणि वाल्याचा वाल्मिकी झाला ..


वाल्या आणि नारदमुनी ह्यांची कथा सर्वांना माहित असेल. वाल्याचा वाल्मिकी झाला आणि पुढे  रामायण त्यांनी लिहिले. नवीन पिढीला माहित नसेल तर आजच्या काळाला  अनुसरून ती गोष्ट सांगतो.

वाल्या अवैध मार्गाने (वाटसरूंना लुटून) पैसा मिळविणारा एक लुटारू होता.

आजही भ्रष्टाचार , लोकांची फसवणूक करून आणि कुवती पेक्षाकर्जाचा मोठा डोंगर डोक्यावर घेऊन वाटचाल करणारे अजागृत लोक  
तुम्हाला आजूबाजूला बरेच दिसतील. आरश्यासमोर उभे राहून विचार
केला तर आपणही त्यातले एक आहोत हे तुम्हालाही जाणवेल.

 त्याला सन्मार्गावर आणण्यासाठी नारदमुनींनी त्याला एक प्रश्न केला.

नारदमुनी: तू हे सर्व कश्या साठी करतो आहेस .

प्रत्येकाच्या आयुष्यात असा सद सद विवेक बुद्धी जागविणारा विचार येतच असतो.

वाल्या : माझ्यासाठी व माझ्या कुटुंबासाठी 

ज्या प्रमाणे वाल्या त्याच्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी कुटुंबाचे कारण पुढे करतो तसेच आपण आपल्या कृत्याचे समर्थन करण्यासाठी अनेक कारणे देत असतो. त्यात कुटुंब हे एक प्रमुख  कारण असते.

नारदमुनी: पण जो मार्ग तू निवडला आहेस तो पापाचा मार्ग आहे त्या पापात तुझे कुटुंब सहभागी (share holder) होतील का त्यांना विचारून ये.

आणि वाल्याने  हा प्रश्न जेव्हा कुटुंबातील सर्व व्यक्तिना विचारला तेव्हा त्याच्या पापात सहभागी  होण्यासाठी सर्वांनी नकार दिला आणि वाल्याचे डोळे उघडले.

नवीन पिढी तर्कशुद्ध पद्धतीने विचार करणारी आहे . वरील कथेतील गणित सोडवितांना गृहीत धरलेला "पाप" हा भाग ते मान्य करणार नाही 

तुम्हाला "पाप" मान्य नसेल तर "कायदा" "नियम" "शिक्षा" शब्द वापरून बघा आणि त्याचीही भीती वाटत नसेल तर...

कहीतरी अक्षम्य चूक होत आहे समाज रसातळाला जात आहे हे जाणा आणि तुमचे विचार बदला आणि अश्या परिस्थितीला जबाबदार असणारे लोक बदला .

1 comment:

Unknown said...

Casino de L'Auberge de Casino de LA. de la Casino de L'Auberge de Casino de L'Auberge
Casino de L'Auberge de gri-go.com Casino de L'Auberge de Casino de https://septcasino.com/review/merit-casino/ L'Auberge de bsjeon.net Casino de L'Auberge de Casino de septcasino L'Auberge de Casino de L'Auberge de Casino de https://deccasino.com/review/merit-casino/ Casino de L'Auberge de Casino de