Tuesday, August 28, 2012

eGovernance-संगणकीय शासन तुमच्या दारी..

काल डॉ . दीपक शिकारपूर यांच्या १९व्या पुस्तकाच्या अमेय प्रकाशनाच्या प्रकाशन सोहळाल्या उपस्थित राहण्याचा योग आला आणि त्या निमित्ताने डॉ. दीपक शिकारपूर ,मुख्य पाहुणे पद्मश्री विजय भाटकर , MKCL चे MD श्री विवेक सावंत आणि Former chief secretary of the state अजित निंबाळकर यांची व्याखाने ऐकण्याची संधी मिळाली. डॉ. दीपक शिकारपूर यांनी कॉम्पुटर आणि IT (Information Technology) ह्याबद्दलची बहुमूल्य माहिती महाराष्ट्रातील तळागाळातील व्यक्ती पर्येंत पोहचविण्याचे काम हि सर्व पुस्तके मराठीत लिहून समाजासाठी खरच खूप मोठे योगदान दिले आहे। हे पुस्तक eGovernance ह्या
क्षेत्रात रोजगाराच्या ,व्यवसायाच्या आणि career च्या विचारांना नक्कीच चालना देईल.





श्री विवेक सावंत यांचे भाषण म्हणजे एक "IT योग गुरु" बोलतो आहे असेच वाटते.eGovernance चा उपयोग जर माणुसकी हरवलेल्या शासनातील खऱ्या माणुसकीचा अनुभव सर्व सामान्याला जाणवेल ह्या साठी झाला तर तो खरा eGovernance चा उपयोग असेल हा विचार मनाला भिडला। सर्व सामान्य व्यक्तीने त्याच्या साठी असलेल्या सुविधा खेटे घालून मिळवण्या पेक्षा शासनच तुमच्या दारी येऊन तुमच्या हक्काची सुविधा तुम्हाला देईल ते खरे शासन।
Former chief secretary of the state अजित निंबाळकर ह्यांनी शासन आणि Computer ह्या बद्दलचे त्यांचे प्रत्यक्ष अनुभव सांगितले. भारतात कॉम्पुटर आणि TV चा प्रवेश कसा झाला ह्या बद्दलची बरीच माहिती त्यांनी दिली.मुख्य पाहुणे पद्मश्री विजय भाटकर ह्यांचे झंझावती भाषण त्यांच्या प्रदिर्घ अनुभवाची आणि प्रचंड कार्याची झलक दाखवून गेले . जाता जाता ते सांगून गेलेत .

Right to Right Education and Right to Right Government
हा येणाऱ्या काळातील विकासाचा मंत्र असेल .

Saturday, August 25, 2012

जे आपण पेरतो तेच उगवते...

११ ऑगस्ट ला मुंबईत झालेली दंगल आणि त्यामुळे देश्याच्या सुरक्षते बद्दल निर्माण झालेले प्रश्न आणि त्याचे उत्तर येणारा काळच देईल. आपला देश तो ज्या कोणत्या परिस्थितीत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार आपणच असतो. "जे आपण पेरतो तेच उगवते" त्यामुळे भविष्यात जर आपलाल्या हवा असणारा India ,भारत (आता नावावर वाद नको) हवा असेल तर त्याची बीजे वर्तमानातच पेरावी लागतील.

मला राजकारणातले काही जास्त कळत नाही आणि तो माझा प्रांतही नाही पण माझा भारतात जन्म झाल्या मुळे आता भारतवासी असल्या मुळे ह्या देशावर प्रेम करणे मी माझे कर्तव्य समजतो आणि त्या प्रश्च्यात ह्या देशाने पर्यायाने हा देश चालविणार्यांनी माझ्या बेसिक गरजा पूर्ण करव्यात अशी अपेक्षा करतो. रोटी ,कपडा मकान ह्या पेक्षा हि सर्वात महत्वाची असते ती सुरक्षा. ज्या साठीच देशाच्या सीमांची निर्मिती होवून देश निर्माण होतात आणि देश चालवण्यासाठी जे लोक कारणीभूत असतात त्याचीच ती जबाबदारी असते. फार पूर्वी एक रशियन प्रवासी भारत भ्रमण केल्यानंतर म्हणाला होता.

"माझा परमेश्वरावर विश्वास नाही पण भारत भ्रमण केल्यानंतर पटायला लागले परमेश्वर असलाच पाहिजे नाहीतर हा देश कसा चालला असता."

मी जेव्हाही सरकारी कामा साठी सरकारी खात्यात जायचो तेव्हा "राम भरोसे" अस्ताव्यस्थ पडलेल्या Files बघून मलाही तसाच प्रश्न पडायचा.पण आता IT (Information technology) मुळे बरेच काही बदलत चालले आहे. पण फक्त अस्ताव्यस्थ पडलेले Document Digital document करून खरे प्रश्न सुटणार आहेत का.
मुळातच फक्त मता साठी निर्माण झालेल्या खोट्या कागदपत्राचे देश सुरक्षेसाठी देश प्रेमापोटी जाती,धर्माच्या पलीकडे जाऊन फक्त देश हितासाठी खरे Audit करण्याचे धैर्य कोणी दाखवेल का?

भविष्यात भारत सुपर पावर बनेल का? ह्या प्रश्नावर कात्थ्याकुट करण्यापेक्षा माझ्या देशाला चांगले धडविण्यात माझा काही role असेल का ह्याचा प्रत्येकाने विचार केला तर आपण भविष्यात सुपर पावर नाही पण world politics मध्ये महत्वाचा role play करू ह्यात मला शंका वाटत नाही. मी तर ठरवले आहे तुम्ही पण ठरवा.


इतनी शक्ति हमें दे न दाता
मन का विश्वास कमजोर हो ना!
....
हम ना सोचे हमें क्या मिला हैं
हम ये सोचे किया क्या हैं अर्पण!









Wednesday, August 22, 2012

अमिताभ बच्चन..तसे घडले नसते तर...

अमिताभ बच्चन ने Facebook page सुरु केले आणि अपेक्षे प्रमाणे अभूतपूर्व likes आणि comments नि त्याचे स्वागत झाले. आणि अमिताभ star of the millennium आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. मी अमिताभ चा Zanzeer पासून Fan आहे. त्याचा Trishul चित्रपट मी २५ पेक्षा जास्त वेळा बघितला आहे. नशीब Engineering ला Admission घेण्या आधी मी त्रिशूल बघितला नाही, नाहीतर मी Electronics ला Admission न घेता Civil Engineering ला Admission घेतली असती. सांगायचा उद्देश मी अमिताभचा आणि त्याच्या विजय भूमिकेचा एवढा चाहता होतो आणि अजूनही आहे.अमिताभला लंडनच्या Heathrow विमानतळावर जवळून बघायचा योग माझ्या नशिबी आला . तो दिवस २१-जानेवारी-२००१ होता.
 

आयुष्यात काही योगायोग फार चमत्कारिक असतात त्यापैकी  हा एक म्हणता येईल. मी २०-ऑक्टोबर-२००० ला अमेरिकाला निघालो त्या दिवशी अमिताभच्या KBC वर हर्षवर्धन नवाथे हा पहिला करोडपती झाला होता. आम्ही पाच लोक अमेरिकेला बरोबर निघालो होतो. माझी ती पहिलीच अमेरिका वारी होती. BOSTON विमानतळावर immigration officer ने का कुणास ठाऊक पण मला अडविले आणि चार प्रश्न जास्त विचारले शिवाय माझ्या passport वर एक दिवस आधीचा stamp मारला. इतरांपेक्षा आपलाल्या एक दिवस आधी अमेरिका सोडावी लागणार ह्याचे त्यवेळेस फार वाईट वाटले पण त्यामुळेच मी लंडन विमानतळावर अमिताभला भेटू शकलो. मग पटले  जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट घडते त्यावेळेस वाईट वाटते पण नंतर लक्ष्यात येते तसे घडले नसते तर हा योग आलाच नसता...

Check my post on Amitabh Bachchan's Facebook wall...

http://www.facebook.com/AmitabhBachchan/posts/335732546519501?notif_t=like


अमिताभ आणि मुंबईच्या पावसाचे मनोहर दृश्य चित्रित केलेले एक अप्रतिम गाणे





Sunday, August 12, 2012

मर्यादेचे महत्व आणि कर्मयोग

तुम्हाला नेमून दिलेले काम चोखपणे पूर्ण करायचे ह्यालाच कर्मयोग म्हणतात. कर्मयोगाचे आणि मर्यादेचे महत्व तुम्हाला माणसांपेक्षा निसर्गाकडून जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येईल. डोळे बंद करून क्षणभर सूर्यमालेचा विचार करा किंवा चांदण्या रात्रीत चमकणाऱ्या आकाशातील ताऱ्यांकडे बघून विचार करा किती करोडो वर्षापासून सूर्य आणि त्याच्या भोवती आपल्या नेमून दिलेल्या कक्षेत हे सर्व  ग्रह आणि तारे फिरत आहेत. विचार करा मंगळाला असे वाटले आता बस झाले सूर्याची दादागिरी आता मी BOSS माझ्या भोवती ह्यांनी फिरायला हवे तर काय होईल?


कर्मयोग म्हणजे जे आपले नेमून दिलेले काम आहे ते ते चोखपणे बजावणे . मी जेव्हा Engineering पूर्ण केल्या नंतर ICIM सारख्या त्या काळातील मोठ्या कंपनी मध्ये Management Trainee म्हणून Join झालो तेव्हा माझ्या पहिल्या BOSS ने मला एक गुरु मंत्र दिला होता . तो मंत्र म्हणजे नौकरीमध्ये  "धु म्हटले कि धुवायचे असते ..." पुढचे वाक्य सर्वांना माहित असेलच ते मी येथे लिहू शकत नाही :) तर थोडक्यात तुम्हाला नौकरी करायची असेल तर एक लक्षात ठेवायचे BOSS IS ALWAYS RIGHT. You should follow what you have been told to do . आणि तुमची फारच घुसमट होत असेल तर सरळ नौकरी सोडून दुसरी बघावी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करून तुम्हाला हवे तसे तुमचे विश्व तुम्ही निर्माण करावे. कोणामुळे कोणाचेही अडत नसते हे Universal Truth समजावून घेवून स्वतः बद्दल झालेल्या गोड गैरसमजांना आळा घालावा.

असे म्हणतात हे सर्व एका महास्फोटातून निर्माण झाले "the big big blast the reason I a'm alive..." 
आणि जे निर्माण होते ते कधी ना कधी संपते हे सुद्धा एक सत्य आहे.




काही काही गीतकार त्यांच्या गाण्यातून  खुप मोठे  सत्य सहज सांगून जातात आणि संगीता मूळे त्या भावना मनाला भिडतात असेच एक इंदीवर यांनी लिहिलेले आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले सफर ह्या चित्रपटातील अप्रतिम गाणे
ओ नदिया चले चले रे धारा चंदा चले चले रे तारा
तुज़को चलना होगा , तुज़को चलना होगा
जीवन कही भी ठहरता नहीं हैं
आंधी से तूफान से डरता नहीं हैं
तू न चलेगा तो चल देंगी राहें
मजिल को तरसेंगी तेरी निगाहें
तुज़को चलना होगा , तुज़को चलना होगा








Saturday, August 4, 2012

अग्निपरीक्षा पण कुणाची ?

टीम अण्णा ने राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला पण आता अग्निपरीक्षा कोणाची ? मला विचाराल तर खरी अग्निपरीक्षा भारतीय जनतेची आहे. आपले खरोखर कल्याण कोण करणार? कुणावर विश्वास ठेवावा? एखादा काळजाला हात घालणारा नारा खरा कि सत्ता काबीज करण्याचा एक मार्ग हे ओळखावे लागणार आहे. ह्या पूर्वीही असे काळजाला हात घालणारे नारे जनतेला फसवून गेले आहेत 
तेव्हा परत परत तीच चूक करायची का हा विवेकी विर्णय घेण्याची जबाबदारी जनतेची आहे. म्हणून मी म्हणतो खरी अग्निपरीक्षा  जनतेची आहे.जनतेची अवस्था महाभारतातील अर्जुना सारखी झालेली आहे. आपल्याच लोकांनी आपल्यावरच युद्धाची वेळ आणावी हाच विषद योग असतो. अश्या वेळेस गरज असते कृष्णा सारख्या मित्राची. 
मला वाटले होते "India Against Corruption" हि भूमिका करेल पण त्यांनी रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला ,असो.
पण अजूनही आपल्या देशात कृष्णाची भूमिका करून अर्जुन रुपी जनतेला योग्य मार्गदर्शन करणाऱ्या लोकांची कमी नाही. अशा समविचारी लोकांनी एकत्र येवून हि भूमिका करण्याची वेळ आलेली आहे.

एक वर्षापूर्वी  टीम अण्णांनी जनतेच्या मनातील  खदखदणारा मुद्दा चव्हाट्यावर आणून जनजागृती केली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
पण "सगळे चोर आहेत"  "जनता मलिक आहे हे तर नौकर आहेत" अश्या विधानांची गरज नव्हती."जनता मलिक आहे हे तर नौकर आहेत" हे वाक्य म्हणजे आपल्या घरातील लहानग्याला अरे तू तर आपल्या घराचा BOSS आहेस असे सांगून समजाविण्या सारखे आहे.  सब भ्रष्टाचारी हैं सब चोर हैं असे  सर्व सामान्य विधान करून कसे चालेल.
आजही तुम्ही बघितले तर सर्व राजकीय पक्षांमध्ये एका पेक्षा एक बुद्धिमान आणि सामर्थवान नेते आहेत. त्या सगळ्यांना एकाच माळेचे मणी म्हणून कसे चालेल.  आपण म्हणतो आज परिवर्तनाची गरज आहे तर मग तुम्हाला वाल्ह्या वाटणारा नेता वाल्मिकी झाला तरी चालणारच आहे. नाही देशाचे भले फक्त माझ्या हातूनच झाले पाहिजे ह्या स्वार्थी  विचाराचा  त्याग झाला तर अनेक रखडलेले चांगले Project  पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही. शेवटी आपल्याला आपला भारत महान झालेला बघायचा आहे आणि ते आपल्या सगळ्यांना मिळून बनवायचा आहे. स्वातंत्र्या पूर्वी आपला लढा परकीयांशी होता पण आता लढा आपल्याच लोकाशी आहे ह्याचे भान आपण ठेवावयास हवे.