Thursday, November 21, 2024

Muktainagar -मुक्ताईनगर

Muktainagar -मुक्ताईनगर 


My article in Rotary Club of Pune Shivajinagar Diwali Push Issue
मुक्ताईनगर - माझे गाव
मी २०२३ मध्ये एक निर्णय घेतला तो असा कि आता पुढील काही वर्ष माझे मुक्काम पोस्ट मुक्ताईनगर (पूर्वी एदलाबाद म्हणून ओळखले जाणारे) माझे गाव येथे करावे. आणि गेल्या दोन वर्षात मी बराच काळ मुक्ताईनगर येथे आमच्या राहत्या घरी घालवला. माझ्या ह्या दोन वर्षातील माझे मुक्ताईनगर येथील अनुभव. माझे वडील डॉ . सी एस चौधरी वय वर्ष ८८ आणि आई वय वर्ष ८४ दोघेही खूप बिझी असतात . वडील १ वाजेपर्येंत दवाखाना करतात आणि नंतर त्यांचा बराच वेळ त्यांच्या एजुकेशन संस्थेचे काम करण्यात जातो. आणि आई सकाळी ४-५ लाच उठते आणि रात्री १० पर्येंत ती पण तिच्या विश्वात म्हणजे स्वयंपाक घरात बिझी असते. तिचे रोजचे दोनच टार्गेट असतात, सकाळी ९ वाजता आणि संध्याकाळी ६ वाजता वडिलांना तिच्या स्वतःच्या हाताने बनविलेले जेवण जेवू घालणे . त्या मुळे पुण्या सारख्या पुण्य भूमीत २५ वर्षे राहिलेला मी मुक्ताईनगर ला कसा वेळ घालवू शकेल हा माझ्या सकट सर्वांना पडलेला प्रश्न ?.
पण थँक्स टू माय IT Career. सोबत लॅपटॉप आणि वायफाय कनेक्टिव्हिटी असेल तर वेळेचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागू शकतो. तिथे आमचे शेत आहे. शेती करणे व समजून घेणे हा माझ्या साठी नवीन प्रोजेक्ट होता . आमच्या घरासमोरच माझ्या शालेय मित्राचे महाजन मेडिकल आहे. त्या मुळे दिवसातून एक चक्कर त्या दुकानावर जाणे म्हणजे पारावर जाऊन गप्पा करण्या सारखा माझा कार्यक्रम असतो.
मी फेब्रुवारी २०२३ ला मुक्ताईनगर ला गेलो त्या महिन्यात आमची मुक्ताबाईची यात्रा असते. आणि त्या वेळेस हर्षद आणि प्रियांका पण मुक्ताईनगर ला आले होते . आम्ही यात्रेत फिरत असतांना आमचे स्नेही हरी महाजन भेटले . हर्षद आणि प्रियांका दोघांनाही फिरस्ती आणि नवं नवीन ठिकाणे शोधणे आवडते त्यामुळे हरी महाजन ह्यांच्याशी बोलतांना विषय निघाला आजूबाजूची कोण कोणती ठिकाणे बघितली?.
आम्ही फक्त चांगदेव ला जाऊन आलो होतो . जवळचे हरताळे तलाव तेथील मंदिर आणि मेहूणचे मुक्ताबाईचे समाधी मंदिर आम्ही बघितलेच नाही. हरी महाजन दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता स्वतःची गाडी घेऊन आमच्या कडे आले आणि आम्हाला हरताळे ते मेहूण सफरी साठी घेऊन गेले.
आता तुम्हाला मुक्ताईनगर गावाची थोडक्यात ओळख करून देतो.
मुक्ताईनगर (पूर्वी एदलाबाद म्हणून ओळखले जाणारे) हे महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यामधील उत्तर महाराष्ट्रातील खान्देश भागात आहे.
हे गाव प्रसिद्ध संत मुक्ताबाई यांच्या नावावरून ओळखले जाते, भक्ति संप्रदायातील मुक्ताबाई एक महत्त्वाच्या संत होत्या आणि वारी परंपरेशी संबंधित आहेत. मुक्ताईनगर हे त्यांच्याशी असलेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारश्यामुळे ओळखले जाते.
हे गाव तापी नदीच्या काठी वसलेले आहे. अगदी जवळच असलेल्या चांगदेव येथे तापी आणि पूर्णा नदीचा संगम आहे त्या काठावर चांगदेव महाराज मंदिर आहे.ते महाराष्ट्रातील एक आदरणीय संत होते. त्यांचा संत ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताबाई यांच्यासोबत घनिष्ट संबंध होता. संत मुक्ताबाई ह्याची दोन महत्त्वाची मंदिरे आहेत. त्या पैकी एक चांगदेव गावाच्या पुढे मेहूण येथे आहे. आणि दुसरे मुक्ताईनगर येथे आहे.
मुक्ताईनगर जवळच हरताळे गावात एक सुंदर तलाव आहे आणि त्याच्या काठावर श्री. चक्रधरस्वामी मंदिर , पुरातन शिवशक्ती मंदिर आणि मातृ-पितृ भक्त श्रावण बाळाचे समाधी मंदिर आहे. आता येथे साई मंदिराची पण स्थापना करण्यात आली आहे. त्या मुळे हे छान पर्यटनाचे ठिकाण झाले आहे.
मध्य प्रदेश आणि विदर्भाच्या सीमेच्या जवळ स्थित असल्यामुळे, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर आणि
विदर्भातील प्रसिद्ध शेगाव येथून जवळ आहे.
आमचे दुसरे फॅमिली फ्रेंड डॉ. मनोज महाजन आणि स्वाती महाजन महिन्यातून एकदा शेगाव ला गजानन महाराज मंदिरात जातात . एकदा त्यांचाही असाच फोन आला काय करताय वेळ असेल तर चला शेगाव ला जाऊन येऊ या. आणि त्यांच्या सोबत माझी शेगाव वारी झाली .
आमच्या घरासमोरील दुसरे स्नेही सचिन बोरोले आणि त्यांच्या ग्रुप दरवर्षी मुक्ताईनगर ते शेगाव पायी वारी आयोजित करीत असतात . तोही अनुभव एकदा घ्यायचे ठरविले आहे.
आमचे एक फॅमिली फ्रेंड चंद्रशेखर बढे ह्यांच्या शेतावर रुईखेडा येथे तर आम्ही बऱ्याच वेळा जातो. ते आणि त्यांची फॅमिली खऱ्या अर्थाने शेती करतात. त्यांनी केलेले ऑरगॅनिक शेतीचे प्रयोग पाहण्या सारखे आहेत.
मी मुक्ताईनगर ला गेल्या गेल्या डिजिटल इंडिया चा अनुभव घ्यायचे ठरवले . आणि माझे वोटिंग कार्ड पुण्यावरून मुक्ताईनगर ला ट्रान्सफर करण्यासाठी ऑनलाईन अँप्लिकेशन केले . आणि माझे वोटिंग कार्ड चक्क कोणत्याही ऑफिस ला न जाता घरपोच ट्रान्सफर होऊन आले. Digital India Rocks.
आमचे फॅमिली फ्रेंड राजू पाटील ह्यांनी लागणारी कागद पत्रे मिळवून देण्यात खूप मदत केली.
लोकसभा निवडणुकीचा गावातील प्रचार आणि राजकारण जवळून बघता आले. श्रीमती रक्षा खडसे ह्यांना तिकीट मिळते का मिळत नाही ह्या पासून च्या चर्चा ते तिकीट मिळाल्या नंतर आमच्या घरासमोरील बीजेपी कार्यालयापासून त्यांची निघालेली पहिली प्रचार फेरी आणि दोन लाख बहात्तर फरकाने निवडून आल्यानंतर चा जल्लोष आणि युवा आणि क्रीडा मंत्री झाल्या नंतरची विजयी प्रचार फेरी हे सगळे मी अगदी जवळून अनुभवले.
रोटरीचा एक खूप छान प्रोजेक्ट मी येथे माझ्या जे .इ .स्कुल शाळेत सुरु केला आहे. तो म्हणजे १० विच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आयडील स्टडी अँप मोफत मिळवून देणे . त्या साठी लागणारा सर्व खर्च माझ्या रोटरी क्लब पुणे शिवाजी नगर क्लब ने दिला, त्या बद्दल त्यांचे खूप खूप आभार.
तर एकंदरीत Enjoying my stay at Muktainagar.
कधी वेळ मिळाला तर या मुक्ताईनगर ला .
मुक्ताईनगर च्या आसपास असलेली आणखी काही पर्यटन स्थळे
मनू देवीचे मंदिर : सातपुडा पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे प्रदेशाच्या सांस्कृतिक वारशाशी आणि स्थानिक परंपरांशी घट्ट जोडलेले आहे. मनू देवी आमची कुलदेवता आहे.
अजिंठा लेणी (Ajanta Caves): महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्यात वाघूर नदीच्या काठावर वसलेल्या आहेत. पुण्याहून औरंगाबाद मार्गे आल्यास औरंगाबाद जळगाव मार्गावर १३५ किलोमीटर अंतरावर अजिंठा लेणी आहेत . त्यानंतर तुम्ही मुक्ताईनगरला अजिंठा भुसावळ किंवा अजिंठा बोदवड मार्गे बाय रोड येऊ शकता. अजिंठा मुक्ताईनगर अंतर ८० किलोमीटर आहे.






रो. संजीव चौधरी
RCPS Diwali PUSH 2024-24



Muktainagar (formerly known as Edlabad) is a small town situated near the National Highway 6 (or Asian Highway 46), in Jalgaon district at the northern border of Maharashtra State in India. Muktainagar locates in Khandesh region of North Maharashtra.




Greetings, I have become a primary member of the BJP. You too can join the Party using my referral link : https://narendramodi.in/bjpsadasyata2024/NW1KCA #BJPSadasyata2024



दिनांक  २४-१२-२०१६ पुणे  मेट्रो उदघाटन  समारंभ :

माननीय  प्रधान मंत्री नरेंद्र मोदी  ह्यांनी पुणे  मेट्रो उदघाटन  समारंभा  मध्ये 

"गावाचा आत्मा तसाच ठेऊन शहरातील सर्व सुविधा गावांमध्ये निर्माण करून गावाचा विकास  करावा हे विचार व्यक्त केले. " हाच देशाचा सर्वांगीण विकास करण्याचा मंत्र आहे . 

असेच काहीसे विचार मी माझ्या ह्या २०१२ च्या ब्लॉग पोस्ट मध्ये लिहिले होते

खानदेशचा शोध घेतांना -RuralDevelopment------दिनांक ९-९-२०१२

गुरुवारच्या महाराष्ट्र टाईम्सच्या अंकात खानदेशाचा शोध घेताना संजय झेंडे यांनी लिहिलेला लेख वाचला . माझा जन्म आणि बालपण खान्देशातच गेले .त्यामुळे माझे खानदेश प्रेम परत एकदा
जागे झाले .माझे गाव मुक्ताईनगर पूर्वीचे एदलाबाद हे सातपुडा पर्वता पासून अगदी जवळ . त्या सातपुडा पर्वता मध्ये मनुदेवी हे अतिशय सुंदर स्थान आहे .२-३ वर्षपूर्वी आम्ही तेथे गेलो होतो तेव्हा काढलेले काही फोटो.


On the way to MANUDEVI SPOT - SATPUDA...



MANUDEVI spot - SATPUDA




We the Family at MANUDEVI - SATPUDA

एका छोट्या गावातून १० वी नंतर शिक्षणा साठी बाहेर पडलेला मी IT क्षेत्रात कामाची संधी मिळाल्या मुळे बर्याच वेळा अमेरिकेला जायचा योग आला . अमेरिकेतील New Hampshire (NH) state मधील Lebanon ह्या छोट्या गावात राहण्याची संधी मला बर्याच वेळेस मिळाली .अमेरिकेत मोठ्या शहरात राहणाऱ्या लोकांच्या दृष्टीने हे गाव म्हणजे एक खेडे होते . परंतु हेच छोटेसे गाव मला प्रचंड आवडते . तेथील निसर्ग सौंदर्य अप्रतिम . एका छोट्या गावात भारतीय वंशाच्या माणसाने Bharat Patel यांनी उभी केलेली Fluent Inc. आता ती Ansys Inc झालेली आहे .
Fluent Inc - Lebanon - New Hampshire USA


आम्ही जेव्हाही ह्या छोट्या गावात जायचो तेव्हा कंपनी आमचे वास्तव्य Marriott Residence Inn मध्ये करायची .

Marriott Residence Inn


View from Marriott - Lebanon NH USA


आज खानदेशातील माझ्या छोट्या गावाच्या आठवणी बरोबर अमेरिकेतील ह्या छोट्या गावाची आठवण का झाली?
खरे म्हणजे खूप वर्षापासून मनामध्ये घोळत असलेला हा विचार आज Blog Post च्या रूपाने प्रकट होत आहे . अमेरिकेला त्यांचे लहानातले लहान गाव एवढे सुंदर आणि सर्व सुविधांनी परिपूर्ण ठेवायला कसे जमले ? आमच्या देशात कधी गावे अशी सुंदर होतील? १० वर्षापूर्वी मला अमेरिकेला जावे लागायचे पण Technolgy एवढी वाढली आहे कि मला अमेरिकेला जायची गरजच पडत नाही . आता मी पुण्यात office किंवा घरात बसून सुद्धा ती सर्व कामे करू शकत आहे . मग पुणे, मुंबईच का ?

मी माझ्या गावात बसूनहि सर्व कामे का करू शकत नाही?

कारण हि सर्व कामे करायला सर्वात महत्वाचे असते Basic Infrastructure वीज हा प्रत्येक व्यवसायाचा प्राण असतो आणि मी जेव्हाही गावाकडे जातो तेव्हा तेथे १०-१० तास वीज नसते . (this is status Dated 9-12-2012)

परंतु आता गावाकडे  वीज पूर्ण वेळ असते . (This current status updated on  25-10-2020)

मेरा देश बदल राहा है 

मी माझ्या स्वानुभवावरून सांगतो अमेरिका कितीही सुंदर असली तरी आपले गाव आणि आपली माणसे ती आपलीच असतात .

राजकीय शक्तीने प्रत्येक गाव स्वयंपूर्ण करण्याकडे लक्ष केंद्रित केले तर महानगरांकडे येणारे माणसांचे लोंढे कमी होतील आणि आपल्याच गावात आणि आपल्याच माणसांमध्ये सुखी जीवन शोधण्याचा हरवलेला मंत्र प्रत्येकाला गवसेल .



Khandesh Visit - Muktainagar and Jalgaon 15-17th Sept 2012








Popatrao Pawar on Transforming Rural India :






The story of how a village in India went from being poverty-stricken and plagued by drought to having over 50 millionaires, 








महाराष्ट्र टाईम्सच्या अंकात  खानदेशाचा शोध घेताना हा संजय झेंडे यांनी लिहिलेला लेख 
खानदेशाचा शोध घेताना

खानदेशचा शोध घेतांना
 







शोध - In search of Chyren


Amazing Highway Road Development in My Area Muktainagar

मुक्ताईनगर ते मुंबई कार ने आलो गाडीत मीना च्या आवडत्या हिंदी गाण्यांची साथ होती.

 

Sunday, August 4, 2024

Happy Friendship Day



मै यादों का किस्सा खोलूँ तो,
कुछ दोस्त बहुत याद आते हैं….
…मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त बहुत याद आते हैं….

Happy Family Friendship Day



मै यादों का किस्सा खोलूँ तो,
कुछ दोस्त बहुत याद आते हैं….
…मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त बहुत याद आते हैं….

_…अब जाने कौन सी नगरी में,_
_…आबाद हैं जाकर मुद्दत से….
….मै देर रात तक जागूँ तो ,
कुछ दोस्त बहुत याद आते हैं….
….कुछ बातें थीं फूलों जैसी,….कुछ लहजे खुशबू जैसे थे,
….मै शहर-ए-चमन में टहलूँ तो,
….कुछ दोस्त बहुत याद आते हैं.
_…सबकी जिंदगी बदल गयी,_
_…एक नए सिरे में ढल गयी,_
_…किसी को नौकरी से फुरसत नही…_
_…किसी को दोस्तों की जरुरत नही…._
_…सारे यार गुम हो गये हैं…_
….”तू” से “तुम” और “आप” हो गये है….
….मै गुजरे पल को सोचूँ
तो, कुछ दोस्त बहुत याद आते हैं….
_…धीरे धीरे उम्र कट जाती है…_
_…जीवन यादों की पुस्तक बन जाती है,_
_…कभी किसी की याद बहुत तड़पाती है…_
_और कभी यादों के सहारे ज़िन्दगी कट जाती है …_
….किनारो पे सागर के खजाने नहीं आते,
….फिर जीवन में दोस्त पुराने नहीं आते…
_….जी लो इन पलों को हस के दोस्त,_
फिर लौट के दोस्ती के जमाने नहीं आते ….

…हरिवंशराय बच्चन

Sunday, July 21, 2024

Happy गुरु पौर्णिमा













Happy गुरु  पौर्णिमा 


कोणत्याही सयुक्तिक कारणाशिवाय स्वधर्माची स्तुती करू नका
आणि परधर्माची निंदा करू नका. धर्मावरील श्रद्धेमुळे आपल्या धर्माची
वारेमाप स्तुती आणि इतरांच्या धर्मांची निंदा करणारा आपल्याच धर्माची
हानी करत असतो. त्यापेक्षा दोन धर्मांमधे संवाद असणं ही चांगली गोष्ट आहे.
दुसऱ्या लोकांचे धर्म आणि विचार प्रत्येकाने समजून घ्यायला हवेत आणि
त्यांचा आदरही करायला हवा.
 
- सम्राट अशोक



तुम्हाला आयुष्यात आशावादी , हुशार , यशस्वी आणि सुखी व्हायचे असेल तर तसे गुण असणाऱ्या व्यक्तींच्या संपर्कात राहणे हा एक मार्ग असू शकतो. अश्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात वेग वेगळ्या नात्यांनी येतात शिक्षक/Mentor/colleague ,गुरु , नातेवाईक आणि मित्र
ह्या सगळ्या नात्यांमध्ये एक नाते common असते ते म्हणजे मित्रत्वाचे नाते . ह्या प्रत्येक नात्यातील मित्रत्वाचा धागा तुटला कि प्रत्येक नाते फक्त professional relationship होऊन जाते
.

ह्या पैकी मित्र  ह्याची निवड आपल्या हातात असते. पण तुमच्या professional Career ला खरी दिशा देणारे शिक्षक / Mentor / गुरु  आयुष्यात येणे हा एक योगच असतो. पण असे योग फक्त योगा योगाने घडावे अशी वाट बघत बसण्यापेक्षा चांगल्या शिक्षकाचा किंवा Mentor चा शोध घेणे हि सुद्धा तुमच्या चांगल्या Career ची सुरुवात असू शकते.


आणि आता तर Internet आणि Google search मुळे  असा शोध घेणे खूप सोपे झाले आहे.\


Always lookout for the right opportunity and don't forget
Opportunity dances with those already on the dance floor. 

मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी Rotary ह्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेचा एक भाग  आहे. आप आपल्या क्षेत्रात निपूण असलेले  असंख्य लीडर तुम्हाला येथे professional way ने सामाजिक कामे करितांना एकत्र भेटतील. 



मी Rotary Club of Pune Shivajinagar च्या पुश दिवाळी अंकात नाते आणि त्यातील मैत्रीचा धागा ह्यावर लिहिलेले एक skit







आज गुरु  पौर्णिमेच्या   निमित्ताने मी माझ्या आयुष्यात येऊन मला  वेळोवेळी शिकवून गेलेल्या माझ्या सर्व गुरूंना -  TIME,Books, Teacher ,Mentor , Google आणि माझे अंतर्मन - ह्यांना वंदन करतो . 



एकलव्य ह्याला गुरूंनी शिकवायला नकार दिला म्हणून त्यांचा पुतळा करून तो स्वतः शिकला 

Now there is GOOGLE , ChatGPT , many Internet GURUs to teach you at your convenience. Just you have to fix your learning path goals and learn to follow it.






Friday, June 21, 2024

Happy International YOGA DAY 2024





थोडे रोजच्या व्यायामा विषयी

तुमचे स्वस्थ आणि निरोगी शरीर हीच तुमची खरी शक्ती असते . तुमचे शरीर स्वस्थ आणि निरोगी नसेल तर प्रेम आणि ज्ञान मनातल्या मनात मरून जातील. मग तुम्ही कितीही कमावलेली पैश्याची शक्ती तुमच्या काही उपयोगी येणार नाही . पैसा आयुष्यात महत्वाचा आहेच पण प्रेम आणि ज्ञान ह्याशिवाय सुखाचा शोध पूर्ण होऊ शकत नाही . प्रेम आणि ज्ञान ह्यांना तुमच्या जीवनात आणायचे असेल तर बळाची (पैसा आणि निरोगी शरीर) ह्याची नितांत आवश्यकता असते. बलवान निरोगी शरीर , निर्मळ आणि सतेज बुद्धी आणि प्रेमळ परंतु प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होणारे ह्रुदय ह्या सर्वांची जीवनातील खर्या सुखाचा शोध घेण्यासाठी नितांत आवश्यकता असते. ह्या निरोगी ,स्वच्छ ,स्वस्थ शरीराच्या द्वारा सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असतो.
आणि कोरोनावर मात हि करायची असते.


म्हणून नियमित व्यायामाची सवय असणे खूप गरजेचे असते. तुमच्या व्यायामात खालील तिन्ही प्रकाराचा समावेश असणे आवश्यक आहे.


महत्वाची सूचना: कोणताही व्यायाम करण्या आधी वॉर्म अप करणे  आवश्यक असते

1)Stamina and Power-  Aerobics, Running, Walking, Weight lifting,Pushups
१)शक्ती आणि क्षमता ( धावणे आणि वजन उचलणे,पुशप  , सूर्यनमस्कार )

2)Stretching - ( Yoga - stretching exercise)
२) ताणाचे व्यायाम ( योगासन ,सूर्यनमस्कार)

3)Yoga - (Breathing exercise & Meditation)
३)योग - कपालभाती , प्राणायाम आणि ध्यान


सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे.




तुम्ही कोणत्याही वायोगटातील असाल आणि तुमचा आवडता व्यायाम प्रकार कोणताही असेना परंतु त्यात सुर्यनमस्काराची भर घालून तुम्ही काही दिवसातच अचंभित करणारे बदल तुमचे तुम्ही अनुभवू शकतात.


तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार करीत असाल पण त्यासाठी शरीर आधी वार्म-अप करणे जरुरी असते हे तुम्हाला माहीतच असेल.तर तुमच्या वार्म-अप प्रकारात सुर्यानमस्काराची भर घालून बघा आणि काही दिवसातच तुम्हाला हवे असलेले  बदल दिसावयास लागतील


सूर्यनमस्कार म्हणजे १२ आसने आपण  अनुक्रमाने करतो.


प्रत्येक आसन  घेतल्यानंतर त्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ थांबवायचा प्रयत्न तुम्ही करावयास हवा.


थोडक्यात पोझिशन घेतल्या नंतर मनातल्या मनात १० ते २१ पर्येत जसे जमेल तसे मोजा आणि मग पुढच्या पोझिशन कडे वळा.


तुमच्या वयानुसार आणि आवश्यकते नुसार तुम्ही असे ३ ते XXX सूर्यनमस्कार घालू शकता.


त्यानंतर तुम्ही तुमचा आवडता व्यायाम करावा.


कोणताही व्यायाम करितांना खालील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या


१) शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा नाही तर फायद्या पेक्षा शरीराचे नुकसान होऊ शकते. थोडक्यात व्यायाम करतांना शरीराचे ऐका.


२) व्यायामा सोबत शरीराची तेल मालिश सुद्धा खूप आवश्यक असते त्यामुळे रोज जमत नसेल तर आठवड्यातून १ किंवा २ दिवस मालिश साठी ठेवावा   मालिश करणे हा एक प्रकारे व्यायामच आहे.


३) व्यायामाबरोबर संतुलित आहाराचीही गरज असते त्यामुळे तुमच्या शरीराला अनुरुप असा संतुलित आहार घ्या. गरज पडल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.


४)घ्यानाची आवड असल्यास ते पण करून बघा. खरे म्हणजे व्यायाम करतांना तुमच्या शरीराशी संवाद हे एक ध्यानच असते आणि तसे केले कि तुम्हाला हवे असलेले बदल तुम्ही  लवकर घडवू शकतात.

व्यायामा सोबत योग्य आहाराची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते. तुमच्या शरीराला सर्व जीवनसत्वे ( Vitamins) योग्य प्रमाणात आवश्यक असतात . ड जीवनसत्व ( D - Vitamin) तर फक्त सकाळचे कोवळे उन अंगावर घेऊन फुकटात मिळवता येते. अशी सोय निसर्गाने करून ठेवली आहे पण  तिचा उपयोग करायला  आपण विसरतो किंवा आपल्या जवळ वेळ नसतो. ज्यांना वेळेची कमी आहे त्यांनी सकाळ च्या कोवळ्या उन्हात वरील व्यायामाचा एखादा प्रकार करून दुहेरी  फायदा करून घ्यावा .


मला अपेक्षित असलेला परिपूर्ण दिवस - Happy day of Life..!


व्यायाम - ध्यान - ज्ञान - प्रेम - कर्म -नृत्य


-Exercise - Meditation/Yoga - Knowledge - Love - Karmayog - Dance

दिवसाची सुरुवात व्यायाम करून झाली
   ध्यानामुळे ज्ञानाला अर्थ प्राप्त झाला    
        प्रेमामुळे कर्माचा आनंद मिळाला
 दिवस जगलो या आनंदाने मी नाचलो दमलो आणि  शांत झोपलो