थोडे रोजच्या व्यायामा विषयी
तुमचे स्वस्थ आणि निरोगी शरीर हीच तुमची खरी शक्ती असते . तुमचे शरीर स्वस्थ आणि निरोगी नसेल तर प्रेम आणि ज्ञान मनातल्या मनात मरून जातील. मग तुम्ही कितीही कमावलेली पैश्याची शक्ती तुमच्या काही उपयोगी येणार नाही . पैसा आयुष्यात महत्वाचा आहेच पण प्रेम आणि ज्ञान ह्याशिवाय सुखाचा शोध पूर्ण होऊ शकत नाही . प्रेम आणि ज्ञान ह्यांना तुमच्या जीवनात आणायचे असेल तर बळाची (पैसा आणि निरोगी शरीर) ह्याची नितांत आवश्यकता असते. बलवान निरोगी शरीर , निर्मळ आणि सतेज बुद्धी आणि प्रेमळ परंतु प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होणारे ह्रुदय ह्या सर्वांची जीवनातील खर्या सुखाचा शोध घेण्यासाठी नितांत आवश्यकता असते. ह्या निरोगी ,स्वच्छ ,स्वस्थ शरीराच्या द्वारा सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असतो.
आणि कोरोनावर मात हि करायची असते.
म्हणून नियमित व्यायामाची सवय असणे खूप गरजेचे असते. तुमच्या व्यायामात खालील तिन्ही प्रकाराचा समावेश असणे आवश्यक आहे.
महत्वाची सूचना: कोणताही व्यायाम करण्या आधी वॉर्म अप करणे आवश्यक असते
1)Stamina and Power- Aerobics, Running, Walking, Weight lifting,Pushups
१)शक्ती आणि क्षमता ( धावणे आणि वजन उचलणे,पुशप , सूर्यनमस्कार )
2)Stretching - ( Yoga - stretching exercise)
२) ताणाचे व्यायाम ( योगासन ,सूर्यनमस्कार)
3)Yoga - (Breathing exercise & Meditation)
३)योग - कपालभाती , प्राणायाम आणि ध्यान
सूर्यनमस्कार हा एक परिपूर्ण व्यायाम प्रकार आहे.
तुम्ही कोणत्याही वायोगटातील असाल आणि तुमचा आवडता व्यायाम प्रकार कोणताही असेना परंतु त्यात सुर्यनमस्काराची भर घालून तुम्ही काही दिवसातच अचंभित करणारे बदल तुमचे तुम्ही अनुभवू शकतात.
तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार करीत असाल पण त्यासाठी शरीर आधी वार्म-अप करणे जरुरी असते हे तुम्हाला माहीतच असेल.तर तुमच्या वार्म-अप प्रकारात सुर्यानमस्काराची भर घालून बघा आणि काही दिवसातच तुम्हाला हवे असलेले बदल दिसावयास लागतील
सूर्यनमस्कार म्हणजे १२ आसने आपण अनुक्रमाने करतो.
प्रत्येक आसन घेतल्यानंतर त्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ थांबवायचा प्रयत्न तुम्ही करावयास हवा.
थोडक्यात पोझिशन घेतल्या नंतर मनातल्या मनात १० ते २१ पर्येत जसे जमेल तसे मोजा आणि मग पुढच्या पोझिशन कडे वळा.
तुमच्या वयानुसार आणि आवश्यकते नुसार तुम्ही असे ३ ते XXX सूर्यनमस्कार घालू शकता.
त्यानंतर तुम्ही तुमचा आवडता व्यायाम करावा.
कोणताही व्यायाम करितांना खालील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या
१) शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा नाही तर फायद्या पेक्षा शरीराचे नुकसान होऊ शकते. थोडक्यात व्यायाम करतांना शरीराचे ऐका.
२) व्यायामा सोबत शरीराची तेल मालिश सुद्धा खूप आवश्यक असते त्यामुळे रोज जमत नसेल तर आठवड्यातून १ किंवा २ दिवस मालिश साठी ठेवावा मालिश करणे हा एक प्रकारे व्यायामच आहे.
३) व्यायामाबरोबर संतुलित आहाराचीही गरज असते त्यामुळे तुमच्या शरीराला अनुरुप असा संतुलित आहार घ्या. गरज पडल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.
४)घ्यानाची आवड असल्यास ते पण करून बघा. खरे म्हणजे व्यायाम करतांना तुमच्या शरीराशी संवाद हे एक ध्यानच असते आणि तसे केले कि तुम्हाला हवे असलेले बदल तुम्ही लवकर घडवू शकतात.
व्यायामा सोबत योग्य आहाराची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते. तुमच्या शरीराला सर्व जीवनसत्वे ( Vitamins) योग्य प्रमाणात आवश्यक असतात . ड जीवनसत्व ( D - Vitamin) तर फक्त सकाळचे कोवळे उन अंगावर घेऊन फुकटात मिळवता येते. अशी सोय निसर्गाने करून ठेवली आहे पण तिचा उपयोग करायला आपण विसरतो किंवा आपल्या जवळ वेळ नसतो. ज्यांना वेळेची कमी आहे त्यांनी सकाळ च्या कोवळ्या उन्हात वरील व्यायामाचा एखादा प्रकार करून दुहेरी फायदा करून घ्यावा .
मला अपेक्षित असलेला परिपूर्ण दिवस - Happy day of Life..!
व्यायाम - ध्यान - ज्ञान - प्रेम - कर्म -नृत्य
-Exercise - Meditation/Yoga - Knowledge - Love - Karmayog - Dance
दिवसाची सुरुवात व्यायाम करून झाली
ध्यानामुळे ज्ञानाला अर्थ प्राप्त झाला
प्रेमामुळे कर्माचा आनंद मिळाला
दिवस जगलो या आनंदाने मी नाचलो दमलो आणि शांत झोपलो
No comments:
Post a Comment