Tuesday, February 10, 2026

Going with The Flow of Universe

 


Alignment with the universe creates peace;

resistance creates suffering

“जेव्हा आपले विचार विश्वप्रवाहाशी जुळतात, तेव्हा घडणारी प्रत्येक गोष्ट आनंद देते;

विरोध केला की तीच गोष्ट दुःख बनते.






माझ्या जीवनप्रवासात मी आनंद आणि दुःख याबद्दल एक सोपी पण अत्यंत खोल अशी तत्त्वज्ञानाची शिकवण शिकलो आहे.


जेव्हा गोष्टी आपल्या मनासारख्या घडतात तेव्हा आपल्याला आनंद वाटतो, आणि जेव्हा त्या आपल्या अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत असे वाटते तेव्हा दुःख होते. पण वास्तवात आपण जीवनापासून वेगळे नाही—आपण या विशाल विश्वप्रवाहाचा एक अतिशय छोटा भाग आहोत.

घडणाऱ्या घटना आपल्या नियंत्रणामुळे नाहीत, तर त्या विश्वाच्या प्रवाहामुळे घडत असतात. जेव्हा आपली विचारधारा या विश्वप्रवाहाशी जुळते, तेव्हा घडणारी प्रत्येक गोष्ट यश, स्वीकार किंवा अंतःशांतीची भावना देते. तेव्हा आव्हानेसुद्धा पराभव न वाटता शिकवण वाटतात.

पण जेव्हा आपले विचार अनावश्यकपणे विश्वाच्या प्रवाहाला विरोध करतात, तेव्हाच त्या घटनांमधून दुःख, अस्वस्थता आणि पराभवाची भावना निर्माण होते.

आपण विश्वाच्या तुलनेत अतिशय लहान आहोत आणि विश्वाचा प्रवाह आपल्या सोयीप्रमाणे बदलण्याची आपली क्षमता नाही. म्हणूनच आपली विचारप्रक्रिया विश्वप्रवाहाशी सुसंगत ठेवणे हाच खरा शहाणपणाचा मार्ग आहे—कारण सुसंगतीत शांती आहे, आणि विरोधात दुःख आहे.


Through my life journey, I have learned one simple yet powerful philosophy about happiness and sadness.

We feel happy when things seem to go our way, and we feel sad when we believe things are not going our way. But in reality, we are not separate from life—we are a small part of the vast universal flow.

Events happen as part of this universal flow, not because we control them. When our thinking aligns with this flow, whatever happens feels like success, acceptance, or inner peace. Even challenges then carry a sense of learning rather than loss.

But when our thoughts unnecessarily try to resist or oppose the flow of the universe, the same events create feelings of sadness, frustration, or defeat.

We are very small in comparison to the universe, and we are never truly in a position to change its flow to suit our personal desires. Wisdom lies in aligning our thoughts with the universal flow—because alignment brings peace, and resistance brings suffering.





अनेक धार्मिक तत्त्वज्ञानांमध्ये हा विचार वेगवेगळ्या शब्दांत आणि संकल्पनांमधून मांडलेला आहे. त्या सर्वांचा मला आदर आहे. पण विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी याच सत्याला वैज्ञानिक भाषेत मांडतो — विश्वाचा प्रवाह.

हा प्रवाह नक्कीच अस्तित्वात आहे. त्यामुळेच सूर्य चालतो, चंद्र फिरतो, आकाशगंगा ठराविक नियमाने हालचाल करतात आणि आपण सर्वजण आपल्या जीवनप्रवासात पुढे जात असतो.

खरं तर आनंद किंवा दुःख निर्माण करणाऱ्या घटना नसतात, तर त्या घटनांकडे पाहण्याची आपली विचारप्रक्रिया असते. तीच परिस्थिती कधी विजयासारखी वाटते, तर कधी पराभवासारखी.

माझं साधं निरीक्षण असं आहे की —
जेव्हा आपली विचारप्रक्रिया विश्वाच्या प्रवाहाशी सुसंगत होते, तेव्हा जीवनात शांती, आनंद आणि समाधान निर्माण होतं. हाच खरा आनंद आहे.

पण जेव्हा आपली विचारप्रक्रिया अनावश्यकपणे विश्वाच्या प्रवाहाला विरोध करते, तेव्हा विश्वाच्या प्रवाहावर काहीच परिणाम होत नाही — तो जसाच आहे तसाच पुढे चालू राहतो. बदल फक्त आपल्या आत होतो; आणि तो बदल आपल्या जीवनप्रवासात अस्वस्थता, दुःख आणि संघर्षाची भावना निर्माण करतो.


Many religious philosophies explain this idea using different words and beliefs. I respect them all. But as a science student, I prefer to describe the same truth in scientific terms — the flow of the universe.

This flow undeniably exists. That is why the sun moves, the moon moves, galaxies move, and everything follows a certain order and rhythm. In the same way, each of us is moving through our own journey of life within this universal flow.

What actually creates happiness or sorrow is not the event itself, but our thought process about it. The same situation can feel like a victory or a loss, depending on how our mind interprets it.

My simple observation is this:
When our thoughts align with the flow of the universe, life feels peaceful, joyful, and meaningful. That is real happiness.

But when our thoughts unnecessarily oppose this universal flow, nothing changes in the universe — it continues as it always has. The only thing that changes is our inner experience, which becomes filled with restlessness, sorrow, and a sense of struggle during our life’s journey.


Wednesday, February 4, 2026

A Birthday Wrapped in Love and Memories

 


कृतज्ञतेच्या भावना शब्दांच्या पलीकडे

वाढदिवस म्हणजे फक्त केक, मेणबत्त्या किंवा उत्सव नाही.

तो जीवनाने दिलेली एक सुंदर आठवण असते की —
नाती महत्त्वाची आहेत, आठवणी महत्त्वाच्या आहेत, 

आणि प्रेम हेच खरे आशीर्वाद आहे.

या वर्षी माझा वाढदिवस अधिक खास झाला —
कोणत्या मोठ्या कार्यक्रमामुळे नाही,
तर अनेक मित्र, नातेवाईक आणि शुभचिंतकांकडून मिळालेल्या प्रेमळ शुभेच्छांमुळे.

मी मनापासून म्हणतो…

तुमच्या सर्वांच्या प्रेमळ वाढदिवसाच्या शुभेच्छा, 

आशीर्वाद आणि सद्भावना याबद्दल खूप खूप धन्यवाद. 🙏
तुमच्या संदेशांनी माझा दिवस खऱ्या अर्थाने सुंदर आणि अर्थपूर्ण केला.


मनाला स्पर्श करणारी एक खास भेट

या सर्व शुभेच्छांमध्ये एक सुंदर सरप्राइज माझ्या मनाला खूप स्पर्शून गेले.

माझी  सून प्रियांका हिने माझ्यासाठी एक अप्रतिम वाढदिवसाचा व्हिडिओ तयार केला,
त्यावर सुंदर कॅप्शन लिहिले, आठवणी गोळा केल्या…

हे फक्त व्हिडिओ नव्हते…

ते प्रेम, भावना आणि नात्यांनी विणलेले एक सुंदर स्मरण होते.

🤗🙏✨


हा व्हिडिओ येथे पाहा





कृतज्ञताच खरा उत्सव आहे

या वयात मला असे वाटते की आनंद हा वर्षे मोजण्यात नाही…

तर आशीर्वाद मोजण्यात आहे.

कुटुंब, मित्र, आरोग्य, कार्य, आणि प्रेमळ नाती —
हीच जीवनातील खरी संपत्ती आहे.

मी शब्दांच्या पलीकडे कृतज्ञ आहे.

आपण सर्वांनीच
ज्ञानात 10x वाढावे, आनंदात 100x उजळावे
आणि आपल्या जीवनातील माणसांना जपावे.

- संजीव  चौधरी 🙏✨ ३ फेब्रुवारी  २०२६

Monday, January 26, 2026

Indian Family System 2030




💐 Happy 5th Wedding Anniversary, Dear Harshvardhan & Priyanka! 💐

You both are the strong roots of our family tree, spreading love, values, and happiness.

God bless you always ❤️🌿


🌳 नात्यांबद्दल माझा विचार



माझ्या मते आयुष्य हे एका झाडासारखे आहे.


मूळ माणसं (Roots) म्हणजे आपले खरे जवळचे —

आपले कुटुंब, जे आपल्याला आतून मजबूत ठेवते.


फांदी आणि पानांची माणसं (Branches & Leaves) म्हणजे आपल्या प्रवासात जोडली गेलेली —

आपले मित्र, सोबती आणि आधार देणारे.


आणि मला असे वाटते…


जर तुमच्या आयुष्यात फक्त ५ लोक असे असतील

ज्यांना तुम्ही खऱ्या अर्थाने कुटुंब मानू शकता,

आणि १० मित्र असे असतील

ज्यांच्यावर तुम्ही कठीण प्रसंगी पूर्ण विश्वास ठेवू शकता,

तर तुम्ही खरोखरच या जगातील सर्वात धन्य व्यक्ती आहात.



My post published on 12/02/2018 09:06

भारतीय कुटुंब व्यवस्था २०३०

Happy Family Index



रोटरी  क्लब ऑफ  पुणे गांधीभवन यांनी आयोजित केलेल्या  Oratorian 2018 स्पर्धेत  भारतीय कुटुंब व्यवस्था २०३० (Indian Family System 2030)  ह्या विषयावर  १० मिनिटात  माझ्या मनात  घोळत असलेले विचार लोकांपर्येन्त पोहचविण्याची संधी मिळाली आणि मी त्यात यशस्वि हि झालो कारण तिन्ही परीक्षकांनी (वंदना बोकील-कुलकर्णी,उमेश आगाशे आणि तुषार सोनजे Vandana Bokil-Kulkarni, Umesh Agashe and Tushar Sonjeह्या तिघांनी  त्यांच्या भाषणामध्ये मी मांडलेल्या  मुद्द्यांचा उल्लेख  केला. श्रोत्यांमधील  एक श्रोता म्हणाला "भाषण उत्तम झाले  आता बोलले त्या प्रमाणे पुढे कृतीही करा ." तेव्हा आपण पुण्यात आहोत  ह्याची जाणीव झाली आणि  त्याच बरोबर भावना पोहोचल्याची पावतीपण मिळाली. 

   






Our Rotary club of Pune Shivajinagar Team






नमस्कार  व्यासपीठावरील मान्यवर  आणि कुटूंब वत्सल  श्रोतेगण 

आजचा  माझा विषय  2030 मधील भारतीय कुटुंब व्यवस्था हा आहे 


कुटुंब व्यवस्था जगात सगळीकडे आहे. परंतु भारतात ती खूप खंबीर आहे अशी जगभरात मान्यता आहे  . आणि २०३० मध्ये ती आणखी खंबीर होण्याच्या दिशेने आपण सर्वांनी मिळून प्रयत्न आतापासून करावयास हवे.  नाहीतर एके काळी  भारतातील कुटुंब व्ययस्था खूप खंबीर होती असा इतिहास २०5० नंतर सांगितला  जाईल.  


तुम्ही म्हणाल असा विचार मनात का आला ?


तर ह्याचे उत्तर संध्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना आणि संयोजकांनी स्पर्धेसाठी  निवडलेला  हा विषय 

हेच आहे  .  कारण आगी शिवाय धूर नसतो … काहीतरी उलथापालथ सामाजिक स्तरावर वैचारिक स्तरावर नक्कीच घडत आहे… किंबहुना ती सतत घडत असते . परिवर्तन  बदल हीच एक स्थिर गोस्ट आहे. Change is the only constant.



तर आधी आपण सद्य परिस्तितीत काय घडत आहे ह्याचा आढावा घेऊ 


१. बुद्दिजीवी तरुणाई म्हणते लग्न हि संकल्पना मोडीत निघत आहे. Live in relationship is a new trend. आता असे विचार तर २०३० मध्ये काय?


BTW Live in relationship ला मराठीत काय म्हणतात हे मी गुगल करून शोधायचा प्रयत्न केला पण उत्तर मिळाले नाही.  गंधर्व विवाह म्हणजे प्रेम विवाह . जो दुष्यन्त शकुंतला ह्यांनी  केला होता आणि त्यांच्या प्रेमाचे फळ त्यांचा पुत्र भरत ज्यामुळे आपल्या  देशाचे नाव भारत असे पडले. 

  

२. छोट्या छोट्या कारणावरून  घटस्फोटाचे वाढते प्रमाण 


३. दिवसेन दिवस  एकत्र कुटुंब पद्धतीचा होणार ऱ्हास आणि विभक्त कुटुंब पद्धती मध्ये होणारी वृद्धी आणि त्याला घटस्फोटाचा बागुलबुवा  


४. नौकरी निमित्त परदेशी गेलेली मुले आणि त्यांचे कुटुंब  आणि वर्षभरातात परदेश आणि भारत वाऱ्या करणारे रिटायर्ड आई वडील आणि त्यांचे भारतातील कुटुंब 


५. आणि दुष्काळात तेरावा महिना  म्हणावा कि काय नुकताच  आलेला अहवाल सांगतो  तरुण मुलींचे गुणोत्तर प्रमाण  २०२१ मध्ये ९०४ आणि २०३१ मध्ये ८९८  असेल असा अंदाज आहे. 


ह्या सर्व पार्श्वभूमीवर २०३० मधील भारतीय कुटुंब व्यवस्था कशी असेल. ? 


आपण  देशाची प्रगती GDP ( gross domestic product ) बघून ठरवतो पण मला वाटते देशाची खरी प्रगती मोजायची असेल तर (Happy Family Index असे नवीन मोजमाप शोधावयास  हवे आणि २०३० मधे त्याचा वापर करायची तयारी आतापासूनच करावयास हवी 


आणि त्यासाठी टेकनॉलॉजि चा उपयोग करता येऊ शकतो 

तुम्ही म्हणाल काहीतरीच काय टेक्नॉलॉजी काय करणार 

तर नुकताच  टेक्नॉलॉजी  मुले समाजात घडलेला एक बदल नमूद करू इच्छितो  


उबेर/ओला  ह्या मुळे झालेला बदल लक्षात घ्या 

सर्विस देणारे म्हणजे ड्राइवर आणि सर्विस घेणारे म्हणजे प्रवासी दोघांनाही शिस्त लावण्याचे काम टेक्नॉलॉजी ने केले आहे हा खरोखरीच विचार करण्याचा मुद्दा आहे. 

दोघं पैकी फक्त एकाला डोक्यावर बसविण्या पेक्षा दोघांकडूनही विश्वास आणि उत्तम सेवा ह्या मुल्ल्यांना  अधिक अधिकार आणि महत्व देण्यात आले आहेत. आणि लक्षात ठेवा भविष्यात हेच होणार आहे  विश्वास आणि उत्तम सेवा देणाऱ्या आणि  मूल्य निर्माण करणाऱ्या पद्धतीचं टिकणार आहेत. 


मग ती विवाह संस्था असो 

शिक्षण संस्था असो 

सहकारी संस्था असो 

कंपनी किंवा सर्विस कंपनी असो 

वा  पॉलिटल पार्टी असो 


उत्तम राष्ट्रासाठी उत्तम नागरिकांची गरज असते.उत्तम नागरिक हे चांगल्या कुटुंबातून येतात.

सुखी कुटुंब निर्माण करण्यासाठी माणुसकीची मुल्ले जपावी लागतात.

माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे. 


प्रेम,जिव्हाळा,अनुकंपा आणि दयाळूपणा ह्या गुणांनी कुटुंब बांधले जाते.

भारतीय समाजातील कौटुंबिक मुल्ले समजून घेण्यासाठी खालील चार तत्वे विचारात घेतली जातात


१)एक स्त्री व एक पुरुष यामध्ये कधीही न तुटणारा बंध म्हणून विवाहाला पाठींबा.

सद्य परिस्थिती: वाढते घटस्फोटाचे प्रमाण चिंतेचा विषय. 

पण घटस्फोट झाला तरी पती पत्नी चे नाते मित्रत्वाचे असावयास काय हरकत आहे. 

पण जेव्हा लग्न हे फक्त प्रॉपर्टीवर डोळा ठेऊन केले जाते आणि घटस्फोट हि भविष्यातील योजना  असते  तेव्हा लग्न हे पवित्र बंधनाच्या सीमा तोडून एक फक्त व्यवहार मात्र होऊन जाते . 

ह्या प्रकारावर  वेळेतच अंकुश घालण्याची गरज आहे.  



२)कुटुंब संस्थेमध्ये नवरा हा कुटुंब प्रमुख आणि बायको हि कुटुंब उभारणी करणारी कार्यकर्ती


सद्य परिस्थिती: दोघांनी आपापली क्षमता ओळखून स्वताहून जबाबदारी स्वीकारावी किंवा वाटून घ्यावी आणि एकमेकांना  योग्य तो सहयोग मानापमानाचा विचार न करिता द्यावा हि काळाची गरज.



३)मुलांचे शिक्षण त्यांच्यावर होणारे संस्कार आणि शिस्त हि आई वडिलांची जबाबदारी.


सद्य परिस्थिती: इंटरनेटमुळे नको त्या वयात नको ती माहिती आणि संस्कार ह्याची भीती त्यामुळे आई वडिलांची जबाबदारी आणखीन वाढली आहे.


कुटुंब हि प्रत्येक व्यक्तीची पहिली शाळा असते  आणि  आई हि पहिली शिक्षिका 



४)कुटुंबातील वृद्धांची जबाबदारी स्वीकारणे आणि इतर नाते संबंधांबरोबर सुसंवाद साधणे.


सद्य परिस्थिती: वेळेचा अभाव. सोप्या जीवन शैलीचा अभाव आणि उगाच न पेलवणाऱ्या उद्दिष्टांची कास निर्माण करते स्वकीयांपासून दुरावा.



तुम्ही एका सक्षम सुखी कुटुंबाची निर्मिती केली आहे असा तुमचा विश्वास असेल तर मग तुमच्या कुटुंबाच्या सभासदांची कक्षा वाढवून बघा.

तुमच्या कुटुंबासाठी काम करणारा वर्ग तो पण तुमच्याच कुटुंबाचा हिस्सा आहे हा विचार करून बघा.

परदेशी  राहून आलेल्या लोकांना घरकामासाठी कामगार वर्ग मिळणे हि आपल्या देशात केवढी मोठी उपलब्धी आहे ह्याची नक्कीच जाणीव असेल. पण बाई आणि मलिकनबाई ह्या दोघांनीही काळाची गरज ओळखून विश्वास आणि ऊत्तम सेवा दोन्ही बाजूंनी वाढवून मूल्य निर्मिती करण्याची  गरज आहे नाहीतर हा पण इतिहास व्हायला वेळ लागणार नाही.

गावाकडे शेती साठी मजूर मिळणे दिवसेन दिवस कठीण होत चालले आहे. त्यावरही विचार करावयास हवा . त्यामुळे  शेतीसाठी  नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतावर नवीन जीवन शैलीचा आनंद घेणारी जास्तीत जास्त सुखी कुटुंबे २०३० मध्ये निर्माण होतील असा माझा विश्वास आहे.  तसे झाले तर गावांचा विकास होईल आणि शहरांकडे येणार ओघ थांबेल. 


तुम्ही एखादी कंपनी चालवीत असाल किंवा एखादया संस्थेवर काम करीत असाल तर ते पण तुमचे कुटुंबच आहे असा विचार करून ते पण सुखी करण्या साठी प्रयत्न करून बघा.

तुमच्याच सुखात भर पडेल. थोडक्यात २०३० मधील कुटुंब व्यवस्था वसुधैव कुटुम्बकम् च्या दिशेने वाटचाल करणारी असेल असा माझा विश्वास आहे. आणि तरुणाई नक्कीच त्या दिशेने वाटचाल करेल . गरज आहे त्यांना समजावून घेऊन जुन्या नियमातील नि काढून यमाचे म्हणजे मूल्यांचे मूल्य नवीन पिढीच्या नवीन विचारांच्या नियमात बसवून मान्य करण्याची. नियम हे कालानुरूप बदलत असतात पण त्यातील मूल्य म्हणजे यम हे त्रिकालाबाधित सत्य असते. 








❤️ In a world moving fast, dinner together is still the most beautiful tradition.
🌳 Roots grow stronger when families sit together and listen to each other.



🇮🇳 Indian families don’t just share food… they share stories, values, and love.


Wednesday, January 14, 2026

MuktAI

 


MuktAI – Where AI Means Awareness Intelligence 

At MuktAI, AI does not stand only for Artificial Intelligence.
For us, AI primarily means Awareness Intelligence.

Artificial Intelligence is a powerful tool—important, useful, and very much the need of the hour.
But tools keep changing.
What truly lasts and empowers human life is Awareness Intelligence.

आमचा उद्देश म्हणजे डिजिटल तफावत कमी करणे, म्हणजे शहरांमध्ये सहज उपलब्ध असलेले आधुनिक व जागतिक दर्जाचे IT ज्ञान प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना आणि लहान उद्योजकांना थेट पोहोचवणे.

खूप जणांना भीती वाटते की AI मुळे नोकऱ्या कमी होतील, पण खरं म्हणजे धोका AI मध्ये नाही तर त्याचे कौशल्य शिकण्याच्या संधीच्या कमतरतेत आहे.
भविष्यात नोकऱ्या संपणार नाहीत, तर त्या मिळतील त्या लोकांना जे नवीनतम AI ज्ञान आत्मसात करतील.


For more details visit

MuktAI.in

My Posts
My Videos
My Profile