Monday, October 21, 2019

Vote for Better India




 वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही

वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे काय ? असा मी माझ्याच मनाला प्रश्न विचारला तर उत्तर आले "भारत देशाच्या लोकशाहीवर आधारित घटनेच्या चौकटीत बसणारी आपण निवडलेली जीवन जगण्याची पद्धत म्हणजे आपले वैयक्तिक स्वातंत्र्य" पण ते वैयक्तिक स्वातंत्र्य जगतांना तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीलाही तेवढेच वैयक्तिक स्वातंत्र्य आहे ह्याचे भान ठेवावयास हवे.

Consider the rights of others before your own feelings, and the feelings of others before your own rights. John Wooden

देशाच्या घटनेच्या चौकटीत तुमच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची चौकट बसावितांना तुम्हाला आणखी एका चौकटीचा विचार करावा लागतो ती म्हणजे तुमच्या जन्मामुळे तुम्हाला मिळालेली सामाजिक चौकट. तिचे

अस्तित्व मानायचे कि नाही हे सर्वसी तुमच्यावर अवलंबून असते आपल्या घटनेने तेवढे अधिकार आपलाल्या दिले आहेत ह्यावरच आपली घटना किती चांगली आणि उच्च प्रतीची आहे ह्याची तुम्हाला आज नाही पण काही वर्षानंतर नक्कीच प्रचीती येईल. चीन प्रगती करतो आहे आणि आपणही Developing Countries च्या शर्यती मध्ये आहोत पण माणुसकीच्या मुल्यांवर आधारित भारताने केलेली प्रगती नक्कीच उजवी ठरेल असा माझा विश्वास आहे. सध्या विश्वास बसायला अवघड जाईल पण येणारा काळ नक्कीच ह्याचे होकारात्मक उत्तर देईल.

घटना म्हणजे नियम आलेच आणि नियमा बद्दल मागील एका ब्लॉग मध्ये मी माझे विचार लिहिले आहेतच.


"नियम हे  समाज सुधारणे साठी  समाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक  नियमात एक पळवाट  लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी  त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते."

असाच एक "सहकार" कायदा ज्याचा खरा उद्देश खूप चांगला पण "मिल बाटके खाव" वृत्तीने पार वाट लागून वाया गेलेली एक चळवळ. Professional, Attitude ह्या नावाखाली आत्मकेंद्रित झालेल्या तरुण पिढीला तर सहकार ह्या बद्दल किती माहिती असेल ह्याबद्दल शंकाच वाटते. पण सहकारात जो सावळा गोंधळ चाललेला असतो ते बघून त्यांची अनास्था योग्यच वाटते.पण हे चित्र बदलायला हवे आणि सरकारने उचललेल्या पाउलास आपण योग्य प्रतिसाद देऊन एक आशावादी चित्र निर्माण करावयास हवे.

अर्थात सोशल मीडिया ,  सोशल एंटरप्राइज  ,सोशल बिझनेस   हि सगळी सहकाराची २१  व्या  शतकातील नवीन रूपे  आहेत आणि तरुण पिढी ती आत्मसात करीत आहेत किंवा  नसेल तर त्यांनी नक्कीच त्याबद्दल माहिती करून घ्यावीत.  काळाच्या ओघात  परिस्थिजन्य बदल हे आवश्यकच असतात टिकून आणि तग  धरून राहण्या साठी . 



















Friday, June 21, 2019

World Yoga Day


The best investment is invest time in yourself. 
 Make Yoga and  Exercise  part of your everyday schedule. 
 Wish you all a very happy World YOGA day

थोडे रोजच्या व्यायामा विषयी








Thursday, May 23, 2019

भारतीय राजकारण आणि निवडणूक 2019











मी २ फेब्रुवारी २०१४ ला त्या वर्षातील निवडणुकीचा आधी खालील ब्लाँग लिहिला होता 

Sunday, February 2, 2014


                                                 कर्मयोग आणि भारतीय राजकारण
सध्या भारतीय राजकारणातील अनेक राजकीय ग्रहांना सूर्य (पंतप्रधान) होण्याचे वेध लागले आहेत. बघू या कोण होते ते. मला राज कारणाचा जास्त अभ्यास नाही पण काही दिवसांपूर्वी वाचलेले मोदींच्या काल्पेनेतील भारत हे विचार आवडले.


चांगले विचार  हे चांगलेच असतात सत्तेवर कोणीही आले तरी त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावयास हवा.
फक्त विरोधाला विरोध म्हणून चांगल्या विचारांना विरोध कोणी करू नये.खैरात म्हणून मिळालेल्या पैश्या पेक्षा कर्मयोगाने कष्ट करून मिळविलेला पैसा श्रेष्ट ह्याची शिकवण आणि आठवण हि आपली खरी भारतीय संस्कृति आहे ह्याची जाण तळागाळा पर्येंत करून देण्याची गरज आहे आणि त्या साठी तश्या योजना आखण्याची खरी गरज आहे.
भ्रष्टाचार मिटवणे हे गरजेचे आहे पण त्यामागे विकासाचा मुद्दा मागे पडावयास नको ह्याची पण खबरदारी घेणे हीच काळाची आणि भारतीय राजकारणाची खरी गरज आहे.

 -------------------------------------------------------

दिनांक २९-जानेवारी-२०१९

माझ्या मते मोदींनी त्याच्या कल्पनेतील भारताचे स्वप्न पूर्ण करण्या साठी त्यांच्या दृष्टीने परिपूर्ण प्रयत्न केलेत . परंतु ५ वर्षात १००% बदल घडू शकत नाही हे सर्वांना पटत असेल पण मान्य  नसेल कारण ह्यालाच राजकारण म्हणतात . 
पण शेवटी खूप अभ्यास केल्यानंतर पाल्याला ७०% मार्क मिळाल्यानंतर मिळवलेल्या ७०% मार्कांचे अभिनंदन  करायचे का न मिळालेल्या ३०% बद्दल त्याला दोष द्यायचा का जागृत पालक होऊन मुलाचे खरे गुण   ओळखून पुढील ध्येय्या साठी प्रोत्साहित करायचे हे सर्वस्वी पालकांच्या प्रगल्फतेवर अवलंबून असते.  आणि ह्या निवडणुकीत पालकाच्या भूमिकेत  मायबाप जनता आहे.  

पालकाची जबादारी मुलांच्या फक्त परीक्षेतील मार्कांवर लक्ष ठेवणे इतकीच नसते तर परीक्षा पास झाल्यानंतर  पाल्याला नौकरी किंवा व्यायसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करणे हि पण असते नाहीतर आयुष्यभर कमावलेल्या पुंजीचे लाखाचे १२ हजार व्हायला वेळ लागत नाही. 



  • गरिबांना किमान वेतन देऊन भागणार नाही. किमान वेतनात आनंदी  कसे राहायचे हे पण त्यांना शिकवावे लागेल.  राहुल गांधी आणि त्यांचे सर्व राजकारणी सहकारी स्वतः किमान वेतन घेऊन हा नवीन राम  राज्याचा मार्ग  जनतेला सउधाहरण दाखवून देतील
  • मग उरलेल्या १०% टॅक्स भरणाऱ्या लोकांनाही ह्या साध्या सरळ मार्गाची जाणीव होईल आणि आयुष्यात नौकरी आणि बिझनेस करून सुखाचा जीव दुःखात घालवला ह्याची प्रचिती त्यांनाही होईल आणि त्यांची चुकलेली वाट शेवटी ह्या राजमार्गाला मिळेल आणि भारत एक संपूर्ण किमान वेतनात सुखी आणि  समाधानानं जगणाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जाईल.

पण भाऊ मग हे किमान वेतन देण्या साठी  पैसा कुठून येईल?
असो:

शेवटी लोकशाही आहे कल्पनेतला भारत कसा असावा ह्यावर कुणालाच निर्बंध नाही पण मतदारांनी  भविष्याची कल्पना करून आणि वास्तवाचे भान ठेऊन मतदान करावे एवढीच अपेक्षा आपण करू शकतो. 





Friday, March 8, 2019

Happy Women's Day




The stars are Beauty of sky, the grass is the beauty of Meadow and the Woman is the Beauty of Life. Happy Women’s Day.





My Favorite video Song with beautiful visual presentation by 2 sisters with East & West culture...
New India need such sweet mix of both culture...





Wednesday, January 16, 2019

Sunday, January 13, 2019

Family and your bonded community matters







Year 2019 started with back to back family events and memorable family get-together event where we exchanged and practiced our Yoga knowledge. At the end to experience and share real happiness family and your bonded community matters...😊  


वर्षाची सुरुवात २ जानेवारी आईच्या वाढ दिवसाने झाली 

आणि त्याच दिवशी मामाच्या मुलीच्या मुलाचे पण लग्न होते  


आणि पुढच्यात आठवड्यात अमेरिकेहून आलेल्या भाच्यांसाठी आम्ही एकत्र आलो 

अशी हि वर्षाची सुरुवात झाली 
आणि 
 २०१८ चा शेवटही कुटुंबातील माझा पुतण्या  नीरज आणि प्रज्ञा ह्यांच्या लग्नाने झाला. 


अश्या ह्या आमच्या कौटूंबिक सोहळ्यांनी  वर्षाचा शेवट आणि सुरुवात झाली . आणि भेटी गांठीं बरोबर थोडे रोजच्या व्यायामा विषयी  ह्यावर चर्चाही झाली .


Daily simple exercise Routines

Be The Blogger

Smart Society

Smart School

Smart Rotary club