डॉ . सी . एस चौधरी
सहस्रचंद्रदर्शन सोहळा
७ ऑक्टोबर २०१७
मुक्ताईनगर
धन्यवाद आजच्या डिजिटल युगात वेळात वेळ काढून आमच्या कौटुंबिक सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या (किन्ही- भुसावळ खान्देश ) येथून आलेल्या आणि विदर्भातून आणि थेट नागपूर येथून आलेल्या आमच्या सर्व नातेवाईकांना मनापासून धन्यवाद. ५६ वर्षे मुक्ताईनगर येथे वैद्यकीय व्यावसाय आणि शैक्षणिक संस्थेशी संलग्न सामाजिक कार्य करून दादांनी जोडलेली माणसे त्यांची उपस्थिती आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी क्षणोक्षणी केलेली निःस्वार्थ मदत आणि दादांवरील प्रेम मनाला स्पर्श करून गेले.त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद
खास करून आशाताईने नागपूर येथून करून आणलेल्या १०८ पणत्या आणि व्यक्त केलेले मनोगत अप्रतिम होते. ५६ वर्षे मुक्ताईनगर येथे वैद्यकीय व्यावसाय आणि सामाजिक कार्य करून दादांनी जोडलेली माणसे आणि त्यांची उपस्थिती आणि दादांवरील प्रेम मनाला स्पर्श करून गेले.
खास आठवण ठेऊन सौ. मंदाकाकू खडसे आणि सौ.रोहिणी खडसे खेवलकर (अध्यक्ष जे डी सी सी बँक जळगाव ) हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
सौ. रोहिणी ह्यांनी उत्तम मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल धन्यवाद.
आमदार खडसे काका बाहेर गावी गेल्या कारणाने उपस्थित राहू शकले नाहीत पण त्यांनी आवर्जून फोन केला त्याबद्दल धन्यवाद.
खासदार रक्षा खडसे ह्यांना बाहेरगावी जायचे होते त्यामुळे त्या आठवण ठेऊन सकाळीच घरी येऊन दादांना शुभेच्छा देऊन गेल्यात त्या बद्दल त्यांचे धन्यवाद.
प्रि . व्ही आर पाटील सर ह्यांनी मनोगत व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.प्रा साळवीं सर ह्यांनी उत्तम निवेदन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद . प्री सुजित पाटील सर , उ.प्रा एस एन पाटील सर , राजू पाटील आणि मुक्ताईनगर मधील दादांचे अनेक सहकारी सर्वांची नावे घेऊ शकलो नाही त्या साठी क्षमस्व आणि सर्वांचे मनापासून आभार .
No comments:
Post a Comment