Saturday, September 1, 2012

Guide..The movie

गाईड हा माझा all time favorite चित्रपट आहे .R.K. Narayanan ह्यांच्या कादंबरीवर आधारित हा चित्रपट तुम्ही बघितला नसेल तर जरूर बघा . खास करून नवीन पिढीने जुन्या पिढीतील हा चित्रपट न बघणारा विरळाच . मानवी आयुष्यात येणाऱ्या अनेक चढ उताराचे अतिशय सुंदर चित्रण ह्या चित्रपटाद्वारे बघायला मिळते . मनाला पडणारे प्रश्न देव आहे का नाही ,श्रद्धा असावी का नसावी ह्याचे समर्पक उत्तर तुम्हाला ह्या चित्रपटात बघायला मिळेल .

सरळ मार्गाने जीवन जगणारा राजू गाईडच्या आयुष्यात अपघाताने लग्न झालेली रोजी येते .रोजी एका श्रीमंत म्हाताऱ्या archaeologist मार्को ची पत्नी असते .आपल्या शोध कार्यात मग्न असणाऱ्या मार्कोला रोजी
कडे लक्ष द्यायला वेळ नसतो .

रोजी एका वेश्येची सुंदर मुलगी असते आणि आपल्या मुलीने ह्या
वेश्या व्यवसायात राहू नये म्हणून तिच्या आईने तडजोड स्वीकारून हे लग्न जुळवलेले असते .

रोजीला नृत्याची खूप आवड आहे ह्याची जाणीव राजू गाईडला एकदा फिरत असतांना उत्स्फूर्त पणे रोजीने केलेल्या नृत्यावरून येते .



एकदा रोजी मार्को च्या दुर्लक्षित स्वभावाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते पण राजू गाईड एक मित्र म्हणून तिला सावरतो आणि तिच्या हक्काची जाणीव करून देतो .परंतु रोजीला जेव्हा मार्कोच्या बाहेरख्याली पणाची जाणीव होते तेव्हा ती त्याला सोडून सरळ राजू गाईडच्या घरी येते . पण मध्यम वर्गीय राजू गाईडचे घर सामाजिक दबावा मुळे तुटते . राजू गाईडचा मामा आईला घेऊन निघून जातो .हा धक्का सहन करून राजू गाईड रोजी बरोबर नवीन प्रवास सुरु करतो . तिच्या अंगात असलेल्या नृत्याच्या कलागुणांना त्याचे मार्केटिंग गुण वापरून तो एका प्रतिष्ठित उंचीवर पोहोचवतो .




परंतु पैश्या सोबत मित्राच्या संगतीमुळे दारू आणि जुगाराचे राजू गाईडला लागलेले व्यसन दोघांमध्ये थोडा दुरावा निर्माण करते .
दिल के मेरे पास हो इतने
फिर भी हो  कितनी दूर
तुम मुझसे में दिल  से परेशान
दोनों है मजबूर
ऐसे में किसको कौन मनाये
दिन ढल जाए हाय रात न जाए
तू तो  न  आये तेरी याद सताए




अश्या मनस्थितीत मार्को कडून आलेली दागिन्याची भेट जी तिच्या सहीमुळे तिला मिळणार असते ,राजू गाईडला अस्वस्थ (insecure) करते . परंतु मार्कोच्या ह्या भेट वस्तूची कल्पना रोजीला नसते .
रोजीला मार्कोची परत आठवण होऊ नये म्हणून in-secured राजू गाईड रोजीची खोटी सही कागदपत्रांवर करतो आणि फसतो . त्याला जेलमध्ये जावे लागते आणि रोजीच्या नजरेतून तो पूर्णपणे उतरतो .
त्यावेळेस त्याने म्हटलेला dialogue खूपचं छान आहे .


रोजी  समज़ रहा था दुनिया समजे न समज़े पर रोजी जरुर समज जाएगी पर हाय ये समज भी कितनी नासमज़ निकली"

"चलो सुहाना भरम तो टूटा जाना के हुस्न क्या हैं
कहती हैं जिस को प्यार दुनिया क्या चीज क्या बला हैं "



जेल मधून बाहेर आल्या नंतर कुठे जावे ह्या संभ्रमात राजू गाईड एका गावात येवून पोहचतो आणि एका मंदिरात राहायला लागतो . खूप अनुभवी आणि शिक्षित असलेल्या राजू गाईडच्या विवेकी कथा ऐकून गावकरी त्याला महात्मा समजू लागतात आणि एके वर्षी त्या गावावर दुष्काळाचे सावट येते ....
अश्या दुष्काळ ग्रस्थ परिस्थितीत एका गावकरयाच्या गैरसमजुतीतून राजू गाईड पाउस पडे पर्येंत आमरण उपवास करणार आहे असा गैरसमज गावात पसरतो आणि त्यांच्या अंध श्रद्धे पुढे झुकून राजू गाईडला उपवासाला बसावे लागते 


राजू गाईडच्या ह्या उपवासाची गोष्ट गावोगाव पसरते आणि असंख्य लोक ह्या महात्म्याच्या दर्शन साठी गर्दी करू लागतात आणि तेथे त्याची सोडून गेलेली आई आणि रोजी पण येते . त्यावेळेस त्याच्या मनातील द्वंद्व शब्दात वर्णन करणे अशक्य .....


No comments: