Thursday, February 28, 2013

My मराठी

मराठी राजभाषा दिनानिमित्त थोडे आपल्या मराठी भाषेबद्दल .अर्थात मराठी भाषेबद्दल अधिकारवाणीने बोलावे असे माझ्या जवळ  ती माझी मातृ भाषा आहे एवढेच प्रमाणपत्र आहे. ती कागदावर लिहितांना अजूनही माझ्याकडून शुद्ध लेखनाच्या खूप चुका होऊ शकतात हि वस्तुस्थिती आहे तरीपण मी कमीत कमी शुद्ध लेखनाच्या चुका करून माझे ब्लॉग मराठीत लिहू शकतो हि नवीन तंत्र ज्ञानाची कमाल आहे. त्या बद्द्ल सविस्तर तुम्ही खालील लिंकवर वाचू शकता .


आपल्या मातृभाषेशिवाय ज्या भाषेमुळे आपल्या  कारकिर्दीची वाढ होऊ शकते ती भाषा आपण शिकावयास हवी हि काळाची गरज आहे पण खर्या सुखाचा अनुभव  घेण्यासाठी मातृभाषेची जाण ठेवणे अनिवार्य आहे.
काही भावना कळायला भाषेची गरज नसते पण असे  नेहमीच घडत नसते समोरच्या व्यक्ती पर्येंत तुमच्या भावना पोहचवायला मातृभाषे सारखे दुसरे साधे सरळ सोपे साधन नसते. 
मी ह्या लेखाचे नाव मुद्दाम "My मराठी" असे लिहिले आहे कारण ती आजच्या आपल्या बोलीभाषेची खरी स्थिती आहे.जे घडते आहे ते चूक का बरोबर ह्या वादात मला पडायचे नाही.



मी १९९२ मध्ये  In Search Of Chyren असे शीर्षक असलेले एक पुस्तक प्रकाशित केले होते.
मी जेव्हा ते पुस्तक एका लेखन क्षेत्रातील संबधित असलेल्या व्यक्तीला दाखवायला गेलो तेव्हा पुस्तकाचे शीर्षक बघुन आणि मी जळगावचा आहे ह्या दोन मुद्द्यांवरून त्या पुस्तकात काहीच नाही हे त्याने पुस्तक न वाचता मत मांडले होते.

त्या पुस्तकातील काही लेख येथे देत आहे 



आत्मपरीक्षण - एक चिंतन


शेवटी एवढेच माझ्या अनुभवाचे बोल सांगेन .
मला पैसा संगणकाची भाषा शिकल्यामुळे आणि इंग्रजीचे ज्ञान असल्यामुळे मिळाला  आणि आनंद मातृभाषेत आपल्या लोकांशी संवाद साधून आणि मराठीत ब्लॉग लिहून मिळाला.

No comments: