Sunday, January 27, 2013

Real story of a Phoenix Plant





हि गोष्ट आहे वर चित्रात दाखविलेल्या रोपट्याची . मला ते माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून आमच्या कंपनी कडून (Fluent India ) सन २००२ मध्ये मिळाले होते. घरातील एका कुंडीत मी ते लावले . त्या वेळेस मी माझ्या जुन्या फ्लाट मध्ये राहत होतो . साधारण एक वर्ष ते टिकले. घरात असल्या मुळे म्हणा किंवा कदाचित पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे म्हणा पण ते कोमेजुन गेले आणि आमच्या दृष्टीने ते मरण पावले  .मग त्या कुंडीत दुसरे कोणतेच झाड लावले नाही आणि त्या कुंडीचा  उपयोग फक्त उदबत्ती लावण्या साठी होऊ लागला . त्यानंतर २००६ मध्ये आम्ही आमच्या नवीन फ्लाट मध्ये आलो . त्याला असलेल्या सुंदर टेरेस मध्ये आमच्या कुंड्या ठेवल्या. त्यात हि रोप नसलेली पण उदबत्तीची राख असलेली कुंडी पण होती.
.
..आणि एक दिवस चमत्कार झाला राख असलेल्या त्या कुंडीतून त्या कोमेजुन गेलेल्या आमच्या दृष्टीने मरण पावलेल्या रोपट्याने पुन्हा जन्म घेतला बघता बघता ते वाढू लागले बहरू  लागले आणि त्याला चक्क सुंदर फुले येऊ लागली. मला त्या रोपाचे नाव माहित नाही म्हणून मी त्याला Phoenix Plant म्हणतो.


2 comments:

Yummy Treats said...

Kardali (Marathi: कर्दळी)
Botanical name: Canna x generalis
Good blog.

Sanjeev Chaudhary said...

thanks it is Marathi: कर्दळी Botanical name: Canna x generalis