गांधीना विरोध करणे हि तरुण पिढी मध्ये आपला वेगळेपणा सिद्ध करण्याची सोपी पद्धत कधी रूढ झाली ते मला माहित नाही , पण मी शाळेत असतांना कळत नसूनही सभोवतालील गांधी विरोधी विचार ऐकून मी पण गांधी विरुद्ध माझ्या आजोबांसमोर बोललो आणि आजोबा म्हणाले
"गांधी वर मत द्यावे एवढे तुझे वयही नाही आणि अभ्यासही नाही. त्यांनी देशासाठी जे केले त्यात काही चुका झाल्या असतीलहि
पण देशाला बरेच काही दिले हे सुद्धा एक सत्य आहे.तर त्याचा आदर करायला शिक. चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत. "
अश्या माझ्या आजोबां सोबत महाभारतातील गोष्टी ऐकत माझे बालपण घडत गेले. माझ्या आजोबांनी मला नेहमी कर्मयोगाचे महत्व शिकवले. ते म्हणायचे
" तुमच्या वाट्याला जे आले आहे किवा तुम्ही जो व्यवसाय स्वीकारला आहे तो खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी बनून तुम्ही पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सैनिक असाल तर शत्रूला मारणे तुमचे कर्तव्य आहे तेथे अहिंसे बद्दल विचार करून चालणार नाही. तुम्ही डॉक्टर असाल तर रोग्याला बरे करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मला रोग झाला तर असा विचार करून
तुम्हाला चालणार नाही. शिक्षक असाल तर खरे विद्यादान करणे तुमचे कर्तव्य आहे आणि राजकारणी असाल तर खऱ्या अर्थाने जनतेच्या भल्यासाठी तुम्ही राजकारण करणे हेच तुमचे कर्तव्य आहे."
कर्मयोगाचे जिवंत उदाहरण बघायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरात Furniture चे काम केले असेल तर ते काम करणारा राजस्थानी मिस्त्री आठून बघा . मी नेहमीच त्या लोकांच्या काम करायच्या पद्धतीने
भारावतो. कर्मयोगाचे जिवंत उदाहरण असते ते. आणि त्या कर्मायोगातून साकारते आर्किटेक्चर आणि तुमच्या स्वप्नातील घराचे सुंदर रूप.
आता त्या पाठोपाठ बिहार आणि युपीचे मिस्त्री सुद्धा तेवढेच खरे कर्मयोगाचे जिवंत उदाहरण म्हणून बघायला मिळतात.
कर्मयोगाचे आणि मर्यादेचे महत्व तुम्हाला निसर्गाकडून जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येईल. डोळे बंद करून क्षणभर सूर्यमालेचा विचार करा किंवा चांदण्या रात्रीत चमकणाऱ्या आकाशातील ताऱ्यांकडे बघून विचार करा किती करोडो वर्षापासून सूर्य आणि त्याच्या भोवती आपल्या नेमून दिलेल्या कक्षेत हे सर्व ग्रह आणि तारे फिरत आहेत.
विचार करा मंगळाला असे वाटले आता बस झाले सूर्याची दादागिरी आता मी BOSS माझ्या भोवती ह्यांनी फिरायला हवे तर काय होईल?
सध्या भारतीय राजकारणातील अनेक राजकीय ग्रहांना सूर्य (पंतप्रधान) होण्याचे वेध लागले आहेत. बघू या कोण होते ते. मला राज कारणाचा जास्त अभ्यास नाही पण काही दिवसांपूर्वी वाचलेले मोदींच्या काल्पेनेतील भारत हे विचार आवडले.

चांगले विचार हे चांगलेच असतात सत्तेवर कोणीही आले तरी त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावयास हवा.
फक्त विरोधाला विरोध म्हणून चांगल्या विचारांना विरोध कोणी करू नये.
खैरात म्हणून मिळालेल्या पैश्या पेक्षा कर्मयोगाने कष्ट करून मिळविलेला पैसा श्रेष्ट ह्याची शिकवण आणि आठवण हि आपली खरी भारतीय संस्कृति आहे ह्याची जाण तळागाळा पर्येंत करून देण्याची गरज आहे आणि त्या साठी तश्या योजना आखण्याची खरी गरज आहे.
भ्रष्टाचार मिटवणे हे गरजेचे आहे पण त्यामागे विकासाचा मुद्दा मागे पडावयास नको ह्याची पण खबरदारी घेणे हीच काळाची आणि भारतीय राजकारणाची खरी गरज आहे.
4 comments:
I appreciate your line of thinking... Anil Tambe
Thanks Anil
"चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत"
This should be remembered to overcome any kind of failure.
Great Thinking that!
Thanks...
Post a Comment