मर्यादेचे महत्व ओळखून स्वत:वर प्रेम करितांना दुसऱ्याचाही विचार करायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण समंजस आणि सुसंस्कृत होण्याचा दिशेने वाटचाल करतो.अश्या व्यक्ती जेव्हा घरा-घरात , समाजात आणि पर्यायाने देशात वाढायला सुरुवात होते तेव्हा त्या घराची त्या समाजाची पर्यायाने त्या देशाची खरी प्रगती होते. स्वत:वर प्रेम करणे जेवढे योग्य असते तेवढेच त्याचे अहंकारात रुपांतरीत न होऊ देणे आणि दुसऱ्याचा विचार करितांना स्वतःवर अन्याय होऊ न देणेही तेवढेच महत्वाचे असते.आणि हि Balancing Act तुमची तुम्हालाच आत्मसात करायची असते. येथे Copy & paste चालत नाही.
हि Balancing Act शिकतांना दुसर्यांचे अनुभव , पुस्तक किंवा गुरु किंवा एखाद्या professional workshop मधून मिळालेले मार्गदर्शन नक्कीच तुमच्या कामी येऊ शकते.
आयुष्याचे बरेच तत्वज्ञान काही गाण्यामधुनही तुम्हाला मिळू शकते. थोडक्यात reference तुम्ही अनेक मार्गांनी मिळवू शकतात पण तुमच्या आयुष्याला लागू पडणारी Balancing Act तुमची तुम्हालाच शोधायची असते.
Songs with Life Philosophy
Good Morning अभंग
No comments:
Post a Comment