Saturday, February 15, 2014

भारत भाग्य विधाता म्हणजेच जनता


अरविंद केजरीवाल ह्यांनी शेवटी सरकार चालविण्याच्या जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेतली.सरकार  काय किंवा एखादी कंपनी काय किंवा सगळ्यात छोटी संस्था म्हणजे घर चालविणे हि एक जबाबदारी असते आणि त्या साठी खूप कसरत करावी लागते.
अशी बरीच उदाहरणे आहेत जेथे शिक्षणात अव्वल असलेले विद्यार्थी पुढे शिक्षणात फारशी चमक न दाखविणाऱ्या विद्यार्थ्याच्या कंपनी मध्ये नौकरी करितांना दिसतात.व्यवहारी जगाची गणितच वेगळी असतात. अरविंद केजरीवाल म्हणजे आप ह्यांचे विचार नक्कीच चांगले आहेत पण त्यांचे प्रत्यक्ष्य उदाहरण अजून बघावयास मिळाले नाही.
ते कसे प्रत्यक्षात उतरावे हे त्यांनाच ठरवावे आणि करून दाखवावे लागेल. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी चूक केली का प्रभावी राजकारण केले हे तर काळ म्हणजे भारत भाग्य विधाता 
म्हणजे जनताच ठरवेल. जनतेला विचारून सत्तेवर आलेले केजरीवाल राजीनामा देतांना जनतेला सोयीस्कर रित्या विसरले हे जनता विसरणार नाही. 
राजकारणाच्या बुद्धीपटावर उतरल्या नंतर जनतेला बनावट कल्पितांची आस दाखून खेळ कसा जिंकायचा हे प्रत्येक राजकारणी शिकतो. मला वाटते भारत भाग्यविधा म्हणजे जनतेने  राजकारणाच्या शुद्धी कारणासाठी आप पक्षाचा बागुलबुवा कायम विरोधी पक्ष म्हणून राजकारणात जिवंत ठेवावा. अरविंद केजरीवाल ह्यांना सुद्धा तोच रोल जास्त आवडतो हे त्यांनी  त्यांच्या ४९ दिवसाच्या राजकीय प्रवासात वेळोवेळी दाखून दिले.
एकंदरीत पूर्ण बहुमत मिळाल्या शिवाय आप कारभार करणार नाही आणि लोकसभेत त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही हे उघड सत्य आहे.
त्यामुळे भारत भाग्यविधाता जनतेने २०१४ ला "दिल्लीत पूर्ण बहुमताने आप आणि केंद्रात पूर्ण बहुमताने नमो" असा प्रयोग करून बघावा. म्हणजे दुध का दुध और पानी का पानी २०१९ पर्येंत स्वच्छ होईल.

 बघूया काळाच्या उदरात काय लपले आहे ते.

Read this article It's not just corruption
Summary:
AAP doesn’t recognise how much absence of predictability and order also hurts the poor.No comments: