EMC- Educational Middle Class
असा क्लास असतो?
नीट विचार केला तर असा क्लास होता आहे आणि राहील . काही कारणास्तव बहुतांशी नको त्या आकर्षणामुळे ऐन बारावीत अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊन बौद्धिक क्षमता असूनही ह्या क्लास मध्ये बसायची वेळ बर्याच विद्यार्थ्यांवर येते . गुणांच्या जोरावर चांगल्या विद्यालयात मिळालेला प्रवेश किंवा Campus Interview द्वारे मिळणारी नौकरीची संधी जेव्हा हुकते तेव्हा मनाला वाटणारी रुख रुख फक्त ह्या वर्गातील मुलेच समजू शकतात . मी पण ते समजू शकतो कारण मी पण त्याच वर्गातील विद्यार्थी होतो.
आयुष्याला वळण देणारे अभ्यासाचे बारावीचे वर्ष आणि लहानही नाही आणि मोठेही नाही अशी त्रिशंकू अवस्था एकाच वेळी का ? अश्या अनेक 'का ' पैकी एक ऊतर नसलेला प्रश्न .
बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळवणे एक दुसरे महादिव्य असते. आणि ह्या महविद्यालयात आल्यानंतर काही विध्यार्थी उपरती झाल्यामुळे अचानक सुधारतात आणि अभ्यासाला लागून हा EMC class सोडून वरच्या class ला जातात, तर वरच्या class मधील काही विध्यार्थी ह्या class मध्ये प्रवेश घेतात आणि ह्या EMC चे अस्तित्व टिकवून ठेवतात .
Campus Interview मधून नौकरीची संधी फार थोड्यांना मिळते. त्यातही हवी असलेली नौकरी मिळणारे फारच थोडे नशीबवान असतात . मग उरलेलेया बाकीच्यांचे काय?
हातातील डिग्री आणि हवी असलेली नौकरी मिळवण्यासाठी काय करावे?
उत्तर आहे
Decide what you want to do in life and learn and add respective skills to your resume.
पण आयुष्यभर नौकरीच करायची का स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा हा सुद्धा तुमच्या विचाराचा एक भाग असू द्या? पण काही अनुभव नसतांना एकदम व्यवसायात उडी मारण्या पेक्षा नौकरी द्वारे थोडा अनुभव घेऊन व्यवसायात उतरणे फायद्याचे ठरू शकते. मी हे सांगू शकतो कारण मी आयुष्यात असे बरेच उलटे सुलटे प्रयोग करून बघितले आहेत. फक्त एक लक्षात ठेवा नौकरी करून तुम्ही फक्त तुमचे कुटुंब पोसू शकतात पण उत्तम व्यवसाय करून तुम्ही काही लोकांसाठी नौकरी च्या संधी उपलब्ध करू शकतात .
मी इंजिनियरिंग इलेक्ट्रोनिक्स मध्ये केले पण त्यवेळेस आमच्या syllabus मध्ये Computer हा शब्दही नव्हता . पण माझे अतापार्येन्तचे सर्व आयुष्य Computer & IT ह्या क्षेत्रात काम करण्यात गेले.
I am self learner & learned respective skills demanded by the industry at that respective time.
Microprocessor 8085,Main frame computer,
Card reader, PC, Laptop,Cobol, Basic,C,VB, VB.NET,ASP.NET,Java,Java Script, HTML, Web Development, SQL,Database Application development,Cloud Computing,CRM, ERP, BI and now the buzzword Bigdata.
असा माझा प्रवास झाला.
IT क्षेत्रात काम करावयाचे असेल तर सतत शिकत राहावे लागते .
But I Enjoyed It. तुमच्या आवडीचे काम असेल तर नवीन गोष्टी शिकण्यात मन रमते .
पैसा मिळवणे हा तर आपला नौकरी किंवा व्यवसाय ह्या मागचा प्रमुख उद्देश असतो पण आपल्या आवडीचे काम असेल तर Life बन जाती हैं !
सद्ध्या कामातून वेळ काढून, नौकरीच्या शोधात असलेल्या
विद्यार्थ्यांसाठी Skill Development Classes सुरु करावेत असा विचार मनात सुरु आहे.
So watch out for my new Technical Skill Development blog!
It will be online e Learning Class.
It will be online e Learning Class.
Special consideration for EMC class student....:)
And remember Knowledge is POWER..
No comments:
Post a Comment