Saturday, February 15, 2014

भारत भाग्य विधाता म्हणजेच जनता


अरविंद केजरीवाल ह्यांनी शेवटी सरकार चालविण्याच्या जबाबदारीतून स्वतःची सुटका करून घेतली.सरकार  काय किंवा एखादी कंपनी काय किंवा सगळ्यात छोटी संस्था म्हणजे घर चालविणे हि एक जबाबदारी असते आणि त्या साठी खूप कसरत करावी लागते.
अशी बरीच उदाहरणे आहेत जेथे शिक्षणात अव्वल असलेले विद्यार्थी पुढे शिक्षणात फारशी चमक न दाखविणाऱ्या विद्यार्थ्याच्या कंपनी मध्ये नौकरी करितांना दिसतात.व्यवहारी जगाची गणितच वेगळी असतात. अरविंद केजरीवाल म्हणजे आप ह्यांचे विचार नक्कीच चांगले आहेत पण त्यांचे प्रत्यक्ष्य उदाहरण अजून बघावयास मिळाले नाही.
ते कसे प्रत्यक्षात उतरावे हे त्यांनाच ठरवावे आणि करून दाखवावे लागेल. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन त्यांनी चूक केली का प्रभावी राजकारण केले हे तर काळ म्हणजे भारत भाग्य विधाता 
म्हणजे जनताच ठरवेल. जनतेला विचारून सत्तेवर आलेले केजरीवाल राजीनामा देतांना जनतेला सोयीस्कर रित्या विसरले हे जनता विसरणार नाही. 
राजकारणाच्या बुद्धीपटावर उतरल्या नंतर जनतेला बनावट कल्पितांची आस दाखून खेळ कसा जिंकायचा हे प्रत्येक राजकारणी शिकतो. मला वाटते भारत भाग्यविधा म्हणजे जनतेने  राजकारणाच्या शुद्धी कारणासाठी आप पक्षाचा बागुलबुवा कायम विरोधी पक्ष म्हणून राजकारणात जिवंत ठेवावा. अरविंद केजरीवाल ह्यांना सुद्धा तोच रोल जास्त आवडतो हे त्यांनी  त्यांच्या ४९ दिवसाच्या राजकीय प्रवासात वेळोवेळी दाखून दिले.




एकंदरीत पूर्ण बहुमत मिळाल्या शिवाय आप कारभार करणार नाही आणि लोकसभेत त्यांना पूर्ण बहुमत मिळणार नाही हे उघड सत्य आहे.
त्यामुळे भारत भाग्यविधाता जनतेने २०१४ ला "दिल्लीत पूर्ण बहुमताने आप आणि केंद्रात पूर्ण बहुमताने नमो" असा प्रयोग करून बघावा. म्हणजे दुध का दुध और पानी का पानी २०१९ पर्येंत स्वच्छ होईल.

 बघूया काळाच्या उदरात काय लपले आहे ते.

Read this article It's not just corruption
Summary:
AAP doesn’t recognise how much absence of predictability and order also hurts the poor.



Friday, February 14, 2014

In search of Love...

प्रेमाचा शोध



खरे प्रेम अनुभवायला दुतर्फी प्रेमाची साथ लागते
एक तर्फी प्रेमाला त्यागाची गरज भासते

काळ हे प्रेमाच्या जखमेवर  औषध असते
भूतकाळातील वेदनांवर हास्याची किनार जोडते

दुतर्फी प्रेम एकतर्फी जाणवते जेव्हा
परिवर्तन हे एकच सत्य कळते तेव्हा

-संजीव चौधरी

प्रेम हा सर्व वयोगटातील व्यक्तींचा आवडता विषय आहे आणि त्याची कमी ते मिळाले तरी जाणवतच राहते.हे एक सत्य आहे.शाळेतील तुमच्या पहिल्या प्रेमाच्या भावना आणि त्यानंतर प्रेमाचे आलेले वेगवेगळे अनुभव तुम्ही तपासून बघितले तर तुमचे तुम्हालाच  जाणवेल परिवर्तन हाच जगाचा एकमेव नियम आहे.
कोणे एकेकाळी कोणावर असलेले तुमचे प्रेम काळाच्या ओघात कमी झालेले तुम्हाला जाणवेल आणि त्याची जागा दुसऱ्या ध्येयाने केव्हा घेतली हे तुम्हाला कळतही नसते. हे असे का होते.. खऱ्या  प्रेमाच्या शोधात आपण कोणाचा शोध घेत असतो. मी कुठेतरी ऐकले होते आयुष्यातील मार्गावर येणाऱ्या ह्या प्रेमाच्या पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला टप्या टप्याने त्याच्याकडे ओढत असतात. त्याच्याशिवाय तुम्ही कुणावरही खरे प्रेम करू शकत नाही . पण ह्याचा अर्थ टप्प्या टप्प्या ने तुमच्या आयुष्यात आलेले प्रेम खोटे असते का ?मला विचाराल  तर माझे उत्तर नाही असेल . खर म्हणजे तुमच्या आयुष्यात येणारा प्रेमाचा टप्पा दु तर्फी असायलाच भाग्य  लागते. एकतर्फी प्रेमाचे  टप्पे तुम्हाला दिल का दर्द देवून जातात . मग तुम्हाला दर्द भरे गीत आवडायला लागतात. एका चे प्रेम दुसर्यावर दुसर्याचे तिसर्यावर हा प्रेमाचा त्रिकोण तर असंख्य चित्रपटांच्या निर्मितीचा प्राण असतो. आणि त्यात आपलीच कथा शोधून आपणच त्या चित्रपटाला Hit करतो.

प्रेमा बद्दल खलिल जिब्रान याने त्याच्या "Prophet" प्रेषित ह्या प्रसिद्ध पुस्तकात केलेले वर्णन अवर्णनीय आहे.


“When love beckons to you follow him, Though his ways are hard and steep. And when his wings enfold you yield to him, Though the sword hidden among his pinions may wound you. And when he speaks to you believe in him, Though his voice may shatter your dreams as the north wind lays waste the garden. For even as love crowns you so shall he crucify you. Even as he is for your growth so is he for your pruning. Even as he ascends to your height and caresses your tenderest branches that quiver in the sun, So shall he descend to your roots and shake them in their clinging to the earth......
But if in your fear you would seek only love's peace and love's pleasure, Then it is better for you that you cover your nakedness and pass out of love's threshing-floor, Into the seasonless world where you shall laugh, but not all of your laughter, and weep, but not all of your tears. Love gives naught but itself and takes naught but from itself.
Love possesses not nor would it be possessed; For love is sufficient unto love. And think not you can direct the course of love, if it finds you worthy, directs your course. Love has no other desire but to fulfil itself."
But if you love and must needs have desires, let these be your desires: To melt and be like a running brook that sings its melody to the night. To know the pain of too much tenderness. To be wounded by your own understanding of love; And to bleed willingly and joyfully.”
― Khalil Gibran, Le Prophète


जेव्हा प्रेम तुम्हाला खुणावून बोलाविल तेव्हा तुम्ही त्याच्या मागोमाग जा 
त्याचे मार्ग बिकट आणि उभ्या चढणीचे असले तरी !
आणि जेव्हा त्याचे पंख तुम्हाला आपल्या मिठीत घेतील तेव्हा तुम्ही त्याच्या स्वाधीन व्हा...
जरी त्याच्या पंखात लपलेली तलवार कदाचित तुम्हाला जखमी करणार असली तरी!


परमेश्वर आणि प्रेम ज्याने त्याने आपापले शोधायचे असते.
आणि जेव्हा तुम्हाला त्याची अनुभूती येते तेव्हा त्याची जाहिरात करायची नसते.जाहिरात करण्याची इच्छा अधर्माला जन्म देते आणि पुढे तोच अधर्म धर्म  नावाने  फोफावतो.





















Sunday, February 2, 2014

कर्मयोग आणि भारतीय राजकारण

गांधीना विरोध करणे हि तरुण पिढी मध्ये आपला वेगळेपणा सिद्ध करण्याची सोपी पद्धत कधी रूढ झाली ते मला माहित नाही , पण मी शाळेत असतांना कळत नसूनही सभोवतालील गांधी विरोधी विचार ऐकून मी पण गांधी विरुद्ध माझ्या आजोबांसमोर बोललो आणि आजोबा म्हणाले 

"गांधी वर मत द्यावे एवढे तुझे वयही नाही आणि अभ्यासही नाही. त्यांनी देशासाठी जे केले त्यात काही चुका झाल्या असतीलहि 
पण देशाला बरेच काही दिले हे सुद्धा एक सत्य आहे.तर त्याचा आदर करायला शिक. चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत. "

अश्या माझ्या आजोबां सोबत महाभारतातील गोष्टी ऐकत माझे बालपण घडत गेले. माझ्या आजोबांनी मला नेहमी कर्मयोगाचे महत्व शिकवले. ते म्हणायचे

" तुमच्या वाट्याला जे आले आहे किवा तुम्ही जो व्यवसाय स्वीकारला आहे तो खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी बनून तुम्ही पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सैनिक असाल तर  शत्रूला मारणे तुमचे कर्तव्य आहे तेथे अहिंसे बद्दल विचार करून चालणार नाही. तुम्ही डॉक्टर असाल तर रोग्याला बरे करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मला रोग झाला तर असा विचार करून
 तुम्हाला चालणार नाही. शिक्षक असाल तर खरे विद्यादान करणे तुमचे कर्तव्य आहे आणि राजकारणी असाल तर  खऱ्या अर्थाने जनतेच्या भल्यासाठी तुम्ही राजकारण करणे हेच तुमचे कर्तव्य आहे."

कर्मयोगाचे जिवंत उदाहरण बघायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरात Furniture चे काम केले असेल तर ते काम करणारा राजस्थानी मिस्त्री आठून बघा . मी नेहमीच त्या लोकांच्या काम करायच्या पद्धतीने
भारावतो. कर्मयोगाचे जिवंत उदाहरण असते ते. आणि त्या कर्मायोगातून साकारते आर्किटेक्चर आणि तुमच्या स्वप्नातील घराचे सुंदर रूप.
आता त्या पाठोपाठ बिहार आणि युपीचे मिस्त्री सुद्धा तेवढेच खरे कर्मयोगाचे जिवंत उदाहरण म्हणून बघायला मिळतात.

कर्मयोगाचे आणि मर्यादेचे महत्व तुम्हाला निसर्गाकडून जास्त चांगल्या पद्धतीने शिकता येईल. डोळे बंद करून क्षणभर सूर्यमालेचा विचार करा किंवा चांदण्या रात्रीत चमकणाऱ्या आकाशातील ताऱ्यांकडे बघून विचार करा किती करोडो वर्षापासून सूर्य आणि त्याच्या भोवती आपल्या नेमून दिलेल्या कक्षेत हे सर्व  ग्रह आणि तारे फिरत आहेत.
विचार करा मंगळाला असे वाटले आता बस झाले सूर्याची दादागिरी आता मी BOSS माझ्या भोवती ह्यांनी फिरायला हवे तर काय होईल?



सध्या भारतीय राजकारणातील अनेक राजकीय ग्रहांना सूर्य (पंतप्रधान)  होण्याचे वेध लागले आहेत. बघू या कोण होते ते. मला राज कारणाचा जास्त अभ्यास नाही पण काही दिवसांपूर्वी वाचलेले मोदींच्या काल्पेनेतील भारत हे विचार आवडले.


चांगले विचार  हे चांगलेच असतात सत्तेवर कोणीही आले तरी त्यांनी ह्याचा पाठपुरावा करावयास हवा.
फक्त विरोधाला विरोध म्हणून चांगल्या विचारांना विरोध कोणी करू नये.

खैरात म्हणून मिळालेल्या पैश्या पेक्षा कर्मयोगाने कष्ट करून मिळविलेला पैसा श्रेष्ट ह्याची शिकवण आणि आठवण हि आपली खरी भारतीय संस्कृति आहे ह्याची जाण तळागाळा पर्येंत करून देण्याची गरज आहे आणि त्या साठी तश्या योजना आखण्याची खरी गरज आहे.

भ्रष्टाचार मिटवणे हे गरजेचे आहे पण त्यामागे विकासाचा मुद्दा मागे पडावयास नको ह्याची पण खबरदारी घेणे हीच काळाची आणि भारतीय राजकारणाची खरी गरज आहे.

भारतीय राजकारण आणि निवडणूक 2019

शोध - In search of Chyren



Friday, January 3, 2014

Balancing Your Life


मर्यादेचे महत्व ओळखून स्वत:वर प्रेम करितांना दुसऱ्याचाही विचार करायला जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपण समंजस आणि सुसंस्कृत होण्याचा दिशेने वाटचाल करतो.अश्या व्यक्ती जेव्हा घरा-घरात , समाजात आणि पर्यायाने देशात वाढायला सुरुवात होते तेव्हा त्या घराची त्या समाजाची पर्यायाने त्या देशाची खरी प्रगती होते. स्वत:वर प्रेम करणे जेवढे योग्य असते तेवढेच त्याचे अहंकारात रुपांतरीत न होऊ देणे आणि दुसऱ्याचा विचार करितांना स्वतःवर अन्याय होऊ न देणेही तेवढेच महत्वाचे असते.आणि हि Balancing Act तुमची तुम्हालाच आत्मसात करायची असते. येथे Copy & paste चालत नाही.
हि Balancing Act शिकतांना दुसर्यांचे अनुभव , पुस्तक किंवा गुरु किंवा एखाद्या professional workshop मधून मिळालेले मार्गदर्शन नक्कीच तुमच्या कामी  येऊ शकते.


आयुष्याचे बरेच तत्वज्ञान काही गाण्यामधुनही तुम्हाला मिळू शकते. थोडक्यात reference तुम्ही अनेक मार्गांनी मिळवू शकतात पण तुमच्या आयुष्याला लागू पडणारी Balancing Act तुमची तुम्हालाच शोधायची असते.



Songs with Life Philosophy

Good Morning अभंग




  • मला आवडलेले काही विचार
  • "आप" - We the people
  • वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही
  • Balancing Your Life

  • Your Health is your True Power
  • सूर्यनमस्कार- Suryanamaskar
  • EveryDay Exercise - एक प्रात्यक्षिक सुरुवात

  • मैत्रेय - The Friend
  • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
  • Mentor , गुरु आणि Friend
  • How to be happy in Any Job
  • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
  • जागृतीचा एक क्षण
  • शोध
  • आणि मी तिला सोडले आणि बरेच काही 
  • आत्मपरीक्षण - एक चिंतन
  • मर्यादेचे महत्व आणि कर्मयोग
  • चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस
  • आणि वाल्याचा वाल्मिकी झाला 
  • Happy Family Index
  • My मराठी
  • Meet, Discuss and ask. पुछनेमे में क्या जाता है!
  • स्वदेश
  • FDP - Faculty Development Workshop
  • Learn Dandiya & Garba Steps

  • Friday, December 27, 2013

    Surya Namaskar



    .

    Whatever may be your age group and whatever may be the type of exercise you are following , just add surya-namaskar to it and you will see the mind blowing results in few days.

    Body warm up is a must activity for any type of exercise.

    Just add  surya namaskar to your body warm up activity  and you can witness the expected results in few days.

    In surya-namaskara we follow the 12 above mentioned positions in sequence.

    Just try to stop maximum time in one position.

    You can count 1- to 21 (as supported by your body ) in your mind at every position.

    As per your age and supported by your body you can repeat surya-namaskara 3 to XXX time.

    Then you do your favorite exercise.

    Please remember following points 

    1)Do the exercise till your body permits you. Unnecessary extra exercise can harm your body. In short listen to your body while exercising

    2)Body massage is equally important along with exercise.
    Hence if it is not possible everyday after exercise do it once or twice in a week. Remember doing massage  itself is an exercise . Hence don't miss the chance of self massaging or giving massage  to another person. 

    4)Proper diet is very important. So if needed consult to Dietitian

    5)If you love meditation great. Otherwise listening to your body while exercising is one way of meditation.

    If you like this please share.



    सूर्यनमस्कार

    तुम्ही कोणत्याही वायोगटातील असाल आणि तुमचा आवडता व्यायाम प्रकार कोणताही असेना परंतु त्यात सुर्यनमस्काराची भर घालून तुम्ही काही दिवसातच अचंभित करणारे बदल तुमचे तुम्ही अनुभवू शकतात.

    तुम्ही कोणताही व्यायाम प्रकार करीत असाल पण त्यासाठी शरीर आधी वार्म-अप करणे जरुरी असते हे तुम्हाला माहीतच असेल.


    तर तुमच्या वार्म-अप प्रकारात सुर्यानमस्काराची भर घालून बघा आणि काही दिवसातच तुम्हाला हवे असलेले  बदल दिसावयास लागतील

    सूर्यनमस्कार म्हणजे १२ आसने आपण वर चित्रात दाखविलेल्या अनुक्रमाने करतो.

    प्रत्येक पोझिशन घेतल्यानंतर त्या अवस्थेत जास्तीत जास्त वेळ थांबवायचा प्रयत्न तुम्ही करावयास हवा.

    थोडक्यात पोझिशन घेतल्या नंतर मनातल्या मनात १० ते २१ पर्येत जसे जमेल तसे मोजा आणि मग पुढच्या पोझिशन कडे वळा.

    तुमच्या वयानुसार आणि आवश्यकते नुसार तुम्ही असे ३ ते XXX सूर्यनमस्कार घालू शकता.

    त्यानंतर तुम्ही तुमचा आवडता व्यायाम करावा.

    कोणताही व्यायाम करितांना खालील गोष्टी लक्ष्यात ठेवाव्या


    १) शरीराला झेपेल तेवढाच व्यायाम करावा नाही तर फायद्या पेक्षा शरीराचे नुकसान होऊ शकते. थोडक्यात व्यायाम करितांना शरीराचे ऐका.

    २) व्यायामा सोबत शरीराची तेल मालिश सुद्धा खूप आवश्यक असते त्यामुळे रोज जमत नसेल तर आठवड्यातून १ किंवा २ दिवस मालिश साठी ठेवावा   मालिश करणे हा एक प्रकारे व्यायामच आहे त्यामुळे स्वतःची किंवा दुसर्याची मालिश करण्याची संधी सोडू नका तो एक प्रकारे व्यायामच आहे.

    ३) व्यायामाबरोबर संतुलित आहाराचीही गरज असते त्यामुळे तुमच्या शरीराला अनुरूप असा संतुलित आहार घ्या. गरज पडल्यास तज्ञांचा सल्ला घ्या.

    ४)घ्यानाची आवड असल्यास ते पण करून बघा. खरे म्हणजे व्यायाम करितांना तुमच्या शरीराशी संवाद हे हि एक ध्यानच असते आणि तसे केले कि तुम्हाला हवे असलेले बदल तुम्ही  लवकर घडवू शकतात.

    तुम्हाला हे आवडले असेल तर लाईक करा आणि शेयर करा




    Thursday, December 26, 2013

    "आप" - We the people




    "आप" दिल्लीकरांनी जी विचारांची क्रांती मतदानाच्या स्वरुपात दिल्ली मध्ये करून दाखवली ती खरोखरच भारतीय इतिहासात मैलाचा दगड म्हणून नोदाविली जाईल.
    आप हा राजकीय पक्ष म्हणून किती यशस्वी होतो ते काळच ठरवेल परंतु अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीम ला ह्याचे श्रेय्य द्यायलाच हवे.
    भ्रष्टाचारा बद्दल आणि भारतीय राजकारणात घट्ट रुजलेल्या किंवा मुद्दाम रुजवलेलेया काही धारणांना ह्यामुळे छेद बसला.

    १) पैसा आणि सत्तेच्या जोरावर मी काहीही करू शकतो
    २) राजकारण हे फक्त पैसा आणि घराणेशाही ह्याचीच जागीर आहे.

    ह्या मुळे मस्तवाल झालेले नेते थोडे मवाळ होतील आणि भ्रष्टाचारावर थोड्याफार प्रमाणात आळा बसेल अशी मला आशा वाटते.

    लोकपाल मंजुर झाले ह्याला "आप" चा दिल्लीतील विजय कारणीभूत ठरला पण "आप" ला त्याचे श्रेय घेता आले नाही ह्यालाच राजकारण म्हणतात. अर्थात लोकपाल मुळे सगळे नीट होईल हे मला अजून पटलेले नाही. पण थोडेफार ठीक होईल ह्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.

    उम्मीद पे दुनिया कायम है! असो.

    पैसा आणि सत्तेच्या जोरावर मी काहीही करू शकतो हा भ्रमाचा भोपळा आप वाल्यांनी फोडला पण आदर्शवादाचा इतरांना तुच्छ लेखणारा अहंकार हि चांगला नव्हे हे पण त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
    प्रत्येक गोष्ट जनतेला विचारून करतो हेही शक्य नाही आणि त्याचा अतिरेकी वापर बुम्र्यांग होऊ शकतो.

    "दिल्लीत केजरीवाल पण केंद्रात मोदी " हा पण जनतेचा सूर आप ने ऐकावयास हवा. त्याकडे दुर्लक्ष केले तर मग आपलाल्या हवे तेच जनतेचे सूर ऐकणारे दुसरे पक्ष आणि आप ह्यात फरक तो काय

    काही कामे हि फक्त मत पेट्यांवर नजर ठेऊन केली जातात तर काही कामे दूर दृष्टी ठेऊन सर्वांच्या सामायिक हिता साठी केली जातात पण त्यांची दाखल घेतली जात नाही कारण लोकांना instant ची सवय झाली आहे ती लोकांनी पण बदलायला हवी.  आत्मकेंद्रित फक्त मला अशी वृत्ती वाढलेल्या समाजाला त्यागाचे महत्व समजून घ्यायची गरज आहे. पण त्यागाचा अतिरेकही कधी कधी डोकेदुखी होऊ शकतो हेही लक्ष्यात असू द्यावे. कुणी कुणा साठी त्याग करण्या पेक्षा ज्याचे त्याचे त्याला आणि आपले आपण सुद्धा जे हक्काचे आहे ते घ्यावे असे मला वाटते. 

    तुम खावो हम भी खाते है!

    पेक्षा

    तुम जीवो सुकून से और हमे भी जिने दो सुकून से असा सूर लावावयास हवा

    कारण शेवटी सुखाने जीवन जगता यावे हीच तर सर्वांची इच्छा असते

    खाली हाथ आये है खाली हाथ जाना है!

    असे फक्त dialogue म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी समजावून घ्यावे आणि आपले आयुष्य हे काहीतरी अर्थपूर्ण कार्य करण्यासाठी आहे ह्याचे भान ठेऊन आप आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून जीवन सार्थकी लावावे हेच आपण समजावून घेतले तर बरेच प्रश्न आपोआप सुटतील.

  • मला आवडलेले काही विचार
  • "आप" - We the people
  • वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही
  • Balancing Your Life

  • Your Health is your True Power
  • सूर्यनमस्कार- Suryanamaskar
  • EveryDay Exercise - एक प्रात्यक्षिक सुरुवात

  • मैत्रेय - The Friend
  • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
  • Mentor , गुरु आणि Friend
  • How to be happy in Any Job
  • PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना
  • जागृतीचा एक क्षण
  • शोध
  • आणि मी तिला सोडले आणि बरेच काही 
  • आत्मपरीक्षण - एक चिंतन
  • मर्यादेचे महत्व आणि कर्मयोग
  • चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस
  • आणि वाल्याचा वाल्मिकी झाला 
  • Happy Family Index
  • My मराठी
  • Meet, Discuss and ask. पुछनेमे में क्या जाता है!
  • स्वदेश
  • FDP - Faculty Development Workshop
  • Learn Dandiya & Garba Steps
  • Saturday, September 28, 2013

    OPEN UP - Its a wonderful feeling

    मोकळे व्हा - Open Up!  Its a wonderful feeling



    IT - Indian Talent हे बर्याच क्षेत्रात आपलाल्या बघायला मिळते त्या पैकी  Creative Advertisement हे एक.
    आणि ह्याची प्रचीती मी अमेरिकेत असतांना त्यांच्या जाहिराती बघतांना आली. त्यांच्या जाहिराती फार कंटाळवाण्या असतात आणि आपल्या एकदम  creative आणि entertaining.
    काही जाहिराती तर १५-२० सेकंदात आयुष्यातील मोठे तत्वज्ञान सांगून जातात.अशीच आता  tata dokomo ची OPEN UP - Its a wonderful feeling हि जाहिरात.




    ज्यांना कुणालाही आयुष्यात नाचायची संधी मिळाली असेल आणि ज्यांनी लोक लज्जा बाजूला सारून अंगविप्षेक का दिसेना ज्याला मुंबई भाषेत dhating dance  म्हणतात तो करण्याचा प्रयत्न केला असेल ते नक्कीच जाणू शकतात - Its a wonderful feeling...!!!

    मग कश्याची वाट बघताय . तुमच्या मोबाइल किंवा आयपोड वर बरेच असे गाणे असतील तुम्ही ते कानात इयर फोन घालून मनातल्या मनात ऐकत असाल आता ते इयर फोन बाजूला सारून आवाज मोठा करून  just Move your Body and OPEN UP... Its a wonderful feeling

    अश्याच काही you tube वरील गाण्याचे संकलन मी खालील पेज वर केले आहे.

    Move your Body - Dance Songs


    Learn Bollywood Dance Steps 


    Learn Salsa Dance : Basic Tricks










    पीड़ा क्या हैं !
    जो तुम ले कर आये हो लुटा नहीं पा रहे हो !
    बोज़ बन गया !
    यही पीड़ा हैं !-  रजनीश