"आप" दिल्लीकरांनी जी विचारांची क्रांती मतदानाच्या स्वरुपात दिल्ली मध्ये करून दाखवली ती खरोखरच भारतीय इतिहासात मैलाचा दगड म्हणून नोदाविली जाईल.
आप हा राजकीय पक्ष म्हणून किती यशस्वी होतो ते काळच ठरवेल परंतु अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीम ला ह्याचे श्रेय्य द्यायलाच हवे.
भ्रष्टाचारा बद्दल आणि भारतीय राजकारणात घट्ट रुजलेल्या किंवा मुद्दाम रुजवलेलेया काही धारणांना ह्यामुळे छेद बसला.
१) पैसा आणि सत्तेच्या जोरावर मी काहीही करू शकतो
२) राजकारण हे फक्त पैसा आणि घराणेशाही ह्याचीच जागीर आहे.
ह्या मुळे मस्तवाल झालेले नेते थोडे मवाळ होतील आणि भ्रष्टाचारावर थोड्याफार प्रमाणात आळा बसेल अशी मला आशा वाटते.
लोकपाल मंजुर झाले ह्याला "आप" चा दिल्लीतील विजय कारणीभूत ठरला पण "आप" ला त्याचे श्रेय घेता आले नाही ह्यालाच राजकारण म्हणतात. अर्थात लोकपाल मुळे सगळे नीट होईल हे मला अजून पटलेले नाही. पण थोडेफार ठीक होईल ह्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.
पैसा आणि सत्तेच्या जोरावर मी काहीही करू शकतो हा भ्रमाचा भोपळा आप वाल्यांनी फोडला पण आदर्शवादाचा इतरांना तुच्छ लेखणारा अहंकार हि चांगला नव्हे हे पण त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
प्रत्येक गोष्ट जनतेला विचारून करतो हेही शक्य नाही आणि त्याचा अतिरेकी वापर बुम्र्यांग होऊ शकतो.
"दिल्लीत केजरीवाल पण केंद्रात मोदी " हा पण जनतेचा सूर आप ने ऐकावयास हवा. त्याकडे दुर्लक्ष केले तर मग आपलाल्या हवे तेच जनतेचे सूर ऐकणारे दुसरे पक्ष आणि आप ह्यात फरक तो काय
तुम खावो हम भी खाते है!
पेक्षा
तुम जीवो सुकून से और हमे भी जिने दो सुकून से असा सूर लावावयास हवा
कारण शेवटी सुखाने जीवन जगता यावे हीच तर सर्वांची इच्छा असते
खाली हाथ आये है खाली हाथ जाना है!
असे फक्त dialogue म्हणून लक्षात ठेवण्यापेक्षा अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी समजावून घ्यावे आणि आपले आयुष्य हे काहीतरी अर्थपूर्ण कार्य करण्यासाठी आहे ह्याचे भान ठेऊन आप आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून जीवन सार्थकी लावावे हेच आपण समजावून घेतले तर बरेच प्रश्न आपोआप सुटतील.
No comments:
Post a Comment