Sunday, January 27, 2013

Real story of a Phoenix Plant





हि गोष्ट आहे वर चित्रात दाखविलेल्या रोपट्याची . मला ते माझ्या वाढदिवसाची भेट म्हणून आमच्या कंपनी कडून (Fluent India ) सन २००२ मध्ये मिळाले होते. घरातील एका कुंडीत मी ते लावले . त्या वेळेस मी माझ्या जुन्या फ्लाट मध्ये राहत होतो . साधारण एक वर्ष ते टिकले. घरात असल्या मुळे म्हणा किंवा कदाचित पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे म्हणा पण ते कोमेजुन गेले आणि आमच्या दृष्टीने ते मरण पावले  .मग त्या कुंडीत दुसरे कोणतेच झाड लावले नाही आणि त्या कुंडीचा  उपयोग फक्त उदबत्ती लावण्या साठी होऊ लागला . त्यानंतर २००६ मध्ये आम्ही आमच्या नवीन फ्लाट मध्ये आलो . त्याला असलेल्या सुंदर टेरेस मध्ये आमच्या कुंड्या ठेवल्या. त्यात हि रोप नसलेली पण उदबत्तीची राख असलेली कुंडी पण होती.
.
..आणि एक दिवस चमत्कार झाला राख असलेल्या त्या कुंडीतून त्या कोमेजुन गेलेल्या आमच्या दृष्टीने मरण पावलेल्या रोपट्याने पुन्हा जन्म घेतला बघता बघता ते वाढू लागले बहरू  लागले आणि त्याला चक्क सुंदर फुले येऊ लागली. मला त्या रोपाचे नाव माहित नाही म्हणून मी त्याला Phoenix Plant म्हणतो.


Sunday, January 20, 2013

एक विचार १२ रात्री


  • चांगले खेळणे / Gadget मिळावे
  • चांगले मार्क्स अथवा चांगला score मिळावा 
  • चांगल्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न व्हावे 
  • चांगली नौकरी मिळावी 
  • स्वतःचे चांगले घर असावे
  • मुलांना चांगली शाळा ,चांगले विद्यालय मिळावे 
  • चांगली health, figure (36-24-36)  मिळवावी
  • सध्याची जे काही आहे त्यापेक्षा आणखी चांगले मिळावे 
  • स्वतःचा business असावा
  • आहे तो business आणखी वाढवावा 

  • तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही वयाच्या वळणावर असाल वरील पैकी एक विचार तुमच्या मनात घर करून बसलेला असतो आणि नसेल तर सगळे विचार करून प्रयत्न करून करून तुम्ही शेवटच्या विचारापर्येंत पोहोचलेले असतात ...
एक साधे सरळ सोपे सुखी आयुष्य असावे

तुमचा विचार आणि ध्येय  विस्तारित करून तुम्ही तुमच्या मनाच्या पटलावर तुमच्या इच्छाशक्तीच्या पेनाने लिहून काढा आणि झोपण्यापूर्वी रोज त्याचे आकलन  करा असे म्हणतात १२ रात्री हा नियम तुम्ही पाळला तर तुमचा विचार प्रत्यक्षात येतो.
(अर्थात  त्याला तुमच्या कर्मयोगाची साथ असेल तर....!!!)
So try it to enjoy better life

अगर लगन सच्ची हो और इरादा पक्का हो तो 
Nothing is Impossible...


Sunday, December 16, 2012

एक धुंद से आना हैं एक धुंद में जाना हैं !



ह्या आठवड्यात १४-डिसेंबर-२०१२ ला पडलेल्या दाट धुक्याने मला धुंद चित्रपटातील साहीर लुधियानवी ह्यांनी लिहिलेल्या आणि रवि यांनी संगीत बद्ध केलेल्या गाण्याची आठवण झाली. मला आवडणाऱ्या काही philosophical सुंदर गाण्यां पैकी हे एक अप्रतिम गाणे
संसारकी की हर शय का इतनाही फ़साना हैं 
एक धुंद से आना हैं एक धुंद में जाना हैं !

ये राह कहाँ से हैं ये राह कहाँ तक हैं 
ये राज़ कोई राही समझा हैं न जाना हैं !

एक पल की पलक पर है ठहरी हुई ये दुनिया 
एक पल के झपकने तक हर खेल सुहाना हैं !

क्या जाने कोई किस पल किस मोड़ पर क्या बीते 
इस रह में ऐ राही हर मोड़ बहाना हैं !






Saturday, December 8, 2012

SAVE Water SAVE life



Do one thing Each Day that will save water

अशी एक गोष्ट रोज करा ज्याने पाणी वाचेल.
त्यापैकी एक म्हणजे फक्त लघवीला गेल्यानंतर पूर्ण फ्लश वापरून आपण जे पाणी वाया घालवतो आहे ते कमी  फलश वापरून किंवा  मगने पाणी ओतून आपण किती तरी पाणी वाचवू शकतो.
विचार करा आणि रोजची तुमची सवय बदला. 
तुमची एक साधी सवय किती तरी पाणी वाचवू  शकते.
Why does the toilet "flush" when you pour a mug of water into it? Or use half-flush and save water.
खरे म्हणजे बिल्डर आणि राजकारणी मिळून मोठ मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स बांधतांना ह्या गोष्टीचा विचार करून त्या दृष्टीने 
आधीच पाऊले उचलू शकतात . त्या दृष्टीने आधीच तशे Toilets दिले तर तो  अधिक योग्य उपाय असू शकतो.
मला असे वाटते   मोठे हौसिंग कॉम्प्लेक्स ला परवानगी देण्यापूर्वी सरकार जर खालील गोष्टी बंधनकारक करेल तर भविष्यात 
भेडसावणारा पाण्याचा प्रश्न आपण कमी करू शकू.
1)Toilets with water saving facilities.  Example: Half flush facility.
2)Dual Plumbing system  & water harvesting for reuse of water


More tips to Save Water


There are a number of ways to save water, and they all start with YOU.
  • Check all faucets, pipes and toilets for leaks.
  • Install water saving showerheads and ultra-low-flush toilets.
  • Take shorter showers.
  • Never use your toilet as an ashtray or wastebasket.
  • Turn off the water while brushing your teeth or shaving.
  • Instead of cleaning terrace everyday with pouring water by Buckets clean  it with wet cloth.
  • बादल्या  ओतून रोज टेरेस धुण्यापेक्षा अधून मधून ओल्या फडक्याने पुसायची सवय लावा !
  • तुमच्या बाईला समजावून तुम्ही कितीतरी पाणी वाचवू  शकतात.
Save water it will save you later!


Saturday, November 24, 2012

आपण काय "धडा" शिकलो ?

social networking website वरील comment आणि त्यावर झालेली कार्यवाही ह्यावर खूप चर्चा झाली आणि सर्वांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मुलीला clean chit देवून पोलिसांची कार्यवाही चुकीची ठरवली. पण पोलिसांची कार्यवाही चुकीची ठरली म्हणून त्या मुलीने जे केले त्याचे समर्थन होऊ शकते का?
कार्यवाही चुकीची म्हणजे दुसरी बाजू बरोबरच असा निर्णय असू शकत नाही. थोडक्यात तुम्ही नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल दोन्ही बाजूंकडून "समन्जसपणा" अपेक्षित होता. समाजात राहायचे म्हणजे "उचलली जीभ आणि लावली टाळ्याला" आणि कीबोर्ड आहे म्हणून बडवल्या कीज आणि टाकले कॉमेंट असे करून चालत नाही. त्यामुळे मुलांना social responsibility ची सुसंकृत जाणीव करून देणे हे त्याच्या पालकांचे आणि शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे तेथेच जर आपण चुकत असू तर असे प्रसंग वारंवार घडतील.

Freedom of expression comes with responsibilities, especially when it comes with serious implications for peace. - Mohammed Morsi
With great power comes great responsibility


29-Nov-2012

मी वर जे विचार मांडले तेच आज एका TV News Channel वर Responsible netizen ह्या मथळ्याखाली ऐकायला मिळाले. शेवटी एक गोष्ट सांगावीशी वाटते फक्त facebook likes साठी टाकण्यात आलेल्या immature विचारांना किती गांभीर्याने घ्यायचे ह्याचापण विचार सुजाण नागरिकांनी करावयास हवा. नाहीतर ज्या मुद्द्यासाठी आपण पेटून उठलो होतो तो मुद्दा बाजूला सारून आपापली राजकारणी पोळी भाजून घेण्यात एका पेक्षा एक डोकेबाज राजकारणी तुम्हाला पदोपदी बघावयास मिळतील.

तरुणांना एक सांगावेसे वाटते . मुद्दा विचारपूर्वक मांडा आणि त्यावर तुमचा पूर्ण विश्वास असेल तर मग मागे वळू नका .

मत करो विश्वास उसपर जो परंपरा से पास आया हैं!
मत करो विश्वास केवल इसलिए की गुरु ने बताया हैं!
स्वयंम ही परिख्षण करो निरिक्षण करो!
फिर पाओ जो विचार कल्याण का सब प्राणियोंका
तो जुड़कर रहो उससे!
वही होगा पथप्रदर्शक!
क्यूंकि वोह विचार होगा स्वनिर्मित..!
इसलिए होगा सुनिश्चित!

--गौतम बुद्ध!





Sunday, October 14, 2012

छंद आणि आवड जोपासतांना...

मी माझ्या मागील एका पोस्ट मध्ये खालील तीन  प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावे असे लिहिले होते
१) तुम्हाला तुमचे ८ तासाचे काम आवडते काय?
२)काम केल्यानंतर तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी तुमच्याजवळ पुरेसा वेळ आहे का?
३)तुमच्या जवळ स्वकष्टाचा तुमच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा पैसा आहे का?

http://sanjeevchaudhary.blogspot.in/2012/09/blog-post_22.html

यातील पहिल्याच प्रश्नाचे हो उत्तर येणारे भाग्यवान कमी असतात. पण उत्तर नाही आले म्हणून काही लगेच कोणी पटकन नशिबी आलेले
काम बदलवू शकत नाही. पण जगण्या साठी आवडीचे काम असो वा नसो काम करावेच लागते. पण कामा व्यतिरिक्त मन आनंदी ठेवण्यासाठी बरेच लोक एखादा आवडीचा छंद जोपासतात. असा एखादा आवडीचा छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा लागतो. वेळ नाही वेळ नाही असे म्हणून आवडीच्या छंदाला छेद देणे हा एक प्रकारे स्वतःवर अन्याय असतो. काही भाग्यवान लोकांना आवडीच्या छंदाचा व्यवसाय करण्याची संधी मिळते.

तुमच्या आवडीच्या छंदाचे व्यवसायात रुपांतर करणे ह्याला तपश्चर्या लागते.

मला script writer व्हायचे होते आणि कुमार वयात काय व्हायचे आहे असे कोणी विचारले तर मनातल्या मनात यश चोप्रा उत्तर यायचे पण सामाजिक भान ठेवून Engineer असे उत्तर मी द्यायचो. मी Electronics Engineer झालो आणि काळाची पावले ओळखून कॉम्पुटर आयटी क्षेत्रात
करीयर केले. मला ह्या क्षेत्रात काम करावयास मिळाले हे मी माझे भाग्यच समजतो. ह्या क्षेत्राने भारतातील अनेक कुटुंबांमध्ये आणि पर्यायाने देशामध्ये सुबत्ता आणली. मोठ्या पगाराच्या नौकारीचे दुहेरी इंजिन अनेक lower class कुटुंबांना  upper middle class श्रेणीत घेऊन गेले. ह्याचाच फायदा घेऊन बिल्डर आणि राजकारण्यांनी घरांच्या किमती अवाच्या सवा वाढवून आपली वैयक्तिक तिजोरी भरून घेतली.
मला एक गोष्ट काळत नाही मनात आणले तर पैसा गोळा करण्याची आवड जोपासताना राजकारणी जनतेसाठी काही हिताचे निर्णय पण घेऊ शकतात. फक्त थोडा त्याग दाखवण्याची तयारी हवी असते. पण मला विश्वास आहे हळू हळू राजकारणी त्यांची अति पैसा गोळा करण्याची हाव कमी करून जनतेच्या भल्याचे निर्णय घेण्याची आवड जोपासायला सुरुवात करतील.

उम्मीद पे दुनिया कायम हैं!
असो.


तर संगावयाचा मुद्दा असा ह्या आईटी क्षेत्राने भारताला बरेच काही दिले हे खरे. अणि आज प्रत्येक क्षेत्रामधे आईटी चा उपयोग होत आहे. असे एकही क्षेत्र नहीं जिथे कंप्यूटर अणि आईटी चा उपयोग नहीं. खरे म्हणजे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात करियर करावयाचे असेल तरी ह्या क्षेत्राचे मुलभुत ज्ञान असणे तुमच्या पुढील प्रगति साथी आवश्यक झाले आहे. माझी आवड script writer व्हावे अशी होती पण काळाची पाऊले ओळखून मी कॉम्पुटर भाषा शिकून कॉम्पुटर script लिहायला शिकलो आणि थोड्या प्रमाणात का होईना माझ्या आवडीशी संलग्न राहिलो. 

माझा मुलगा हर्षवर्धन ह्याला रोटरी क्लबच्या एकांकिका स्पर्धे मध्ये रोटरी क्लब शिवाजी नगर पुणे तर्फे एका एकांकी मध्ये काम करण्याची संधी मिळाली रोटरी तर्फे त्याला मिळालेल्या ह्या संधीचे त्याने सोने करून दाखवले आणि त्या दिवशी रोटरी सभासदांनी आणि प्रेक्षकांनी त्याच्या केलेल्या कौतुकामुळे आम्ही त्याचे पालक आहोत ह्याचा आम्हाला अभिमान वाटला.

Thanks to all "देता देता एक दिवस टीम"


आवड आणि छंद जोपासतांना एक सांगावेसे वाटते बरीच मुले आयुष्याच्या महत्वाच्या पहिल्या वळणावरच (गद्धे पंचविशीत) छंद जोपासण्यासाठी आयुष्याची वाट हरवून बसतात. आयुष्यात एक FIX Income प्लान महत्वाचा असतो, आवड आणि छंद जोपासण्यासाठी नंतर उभे आयुष्य असते. आयुष्यातील खरा आनंद मिळवण्यासाठी आयुष्यातील एका ठराविक वळणानंतर तुम्ही low profile आयुष्याची निवड करावयास हवी. शेवटी तुमचा आनंद कश्यात आहे हे फक्त तुम्हीच ठरवू शकतात.

fix Income प्लान च्या पायावर उभारलेला तुमच्या आवडीच्या छंदाचा इमला तुम्हाला निखळ आनंद देईल
अन्यथा आयुष्यात कराव्या लागणाऱ्या तडजोडी मुळे तुमच्या आवडीच्या छंदातील आनंदाला काळजीच्या व्यथेची किनार फक्त दुक्ख देऊन जाईल.




नेट सर्फिंग करीत असतांना मला एका article मधे खालील विचार वाचावयास मिळाले.
मला ते पटले पण नीट विचार केला तर तुम्हाला जाणवेल ह्या विचारांचा एकूण सार म्हणजेच "गीता सार"

5 Ways To Be Satisfied In Any Job - (Aol Jobs)
1. Start focusing on the process, rather than the outcome.
2. Realize that passion comes from you, not from your job
3. Stop labeling events as ‘good’ or ‘bad.’
4. Realize that you are playing a role.
5. Know how to let things go.


"गीता सार"
"Karmanye Vadhikaraste, Ma phaleshou kada chana,
Ma Karma Phala Hetur Bhurmatey Sangostva Akarmani"
"

कर्म पर ही तुम्हारा अधिकार हैं! कर्मोंका का फल तुम्हारा उद्देश्य नहीं होना चाहिए
और ऐसाभी न हो कर्म न करनेके प्रति तुम्हारी आसक्ति बढे!
जो हुआ, वह अच्छा हुआ, जो हो रहा है, वहअच्छा हो रहा है, जो होगा, वह भी अच्छा हीहोगा।
तुम्हारा क्या गया, जो तुम रोते हो? तुम क्यालाए थे, जो तुमने खो दिया? तुमने क्या पैदाकिया था, जो नाश हो गया? 
जो लिया यहीं से लिया। जो दिया, यहींपर दिया।


"वरील विचार तुम्हाला मान्य नसतील आणि तुमचा Process अथवा system लाच विरोध असेल तर
तुम्ही Top management मध्ये जाऊन Process अथवा System बदलण्याचा प्रयत्न करावयास हवा.
परंतु त्या साठी लागतात अविरत कर्म अपरिमित कष्ट. ते करण्याची तयारी न दाखवता फक्त टीका
तुमच्या समस्येचे समाधान होऊ शकत नाही."




गीता - आशावादी विचार - acceptance of life




Acceptance & Negation of life

गीता 5 हजार वर्षापूर्वी एक आशावादी विचार देऊन गेली जो आज पर्येंत टिकून आहे.परंतु त्यानंतर २५०० वर्षानंतर गौतम बुद्धांनी विचार करायला लावणारा एक विचार दिला तो जीवनातील निराशावाद दर्शवितो अशा आणि निराशा एकाच जीवनाच्या दोन बाजू आहेत कोण वाईट कोण चांगले असे एकदम judgmental होउन आपण निर्णय घेऊ शकत नाही. विमानाचा शोध एका आशावादी विचाराचा विजय हवाई छत्री Plane Parachutes एका निराशावादातून जन्मलेला शोध. पण दोघांचाही उपयोग महत्वाचा.




मत करो विश्वास उसपर जो परंपरा से पास आया हैं!
मत करो विश्वास केवल इसलिए की गुरु ने बताया हैं!
स्वयंम ही परिख्षण करो निरिक्षण करो!
फिर पाओ जो विचार कल्याण का सब प्राणियोंका
तो जुड़कर रहो उससे!
वही होगा पथप्रदर्शक!
क्यूंकि वोह विचार होगा स्वनिर्मित..!
इसलिए होगा सुनिश्चित!

--गौतम बुद्ध!




Sunday, September 30, 2012

PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना...

झाडे लावा झाडे लावा असे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत पण फक्त झाडे लावल्यामुळे आपले कर्तव्य संपते असे नाही. झाडे लावल्यानंतर ती जगवणे जास्त महत्वाचे असते . त्या साठी काही महिने काही वर्ष ती झाडे स्वावलंबी होई पर्येंत त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. जी गोष्ट आपल्या मुलांसाठी लागू होते आणि आपण आपले कर्तव्य म्हणून पार पडतो तशीच काळजी आपण झाडांची घ्यावयाची असते.

आमच्या सोसायटीच्या मागे टेकडी आहे त्या टेकडीवर एक हनुमान मंदिर आहे आणि बरीच मंडळी सकाळ संध्याकाळ ह्या टेकडीवर झाडे लावून त्यांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात. ह्या पावसाळ्यात

मी पण त्या टेकडीवर १५ झाडे लावली आहेत. आणि झाडे लावण्याचे एक तंत्र मी ह्या मंडळीन कडून शिकलो आहे. झाड लावताना खोल खड्डा खणल्या नंतर त्या झाडा शेजारीच ते एक बुड कापलेली बाटली

लावावी. मग रोज टेकडीवर फिरायला येतांना पाण्याच्या बाटल्या घेवून याव्यात आणि ह्या बाटलीत ते पाणी घालावे म्हणजे कमी पाणी झाडाच्या मुळा पर्येंत पोहचण्याची सोय होते आणि कमी पाण्यात झाडे जागविता येतात.

तर तुम्हीपण फिरायला जातांना पाण्याची बाटली बरोबर घेऊन जात जा आणि काही झाडे दत्तक घेउन त्यांना
स्वावलंबी होई पर्येंत वाढवण्याची जबाबदारी स्वीकारा. मी ह्याला PSR - Personal Social Responsibility असे म्हणतो.

हाच नियम मूला - मुलींसाठी सुद्धा लागू पडतो . तुमची मुले स्वावलंबी होई पर्येंत त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आपले कर्तव्य असते. आणि आता तर फक्त चांगल्या विद्यालयातून चांगली डिग्री मिळवली म्हणजे नौकरी मिळेल असे चित्र आता राहिले नाही. चांगल्या डिग्री सोबत नवीन अद्यावत कौशल्ये शिकणे (Adding additional current new skill sets to our resume) हि काळाची गरज झालेली आहे. ईश्वर कृपेने माझा IT - Information technology क्षेत्रात चांगला अनुभव झाला आहे. तोच अनुभव आणि ज्ञान नवीन तरुण पिढीशी Share करावे हे माझ्या PSR (Personal Social responsibility) मधील एक Target असेल.

तर तुम्ही पण तुमचे PSR Target ठरवा आणि पूर्ण करा.






दिनांक :५-ऑक्टोबर-२०१२
जनहित याचिका

काल टेकडीवर गेलो असतांना एका विचित्र घटनेने मन विचलित झाले.
आमच्या मागील हनुमान टेकडीवर सेवाभावी मंडळींनी झाडांच्या शेजारी मुळा पर्येंत पाणी झीरपण्यासाठी बुड कापून लावलेल्या ३0-३५ बाटल्या कुणी तरी काढून टाकल्या होत्या.
प्रथम मला वाटले हे भंगारवाल्यांचे काम असावे. पण नंतर असेही कळले कि हे टेकडी स्वच्छ करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे पण काम असू शकते. आणि तसे असेल तर त्या सेवाभावी संस्थेचे जाहीर कौतुकच करावयास हवे. टेकडी प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी त्यांना फक्त नेमक्या त्याच
३०-३५ बाटल्या दिसल्या ह्या बद्दल ते जाहीर सन्माना साठी नक्कीच लायक आहेत. त्या व्यतिरिक्त तेथे पडलेला दुसरा कचरा त्यांना दिसला नाही. तर तुम्हाला ह्या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यान बद्दल काही माहिती असेल किंवा त्यांना माहिती देणार्यान बद्दल काही माहिती असल्यास त्वरित कळवावे

त्या सेवाभावी माणसाला मला एक सुचवावेसे वाटते कि बाटल्या काढून टाकण्या ऐवजी बाटल्या लावणाऱ्या सेवाभावी लोकांना झाडे जगल्यानंतर काही महिन्यांनी बाटल्या काढून टाकाव्यात अशी सूचना केली असती तरी समजण्या सारखे होते.
पण....असो.


देव तारी त्याला कोण मारी.

सकाळ पासून पडणारा उत्तम पाउस झाडांना जागविण्या साठी पुरेसा आहे.काही लोक नियमांचा उपयोग फक्त लोकांना त्रास देण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठीच करतात
तर काही लोक नियम धाब्यावर बसवून लोकांच्या भल्यासाठी काम करतात. ह्या पैकी योग्य अयोग्य हे ठरविणारी रेषा खूप सूक्ष्म असते.

नियम ह्यामधील जो "यम" आहे तो कधीच बदलत नसतो "नियम" मात्र कालानुरूप बदलत असतात. खरे बघितले तर नियम हे समाज सुधारणे साठीसमाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक नियमात एक पळवाट लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते.