Friday, June 26, 2015

शिक्षण पद्धती हि जीवनात यशस्वी आणि सुखी होण्यासाठी असावी


२०-जून २०१५ ला सकाळ आयोजित " प्रवेशाचा गेट वे " हा  कार्यक्रम   International Institute of Information Technology च्या सभागृहात मोठ्या पडद्यावर बघितला  .  त्या कार्यक्रमात  महाराष्ट्राचे  शिक्षण  मंत्री   विनोद तावडे  ह्यांचे विचार ऐकावयाची  संधी मिळाली . त्यांचे विचार आणि मुलांच्या प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे  प्रभावशाली होती . सध्याच्या शिक्षण  व्यवस्थेमध्ये एका अमुलाग्र बदलाची गरज आहे आणि त्या साठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी  , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिक्षणमंत्री विनोद तावडे ,  मनुष्यबळ विकासमंत्री स्म्रिती इराणी  अश्या नेतृत्वा कडून खूप अपेक्षा आहेत.


माझ्या मते सध्याची शिक्षण व्यवस्था म्हणजे एक प्रचंड अस्थावस्थ पसरलेली अडगळ झालेली आहे. ज्याला व्यवस्थित करण्याची नितांत आवश्यकता आहे.  विचार करा १० वि १२ च्या अभ्यासाची तयारी ८ वि ९ वि पासूनच सुरु होते. त्या नंतर १० ते १२ वि चा तो खडतर प्रवास  आणि   त्याहूनही खडतर इंजिनियरिंग  चे ४ वर्ष असतात आणि एवढे करूनही चांगल्या नौकरीची हमी नाही .  मग काही खास कौशल्य आत्मसात करण्यासाठी धडपड. एवढे मोठे अग्निदिव्य फार थोडे लोक पार करू शकतात  आणि बहुसंख्य मुलांच्या माथी फेल असा शिक्का बसतो. त्यावर विनोद तावडेंनी सांगितलेले विचार एकदम पटले . खर तर मुले फेल होत नाहीत तर त्यांच्यातील खरे गुण ओळखण्यात आपण फेल होतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना  काही गुण असतात ते ओळखून त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊन जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग जी शिक्षण पद्धती देईल अश्या शिक्षण पद्धतीची सध्या गरज आहे.

सध्या शिक्षणमंत्री विनोद तावडे ह्यांच्या पदवीबाबत वाद निर्माण करण्यात आला आहे. त्यांच्या वाढत्या लोकप्रीयतेचा  हा परिणाम  असावा . ह्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे ह्यांनी दिलेले उत्तर खूप बोलके आहे . ते म्हणाले " माझ्या   कडे ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदवी आहे हे मी  कधीच लपविलेले नाही आणि  ज्ञानेश्वर विद्यापीठाचा विद्यार्थी होतो ह्याचा मला अभिमान आहे "  ह्या वादा मुळे   परत एकदा
ज्ञानेश्वर  विद्यापीठाचे नाव आणि हेतू काय होता ह्याची  माहिती झाली . शिक्षण आणि कार्यानुभव  ह्यावर आधारित शिक्षण पद्धती आणि ज्यांना काही कारणास्तव फेल चा शिक्का  मिळाला  त्यांना परत संधी अश्या चांगल्या  उद्दिष्टाने  सुरु झालेले हे विद्यापीठ . ते का बंद झाले ह्याला  कारणे असतील पण त्या वादात न पडता ह्या पुढे कार्यानुभवावर आधारित शिक्षण पद्धती असावी ह्या विचारावर विचार  करण्याची गरज आहे असे माझे मत आहे.

९ ते १२  फक्त पुस्तकी आभ्यास करून  लाखो रुपये खाजगी कोचिंग क्लासेस ला भरून नको त्या वयात  आयुष्यातली ४ वर्षे फक्त चांगल्या इंजिनीरिंग विद्यालयात  प्रवेश मिळावा ह्या एकाच ध्येयानी वाया घालवली जातात . त्यामुळे जेव्हा खऱ्या  धेय्याची आणि खडतर  अभ्यासाच्या सुरुवातीची गरज  असते (इंजिनीरिंग ला प्रवेश मिळाल्या  नंतर) तो पर्येंत अति  श्रमाने विद्यार्थी थकलेला असतो. मग तो किंवा ती कसेतरी इंजिनीरिंग पूर्ण करतो/करते . पण  एवढे करूनही चांगल्या नौकरीची हमी नाही .  मग काही खास कौशल्य आत्मसात करण्यासाठी धडपड. म्हणून म्हणतो सध्याची शिक्षण व्यवस्था म्हणजे एक प्रचंड अस्थावस्थ पसरलेली अडगळ झालेली आहे. ज्याला व्यवस्थित करण्याची नितांत आवश्यकता आहे.थोडक्यात शिक्षण पद्धती हि जीवनात यशस्वी आणि सुखी होण्यासाठी असावी फक्त पास आणि  नापास चा शिक्का मारण्यासाठी नसावी.

जे झाले ते झाले त्यावर फक्त वैचारिक वाद करण्यापेक्षा भविष्यात आपल्याच मुलांचे भविष्य सुंदर करण्यासाठी आपण काय करू शकतो ह्यावर चर्चा करण्याची  जास्त  गरज आहे. नवीन तंत्र ज्ञानाचा उपयोग  करून जास्तीत जास्त Practical Knowledge विद्यार्थ्यांना  कसे देऊ शकतो ह्यावर विचार करण्याची गरज आहे.

खालील व्हिडीओ मधे  नासात  केलेला एक भौतिक शास्त्राचा साधा नियम सांगणारा प्रयोग आहे  , पण तो अनुभवतांना मिळालेला निखळ आनंद एकदा खालील व्हिडीओ  बघून तुम्ही अनुभवाच मग तुम्हाला कळेल घोकंपट्टी  करून मिळवलेले ज्ञान आणि अनुभवातून मिळालेले खरे ज्ञान ह्यातील फ़रक. 
अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा आनंद काही औरच असतो.


Brian Cox visits the world's biggest vacuum chamber - Human Universe: Episode 4 Preview - BBC Two


Apollo 15 Hammer and Feather Drop


                                                             My Posts Your background, highest level of education, or IQ is irrelevant when it comes to earning money.

All the best for all Aspiring Engineering students . 
Fill the option form carefully.
Don't worry there is someone somewhere for everyone :)No comments: