Monday, September 5, 2022

Happy Teachers Day


आज शिक्षक  दिना  निमित्ताने मी माझ्या आयुष्यात येऊन मला वेळोवेळी शिकवून गेलेल्या माझ्या सर्व गुरूंना - TIME,Books, Teacher ,Mentor , Google आणि माझे अंतर्मन - ह्यांना वंदन करतो . 




माझ्या मते सध्याची शिक्षण व्यवस्था म्हणजे एक प्रचंड अस्थावस्थ पसरलेली अडगळ झालेली आहे. ज्याला व्यवस्थित करण्याची नितांत आवश्यकता आहे.  विचार करा १० वि १२ च्या अभ्यासाची तयारी ८ वि ९ वि पासूनच सुरु होते. त्या नंतर १० ते १२ वि चा तो खडतर प्रवास  आणि   त्याहूनही खडतर इंजिनियरिंग  चे ४ वर्ष असतात आणि एवढे करूनही चांगल्या नौकरीची हमी नाही .  मग काही खास कौशल्य आत्मसात करण्यासाठी धडपड. एवढे मोठे अग्निदिव्य फार थोडे लोक पार करू शकतात  आणि बहुसंख्य मुलांच्या माथी फेल असा शिक्का बसतो. खर तर मुले फेल होत नाहीत तर त्यांच्यातील खरे गुण ओळखण्यात आपण फेल होतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना  काही गुण असतात ते ओळखून त्यांना योग्य पद्धतीने शिक्षण देऊन जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग जी शिक्षण पद्धती देईल अश्या शिक्षण पद्धतीची सध्या गरज आहे.

जे झाले ते झाले त्यावर फक्त वैचारिक वाद करण्यापेक्षा भविष्यात आपल्याच मुलांचे भविष्य सुंदर करण्यासाठी आपण काय करू शकतो ह्यावर चर्चा करण्याची  जास्त  गरज आहे. नवीन तंत्र ज्ञानाचा उपयोग  करून जास्तीत जास्त Practical Knowledge विद्यार्थ्यांना  कसे देऊ शकतो ह्यावर विचार करण्याची गरज आहे.

नवीन  शैक्षणिक धोरण नीट राबविल्यास सध्याच्या  शिक्षण पद्धती मधील बराचश्या त्रुटी   दूर करता येतील  अशी आशा  करू या आणि त्या साठी आपणही काही  प्रयत्न करू  या.  पण हे करितांना लक्षात असू द्यावे 
शिक्षण पद्धती हि जीवनात यशस्वी आणि सुखी होण्यासाठी असावी

खालील व्हिडीओ मधे  नासात  केलेला एक भौतिक शास्त्राचा साधा नियम सांगणारा प्रयोग आहे  , पण तो अनुभवतांना मिळालेला निखळ आनंद एकदा खालील व्हिडीओ  बघून तुम्ही अनुभवाच मग तुम्हाला कळेल घोकंपट्टी  करून मिळवलेले ज्ञान आणि अनुभवातून मिळालेले खरे ज्ञान ह्यातील फ़रक. 
अनुभवातून मिळालेल्या ज्ञानाचा आनंद काही औरच असतो.


Brian Cox visits the world's biggest vacuum chamber - Human Universe: Episode 4 Preview - BBC Two






Apollo 15 Hammer and Feather Drop








                                                           My Posts





2 comments:

Aparna patil said...

Very true situation..

Anonymous said...

Very true sir