Sunday, November 22, 2026

Rotary Rotaract Youth Festival 2026




रोटरी व रोटरॅक्ट युवा महोत्सव २०२६ — रोटरीचा अनुभव आणि रोटरॅक्टचा उत्साह! 😊

शनिवार, २१ नोव्हेंबर २०२६ रोजी पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजच्या सुंदर परिसरात रोटरी व रोटरॅक्ट युवा महोत्सवाचा पहिला दिवस अनुभवला. आपला रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगर या महोत्सवाचा सह-आयोजक होता. त्यामुळे एकीकडे महोत्सवात फिरून सगळं पाहता आलं, तर दुसरीकडे आयोजनातही सहभागी होता आलं.
अनुभव आणि तरुणाईचा उत्साह एकत्र आले की काय घडतं?



रोटरीच्या अनुभवी ज्येष्ठ सदस्यांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून महोत्सवासाठी आवश्यक त्या सर्व सोयी उभ्या केल्या. आणि पहिल्या दिवशी प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यावर, तरुण रोटरॅक्टर्सनी तितक्याच उत्साहाने सगळं व्यवस्थापन सांभाळलं.

त्यांना काम करताना पाहून मनात एक विचार आला. तरुणांवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे एखादी खरी जबाबदारी सोपवली, की त्या अनुभवातून ते किती काही शिकतात! आपली भूमिका अगदी सोपी होती. त्यांना एवढंच सांगायचं, “काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!” 😊

शेलार सर आणि आपल्या इंटरॅक्टच्या विद्यार्थ्यांसोबत स्टॉल्सची सफर


माध्यमिक विद्यालय, एरंडवणे येथील आपल्या इंटरॅक्ट क्लबचे १५ विद्यार्थी शेलार सरांसोबत महोत्सवाला आले होते. शेलार सर अतिशय सक्रिय शिक्षक आहेत. ते लोकमतसाठी पत्रकारिताही करतात. त्यामुळे समाजात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या अनेक लोकांशी त्यांची ओळख आहे. सर आणि विद्यार्थ्यांसोबत स्टॉल्सना भेट देताना खूप मजा आली.



आम्ही अनेक स्टॉल्सना भेट दिली, तिथल्या लोकांशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या उपक्रमांबद्दल जाणून घेतलं. त्यातून नवीन माहिती मिळाली, काही नव्या कल्पना सुचल्या आणि नव्या ओळखीही झाल्या. कधी कधी स्टॉलवरच्या पाच मिनिटांच्या गप्पांतून एखादा उपक्रम किती छान समजतो, नाही का? 😊

यात विशेष लक्षात राहिला तो श्री. दत्तात्रय वारे गुरुजींच्या ‘रयतेची शाळा’ अभियानाचा स्टॉल. युवा सेवा संचालक म्हणून अशा भेटीतून आपल्या शालेय उपक्रमांसाठी कोणत्या नव्या कल्पना घेता येतील, असा विचार मनात आला.



किमया हॉलमध्ये दोन संघ, एक रंगमंच! 🎭

सह-आयोजक म्हणून किमया हॉलमधील स्किट स्पर्धेला सहकार्य करण्याची जबाबदारी आपल्या क्लबकडे होती. या स्पर्धेत दोन संघांनी आपली स्किट्स सादर केली. त्यात ‘आश्रय इनिशिएटिव्ह फॉर चिल्ड्रेन’ या संघाने विजेतेपद पटकावले. आपल्या क्लबचे अध्यक्ष रोटेरियन प्रकाश गायकवाड यांच्या हस्ते विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. विजेत्या संघाचं मनापासून अभिनंदन आणि रंगमंचावर आपली कला सादर करणाऱ्या दोन्ही संघांचं कौतुक! 👏




पहिल्या दिवसाची आठवण काढली की मला तीन दृश्यं डोळ्यांसमोर येतात. स्टॉल्सवर प्रश्न विचारत नव्या गोष्टी जाणून घेणारे आपले इंटरॅक्टचे विद्यार्थी, रंगमंचावर स्वतःला व्यक्त करणारे स्पर्धक आणि संपूर्ण कार्यक्रमाची धुरा सांभाळणारे रोटरॅक्टर्स. एकाच दिवशी तरुणाईची ही तिन्ही रूपं जवळून पाहायला मिळाली, याचा मला खूप आनंद झाला! 😊

रोटरी व रोटरॅक्ट युवा महोत्सव २०२६ — आपल्या RCPS वेबसाइटवर



Rotary & Rotaract Youth Festival 2026 — Rotary Experience, Rotaract Energy! 😊

On Saturday, 21 November 2026, I spent the first day of the Rotary & Rotaract Youth Festival on the beautiful Fergusson College campus in Pune. Our Rotary Club of Pune Shivajinagar was a co-host, so I had the opportunity to experience the festival both as a visitor and as part of the team.
What happens when experience and youthful energy come together?

The experienced Rotary members used their expertise to set up the infrastructure for the festival. On Day 1, it was the young and dynamic Rotaractors who were on the ground, managing the event and putting all that planning into action.

As I watched them, I thought about how much young people learn when we give them a real responsibility and trust them to handle it. Our role, quite simply, was to say, “काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत!” 😊

Exploring the stalls with our Interact students

Fifteen students from our Interact Club at Madhyamik Vidyalay, Erandawana, attended the festival with Shelar Sir. He is an active teacher who also does journalism for Lokmat. He knows many people involved in community work, and it was a pleasure to explore the stalls with him and the students.

We visited several stalls, spoke to the people behind them, and learned what they were working on. I came away with new ideas and new connections. Sometimes, a simple conversation at a stall teaches you more about an initiative than reading a page about it!

One stall that stayed with me was श्री. दत्तात्रय वारे गुरुजींच्या ‘रयतेची शाळा’ अभियानाचा स्टॉल. As Youth Services Director, I found myself thinking about how conversations like this could lead to new ideas for our own school outreach work.
Two teams, one stage at Kimaya Hall 🎭

As co-hosts, our club was given the responsibility of supporting the skit competition at Kimaya Hall. Two teams performed, and the team from Ashraya Initiative for Children won the competition. Our club president, Rtn. Prakash Gaikwad, felicitated the winners. Congratulations to the winning team and to both teams for taking the stage!

What I’ll remember most from Day 1 is seeing young people take on different roles. Our Interact students were asking questions and exploring new ideas. The skit teams were expressing themselves on stage. And the Rotaractors were running the show. It was a joy to see all three in one afternoon. 😊

Rotary & Rotaract Youth Festival 2026 on the RCPS website

No comments: