गणेशोत्सव २०२६ — बाप्पाच्या आगमनापासून Funfair पर्यंत... आठवणींचा एक सुंदर महिना 😊🙏
गणेशोत्सव म्हटला की आपल्या डोळ्यासमोर गणपती बाप्पाचे आगमन, आरती, प्रसाद, मित्र-मैत्रिणी, शेजारी, नातेवाईक आणि अर्थातच विसर्जनाची मिरवणूक येते.
पण माझ्यासाठी गणेशोत्सव २०२६ हा फक्त दहा दिवसांचा उत्सव राहिला नाही.
यावर्षी तो पर्यावरण, विद्यार्थी, समाजकार्य, कुटुंब, Rahul Towers आणि Rotary अशा अनेक गोष्टींना जोडणारा जवळजवळ संपूर्ण महिनाभराचा एक सुंदर प्रवास झाला. 😊
सुरुवात झाली पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेने
या वर्षीच्या गणेशोत्सवाची माझ्यासाठी सुरुवात झाली सोमवार, ७ सप्टेंबर २०२६ रोजी माध्यमिक विद्यालयातील पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेने.
मुलांनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करण्याचा आनंद घेतला.
गणेशोत्सव साजरा करताना श्रद्धा आणि उत्साहाबरोबरच पर्यावरणाची काळजी घेण्याचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
कार्यशाळेची छोटीशी झलक:
https://youtube.com/shorts/WWPP7VMgN2Q?si=ppgLFRqNUMEfrg-i
“घडवा नवीन भारत” — विद्यार्थ्यांसोबत एक वेगळा अनुभव
त्यानंतर १२ सप्टेंबर रोजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना रामकृष्ण मठ, सिंहगड रोड येथे आयोजित “घडवा नवीन भारत” या शिबिराला घेऊन जाण्याचा योग आला.
माझ्या मते शालेय शिक्षण फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसावे.
योग्य वयात मुलांना चांगले विचार, प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळाली, तर त्याचा परिणाम त्यांच्या पुढील आयुष्यावर नक्कीच होतो.
आपण पुढच्या पिढीला काय देतो?
फक्त शिक्षण?
की शिक्षणाबरोबर विचार करण्याची दिशा आणि चांगला माणूस होण्याची प्रेरणाही?
हा प्रश्न मला नेहमीच महत्त्वाचा वाटतो.
१४ ते २० सप्टेंबर — Rahul Towers मधील गणेशोत्सव
आणि मग आला आपल्या सर्वांचा लाडका गणेशोत्सव!
१४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर — गणेश चतुर्थीपासून गणेश विसर्जनापर्यंतचा उत्सव.
हे दिवस सुरू कधी होतात आणि संपतात कधी, ते कळतच नाही. 😊
सकाळ-संध्याकाळच्या आरत्या, प्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, मुलांची धावपळ, ज्येष्ठांचा सहभाग, गप्पा, भेटीगाठी...
आपल्या Society मधील उत्सवांचे मला नेहमीच एक वेगळे महत्त्व वाटते.
आपण वर्षभर एकाच इमारतीत किंवा परिसरात राहतो. पण अशा उत्सवांमुळे आपण फक्त neighbours न राहता एकमेकांना ओळखणारा आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा community बनतो.
Glimpses of Rahul Towers Ganeshotsav 2026:
https://youtu.be/MGWpimutkpk
आणि मग येतो तो क्षण...
गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या! 🙏
गणेश विसर्जन म्हणजे उत्सवाची सांगता असली, तरी पुढच्या वर्षी पुन्हा भेटण्याचे invitation बाप्पाला आपण त्याच वेळी देऊन ठेवतो. 😊
गणेश विसर्जनाची झलक:
https://youtube.com/shorts/XbWCNRvBt5U?si=qrznHNvHAfFXWgts
दरवर्षी आमच्या घरी प्रियंका स्वतः पर्यावरणपूरक गणपती बाप्पाची मूर्ती बनवते. त्याच मूर्तीची आम्ही घरीच मनोभावे स्थापना करतो आणि विसर्जनही बाहेर न करता घरीच पर्यावरणपूरक पद्धतीने करतो. श्रद्धा आणि परंपरा जपत असतानाच पर्यावरणाची काळजी घेण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे. 😊🙏
विसर्जनानंतर Rotary Fellowship
दरवर्षी गणेश विसर्जन झाले की आमच्या Rotary Club of Pune Shivajinagar ची Fellowship Picnic असते.
या वर्षी ती Foresta, मुळशी येथे झाली.
Rotary मध्ये आपण वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम करतो. Meetings, projects, planning यामध्ये व्यस्त असतो.
पण Fellowship तितकीच महत्त्वाची.
कारण कोणतीही संस्था केवळ projects मुळे मजबूत होत नाही; ती मजबूत होते माणसांमधील मैत्री आणि नात्यांमुळे.
मुळशीच्या निसर्गरम्य वातावरणात Rotary मित्रांसोबत घालवलेला दिवस त्यामुळेच खास ठरला.
Rotary Club of Pune Shivajinagar — Fellowship at its best 😊👌
https://youtube.com/shorts/HN8kwvcVP2I?si=qj6XcOURvytRMa4t
आणि शेवटी Rahul Towers Funfair! 😊
गणेशोत्सव संपला, Rotary Fellowship झाली...
पण September celebrations अजून संपले नव्हते! 😊
२६ सप्टेंबर, शनिवार रोजी Rahul Towers मध्ये आयोजित केलेला Funfair अतिशय उत्साहात आणि उत्तम प्रकारे पार पडला.
वेगवेगळे food stalls, रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग, मुलांचा उत्साह आणि संपूर्ण परिसरातील आनंदी वातावरण यामुळे संध्याकाळ खूपच छान झाली.
आमच्यासाठी आणखी एक खास गोष्ट म्हणजे प्रियंकाने Momos Stall लावला होता. 😊
घरातील सदस्यांनी अशा community events मध्ये स्वतः सहभागी होणे, काहीतरी नवीन करून पाहणे आणि त्याचा आनंद घेणे—हे मला नेहमीच आवडते.
RT Funfair ची झलक:
https://youtube.com/shorts/K7dO2fLsydQ?si=fJS8v5o4lZqgrqKl
एका उत्सवातून कितीतरी आठवणी...
७ सप्टेंबरची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळा...
१२ सप्टेंबरचे “घडवा नवीन भारत” शिबिर...
१४ ते २० सप्टेंबर Rahul Towers Ganeshotsav...
गणेश विसर्जन...
त्यानंतर Rotary Fellowship...
आणि २६ सप्टेंबरचा Rahul Towers Funfair...
बघता बघता September संपत आला!
आयुष्य कदाचित असेच असते.
Events येतात आणि संपतात...
पण त्यातून निर्माण झालेली माणसांची नाती, अनुभव आणि आठवणी आपल्या सोबत राहतात.
श्रद्धा असो, समाजकार्य असो, विद्यार्थ्यांसोबत काम असो, Rotary असो, Society असो किंवा कुटुंबासोबत घालवलेला वेळ असो—शेवटी या सगळ्याच्या केंद्रस्थानी माणूस आणि माणसांमधील संवाद हाच असतो असे मला वाटते.
आणि म्हणूनच प्रत्येक वर्षी गणेशोत्सव संपताना एकच भावना मनात येते—
गणपती बाप्पा मोरया! 🙏
पुढच्या वर्षी लवकर या...
आणि पुन्हा अशाच अनेक सुंदर आठवणी घेऊन या! 😊🙏

No comments:
Post a Comment