Thursday, May 14, 2026

My first USA Trip


अमिताभला लंडनच्या Heathrow विमानतळावर जवळून बघायचा योग माझ्या नशिबी आला . तो दिवस २१-जानेवारी-२००१ होता.
 


आयुष्यात काही योगायोग फार चमत्कारिक असतात त्यापैकी  हा एक म्हणता येईल. मी २०-ऑक्टोबर-२००० ला अमेरिकाला निघालो त्या दिवशी अमिताभच्या KBC वर हर्षवर्धन नवाथे हा पहिला करोडपती झाला होता. आम्ही पाच लोक अमेरिकेला बरोबर निघालो होतो. माझी ती पहिलीच अमेरिका वारी होती. BOSTON विमानतळावर immigration officer ने का कुणास ठाऊक पण मला अडविले आणि चार प्रश्न जास्त विचारले शिवाय माझ्या passport वर एक दिवस आधीचा stamp मारला. इतरांपेक्षा आपलाल्या एक दिवस आधी अमेरिका सोडावी लागणार ह्याचे त्यवेळेस फार वाईट वाटले पण त्यामुळेच मी लंडन विमानतळावर अमिताभला भेटू शकलो. मग पटले  जे होते ते चांगल्यासाठीच होते. वाईट घडते त्यावेळेस वाईट वाटते पण नंतर लक्ष्यात येते तसे घडले नसते तर हा योग आलाच नसता...


त्या नंतर २००५ पर्येंत मी दरवर्षी कामानिमित्त USA ला जायचो .
आता २००५ नंतर  २१ वर्षांनी पुन्हा एकदा अमेरिकेला यायचा योग आला आहे.


२१ वर्षांपूर्वी ईस्ट कोस्ट बॉस्टन ला land व्हायचो आता २१ वर्षांनी 
वेस्ट कोस्ट California  San Franscisco la land झालो .













1 comment:

Unknown said...

खरोखरी छान गाण आहे हे,
nice experience..:)