Sunday, July 22, 2012

Something is missing....


मागच्या शनिवारी लिहिलेल्या ब्लॉग ला अपेक्षे पेक्षा जास्त वाचक मिळाले आणि त्या पैकी काही लोकांनी email पाठवून ISKO कल्पना आवडली आणि त्यांच्याही सहभागाची तयारी दाखवली त्याबद्दल धन्यवाद.
तर ISKO - In search of Knowledge and Opportunity" एक वेगळा प्रकल्प स्वतंत्र पद्धतीने राबविला जाईल परंतु ह्या ब्लॉग मध्ये मी फक्त माझे विचार माझे अनुभव लिहिणार आहेत.

विचार लिहायला मी काही खूप मोठी व्यक्ती नाही . एक साधारण मध्यम वर्गीय भारतीय आहे ज्याचे किमान स्वप्न चांगल्या पगाराची नौकरी , एक मनासारखे घर आणि घरी येण्याची ओढ वाटावी असे कुटुंब असते. तर आयुष्यात सगळ्याच मध्यम वर्गीय लोकां प्रमाणे आयुष्याशी झगडत मी साधारण हे स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी झालो.तरीही something is missing ह्या मनुष्य स्वभावाला मीही अपवाद नाहीच.

खर म्हणजे हि रिक्त पणाची भावनाच आपल्या प्रगतीला कारक असते. पण कोठे थांबावे हे कळले नाही तर हीच प्रगती अधोगतीत बदलायला वेळ लागत नाही. थोडक्यात आयुष्यात मोठे ध्येय गाठायचे तुमचे स्वप्न असेल तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शक्तीची कल्पना असणे जेवढे महत्वाचे असते तेवढेच महत्व तुमच्या मर्यादा ओळखण्यालाही असते. आणि त्या साठी ध्यान आणि ज्ञान हाच्या सारखा राजमार्ग नाही. खूप लोक ध्यान आणि आस्तिक ( जे परमेश्वर मानतात ते) ह्यात गल्लत करतात. ध्यान करायला आस्तिक वा नास्तिक असण्याची गरज नसते.

मी आस्तिक आहे पण माझे परमेश्वराशी मैत्रीचे नाते आहे. मी देवळातही जातो पण खूप मोठी रांग असेल तर बाहेरूनच नमस्कार करतो. मला माझेच नियम (ज्या मुळे दुसऱ्या कोणाचेही नुकसान होणार नाही ह्याची खबरदारी घेऊन) करायला आणि ते पाळायला आवडतात.

नियम  ह्यामधील जो "यम" आहे तो कधीच बदलत नसतो "नियम" मात्र कालानुरूप बदलत असतात. खरे बघितले तर नियम हे  समाज सुधारणे साठी  समाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक  नियमात एक पळवाट  लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी  त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते.  

तर आपण ध्यान ह्या विषयावर बोलत होतो. आयुष्यात वेग वेगळ्या प्रकारे ध्यान करण्याचे प्रकार सांगणारे अनेक गुरु तुम्हाला भेटतील. ध्यानाची कोणतीच पद्धत चांगली वा अधिक चांगली नसते. कोणत्याही पद्धतीचे ध्यान नियमित करणे महत्वाचे असते. मी सध्या माझ्या रोजच्या व्यायामात " कपालभाती" ह्या श्वसनावर आधारित योग पद्धतीचा वापर करतो. आणि ह्या साठी रामदेव बाबांचे शतशा आभार. त्यांनी हि योग पद्धती सर्व सामान्यापर्येंत पोहचवली .

रोजच्या व्यायामात वयानुसार Stretching, Strength , Yoga/Dhyan ह्या तीनही प्रकारांचे योग्य मिश्रण असणे चांगले असते. रोज किंवा दिवसांमध्ये विभागून तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात व्यायामाचे योग्य वेळापत्रक बनवून नियमित व्यायाम करायला हवा. तसेच आठवड्यातून एक किंवा दोन दिवस व्यायामाला सुटी हे सुद्धा तेवढेच महत्वाचे असते. ह्या तीनही व्यायाम प्रकाराचे उत्तम मिश्रण म्हणजे "सूर्यनमस्कार". रोज १२ ते xxx तुमच्या वयानुसार आणि मर्यादेनुसार "सूर्यनमस्कार" आणि "कपालभाती" म्हणजे सुवर्णमध्य !.कमीत कमी वेळात जास्तीत जास्त फायदा आणि तुमच्या धावपळीच्या जीवनात व्यायामाला वेळ नाही ह्या समस्सेवर रामबाण उपाय.

आणि जर तुम्हाला नृत्याची (Dance) आवड असेल तर त्याच्या सारखा व्यायाम नाही. आजकाल तरुण वर्गाला ह्याची फार भुरळ आहे. पण एखादी Saturday Dance Night तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत घरातच करून बघा . आठवड्या भराचा कामाचा शीण तुमच्या आयुष्यात आलेली मरगळ एका क्षणात नाहीशी होईल.

असाच एक कुटुंब आणि मित्रांसमवेत केलेला ग्रुप डान्स


Our Group Dance Link



आयुष्यात काहीतरी कमी आहे something is missing ही  पोकळी भरण्या साठी आपल्या कक्षा वाढवाव्या लागतात. Internet आणि त्यावरील Facebook, twitter ,Blogging ही माध्यमे काही प्रमाणात हि पोकळी भरायला मदत करतात. पण ही फक्त संपर्क साधने आहेत. प्रत्यक्षात लोकांमध्ये मिसळून लोकांसाठी काम करून खऱ्या अर्थानं हि पोकळी भरून काढता येते. ही पोकळी भरून काढण्या साठी वेळात वेळ काढून आपल्या छंदाची जोपासना करणे एक मार्ग असू  शकतो. आणि समाजा  साठी काही करावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एखाद्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेशी स्वतःला  जोडून घेऊ शकतात. शहरात राहणारे बहुतेक लोक हौसिंग सोसायटी मधे राहतात. तेव्हा सोसायटीच्या कमिटीवर जाऊन तुम्ही तुमच्या सोसायटीला अधिक सुंदर अधिक राहण्या योग्य बनू शकतात. तुमचे घर , तुमची सोसायटी , तुमचा परिसर अधिक सुंदर बनला तर तुमचा देश सुंदर बनेल. जशी प्रत्येक वस्तू अणू रेणूंनी बनलेली असते तसेच देश देशातील लोकांनी बनलेला असतो आणि लोकांवर त्याच्या घराचा आणि परिसराचा खूप प्रभाव पडत असतो. आज काल आपण भले आणि आपले घर भले असा लोकांचा दृष्टीकोन संकुचित होत चालला आहे  Internet आणि  Facebook मुळे तर घरातील व्यक्ती व्यक्ती  मधील संवाद दुरावला आहे. हे बरोबत नाही. तुम्ही तुमच्या विचारांच्या कक्षेला कर्मयोगाची जोड देऊन तुमची दूरदृष्टी वाढवायला हवी.  मला आयुष्यात दोन सोसायटीच्या कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली. तो अनुभव म्हणजे एक स्वतंत्र ब्लॉग चा विषय होऊ शकतो पण मला खूप शिकायला मिळाले त्या साठी मी एक SRM - Society Relationship Management नावाचे Software विकसित केले आहे. तुमच्या सोसायटी साठी ते हवे असल्यास मला कळवा मी माझ्या परीने योग्य ती मदत नक्की करीन. 





No comments: