Saturday, July 14, 2012

सुरुवात...

बऱ्याच दिवसांपासून स्वतःचा ब्लॉग लिहावयास सुरुवात करावी असे मनात होते पण मुहूर्त लागत नव्हता. पण मागचा महिना मुलाच्या ११ वीच्या प्रवेश्यासाठी करावी लागणारी धडपड आणि त्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया समजून घेतांना मुलांच्या मार्कान व्यतिरिक्त पालकांची जागृतता किती महवाची असते ह्याची प्रचीती आली. Bi-focal चा फॉर्म भरल्या नंतर पुरेशी माहिती नसल्या कारणाने आपण फॉर्म भरतांना चूक केली ह्या विचाराने रात्रीची झोप उडाली . पण नंतर लक्ष्यात आले आपण भरलेला फॉर्म बरोबर होता आणि एकदाचे हुश्य झाले. पण जेव्हाही अश्या घटना आयुष्यात घडतात तेव्हा माझा स्वताहीशीच संवाद सुरु होतो आणि घडलेल्या घटना आणि त्याचा अर्थ शोधत भावी आयुष्याशी त्याची सांगड घालणे हि माझी कळायला लागल्या पासूनची सवय आहे. ती चूक का बरोबर माहित नाही पण माझा तो छंद आहे आणि मला ते मनापासून आवडते. तर ज्या रात्री माझी झोप उडाली होती त्या रात्री झोप येत नव्हती म्हणून मी रात्री पेपर वाचायला घेतला आणि त्यात महाराष्ट्र टाईम्स मधील "ह्यांच्या यशाला हवे दातृत्वाचे कोंदण" ह्या बातमी कडे माझे लक्ष्य गेले आणि आपण  मदतीचा चेक द्यावा हे ठरविले आणि "सुप्रिया मगर" आणि "शैला जाधव" ह्यांच्या नावे मी महाराष्ट्र टाईम्सच्या कार्यालयात जावून चेक दिलेत. कठीण परिस्थिती असूनही ९०% पेक्षा जास्त मार्क्स १० वी च्या परीक्षेत मिळविल्या बद्दल सुप्रिया ,वैशाली आणि इतरही सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. त्यानंतर आपण भरलेला फॉर्म चुकीचा नाही हे पण कळले पण सवयी प्रमाणे माझे विचार चक्र सुरु झाले आणि नवीन पिढीला फक्त फक्त आर्थिकच नाही तर जेवढे शक्य होईल तेवढे योग्य ज्ञान उपलब्ध करून द्यावे व त्या साठी काहीतरी करावे असे विचार चक्र माझ्या मनात सुरु झाले. आणि बऱ्याच आधी मनात आलेला पण लुप्त झालेल्या विचाराला पुन्हा उजाळा मिळाला. "ISKO" म्हणजे "

In Search of Knowledge and Opportunity"

योग्य गुरूंनी आपल्याजवळ असलेले ज्ञान जास्तीत जास्त विद्यार्थ्यान पर्येंत पोहोचवावे आणि योग्य ज्ञान मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी महानुभावांनी रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध करून दाव्यात. आणि ह्या साठी IT चा उपयोग करून एक ISKO नावाचा common platform तयार करावा अशी कल्पना सध्या डोक्यात घोळ घालते आहे. बघू विचाराच्या ह्या इवलाश्या रोपाचा वेलू किती मोठा होतो ते.


"इवलेसे रोप लावियले द्वारी
तयाचा वेलू गेला गगनावरी"
१९९० च्या दशकात मी जळगावला असतांना "In Search of Chyren" नावाने एक Activity सुरु केली होती. तेव्हा मी उन्हाळाच्या आणि दिवाळीच्या सुटी मध्ये मुलामुलींसाठी
एका खास Exercise Activity घ्यायचो.
२० मिनिट एरोबिक्स /डान्स exercise
२० मिनिट शवासन आणि चांगल्या


विचाराची रेकॉर्डेड कॅसेट ऐकणे  असे त्याचे स्वरूप होते.


त्यावेळेस  लिहिलेले काही लेख  तुम्ही खाली दिलेल्या लिंक click करून  वाचू शकतात 

EveryDay Exercise - एक प्रात्यक्षिक सुरुवात
आणि मी तिला सोडले
आत्मपरीक्षण एक चिंतन
शोध

 
Sharing with you the Opportunity that changed my life...

ISKO - Means "In search of Knowledge and Opportunity", is the concept I am promoting now as a part of social responsibility. To achieve our life goals one should always be in search of Knowledge and opportunity. Opportunity is not in our hand but upgrading ourself with knowledge is in our hand.
I can share here my two real life changing experiences.

Knowledge:

I remember the book which I read in the train while travelling from Belgaum to Pune , changed my life. The book was digital computer fundamentals by Thomas c. bartee. If you want to improve your logic and/or Digital electronics, this will always be the book to read. I completed my bachelor degree in Electronics and Communication but developed career in computer programming field. No "Computer" word was available in our entire B.E. syllabus.

Opportunity:

I remember the opportunity moment when Mr. Handa from ICIM ( International computer Indian Manufacturer) asked me
"Will you develop one project in COBOL?"

YES or NO take decision right now!

I said "Yes" and en cashed the opportunity. I was knowing very little about COBOL language but was confident that I will learn it by self study.
That one month COBOL was everywhere, in my mind in my dream and I successfully completed that project. When I showed the result to Mr. Handa his answer was
"मई जनता था तू ये कर सकता हैं!"
"I was confident that you can do this"
I felt like I am a "Vijay" of Deewar and Trishul.
That one opportunity changed my life.
Thanks to Mr. Handa for providing me that opportunity.


5 comments:

Vinay Sathe said...

Sanjeev, One of the blogs I have come across with originality. Also reflects lot of passion you carry for your goals. Keep going Sanjeev!
Vinay

Sanjeev Chaudhary said...

Thanks very much Vinay for your kind appreciation, it works like a fuel for my thought processing system and inspire me to drive more...

Bigbock said...

Nice post 👍

Sanjeev Chaudhary said...

Thank you🙏

Unknown said...

Khup chan lihilay