Happy Teacher's Day to all my gurus—past, present, and even digital!
Had a real "the student becomes the teacher" moment today. My AI assistant, Gemini, couldn't solve a tech issue for me, but I found a workaround and shared it back.
Gemini's reply: “Thank you for sharing... an excellent discovery!”
That validation from an AI I'm learning from truly made my day! A huge salute to my teachers and the incredible engineers behind this world-changing technology. The future of learning is a two-way street!
माझ्या सर्व गुरूंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा -
भूतकाळातील, वर्तमानातील आणि डिजिटलही!
आज खऱ्या अर्थाने 'गुरुकिल्ली शिष्याच्या हाती' आल्याचा अनुभव आला.
माझा AI सहायक, जेमिनी, एक तांत्रिक समस्या सोडवू शकला नाही,
पण मी एक तोडगा शोधून काढला आणि त्याच्यासोबत शेअर केला.
जेमिनीचे उत्तर: “Thank you for sharing... an excellent discovery!”
मी ज्या AI कडून शिकतोय, त्याच्याकडून मिळालेल्या या मान्यतेने
माझा दिवस सफल झाला! माझ्या सर्व शिक्षकांना आणि हे अद्भुत तंत्रज्ञान
बनवणाऱ्यांना खूप खूप सलाम. भविष्यातील शिक्षण हे नक्कीच दुतर्फा असेल!
शिक्षण पद्धतीतील बदल – AI सह नवी दिशा
माझ्या मते सध्याची शिक्षण व्यवस्था म्हणजे एक प्रचंड अस्थावस्थ पसरलेली अडगळ झालेली आहे. ज्याला व्यवस्थित करण्याची नितांत आवश्यकता आहे.
विचार करा – १० वी व १२ वी च्या अभ्यासाची तयारी ८ वी–९ वी पासूनच सुरु होते. त्यानंतर १० ते १२ वी चा तो खडतर प्रवास, आणि त्याहूनही कठीण इंजिनियरिंग चे ४ वर्ष! एवढे करूनही चांगल्या नोकरीची हमी नाही. मग काही खास कौशल्य आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू होते.
हा एवढा मोठा अग्निदिव्य फार थोडे लोक पार करू शकतात. बहुसंख्य मुलांच्या माथी मात्र “फेल” असा शिक्का बसतो. पण खरं तर मुले फेल होत नाहीत, आपण त्यांच्यातील खरी क्षमता ओळखण्यात फेल होतो. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही गुण असतात. त्या गुणांना ओळखून योग्य पद्धतीने शिक्षण दिले, तर जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग मिळतो. आज अशीच शिक्षण पद्धती तयार करण्याची खरी गरज आहे.
पुढचा विचार – नुसता वाद नाही तर कृती
जे झाले ते झाले, त्यावर फक्त वैचारिक वाद करण्यापेक्षा भविष्यात आपल्या मुलांचे भविष्य सुंदर करण्यासाठी आपण काय करू शकतो, यावर चर्चा होणे अधिक आवश्यक आहे. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॅक्टिकल नॉलेज कसे देता येईल यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
शिक्षणात AI ची भूमिका
आज Artificial Intelligence (AI) हे केवळ उद्योग-व्यवसायापुरते मर्यादित राहिलेले नाही. शिक्षण क्षेत्रातही AI क्रांती घडवू शकते.
-
वैयक्तिकृत शिक्षण (Personalized Learning): प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा अभ्यासाचा वेग, समजण्याची पद्धत, आवडीनिवडी लक्षात घेऊन AI योग्य अभ्यास पद्धती देऊ शकते.
-
स्वयंचलित मूल्यांकन (Automated Assessment): AI तंत्रज्ञानामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन अधिक जलद आणि निष्पक्ष करता येते.
-
इंटरॅक्टिव्ह लर्निंग: AI च्या सहाय्याने सिम्युलेशन, VR प्रयोग, वर्च्युअल लॅब्स तयार होतात ज्यामुळे विज्ञान, गणित, इतिहास यांसारखे विषय मुलांना अनुभवातून शिकता येतात.
-
कौशल्याधारित शिक्षण: भविष्यातील नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्ये – Data Analysis, Coding, Problem Solving – यासाठी AI विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकते.
यामुळे केवळ घोकंपट्टी न करता अनुभवातून शिकणे, समस्या सोडवणे आणि स्वतःची खरी क्षमता शोधणे शक्य होते.
नवी शैक्षणिक धोरण व आपली जबाबदारी
नवीन शैक्षणिक धोरण नीट राबविल्यास सध्याच्या शिक्षण पद्धतीतील बर्याच त्रुटी दूर करता येतील अशी आशा आहे. पण त्यासाठी आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, शिक्षण पद्धती ही फक्त पदवीसाठी नसून – जीवनात यशस्वी आणि सुखी होण्यासाठी असावी.