Tuesday, December 19, 2017

गुजराथ निवडणूक - Judgement Dayगुजराथ निवडणुकीचा  निकाल  देश  कोणत्या  दिशेने चालला आहे हे दाखवणारा ठरला.
एका बाजूला स्व कर्तृत्वाने  कर्तृत्व  दाखवून लढणारा लढवय्या तर दुसऱ्या बाजूला कोणतेही कर्तृत्व  नसतांनाही  हि बरोबरची टक्कर देणारा जुना मुखवटा टाकून नवीन मुखवटा धारण केलेला चेहरा.   तरीहि जनतेने दिलेला निर्णय हा देशहिताच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय जनतेकडून काळाने घडवून आणला असे  मला वाटते.  त्यामुळे भाजपाला  यशाची  धुंदी  उतरवून जमिनीवरच राहायला जनतेने निर्देश दिले आहे आणि काँग्रेसलाहि  विरोधी  पक्षाची महत्वाची  भूमिका पार पाडण्यासाठी संजीवनी दिली आहे.  उत्तम लोकशाही साठी सक्षम विरोधी पक्ष असणे आवश्यक असते.  ह्या पुढे १५ वर्षे तरी असाच निकाल देऊन जनतेने भारताच्या  विकासाचा रथ  वेगाने पुढे नेण्यात आपले योग्य योगदान करावे

गुजरात विजयानंतर  मोदी म्हणाले हा "विकासाचा विजय आहे"


आणि मी पण त्याच्याशी सहमत आहे


निवडणूक काळात  टीव्ही  वर आजतक वर दाखविण्यात आलेली एक क्लिप  ज्यात मोदी आणि राहुल दांडिया खेळत आहेत  ते मला खूप आवडले. 
राजकारण  इतक्याच खेळीमेळीने व्हावे  किंबहुना  पडद्या मागे ते तसेच असते.  सामान्य  जनतेला जे दिसते  किंवा  दाखविले जाते ते  असते  सास बहू  मालिके  प्रमाणे अतिरंजित  ज्यात  सामान्य जनता  गुंतत  जाते. 
ह्या निवडणुकीत महाभारतामधील प्रसंगा  प्रमाणे दोन्ही पक्षांकडून  खोटा  प्रचार केला गेला .
अश्वस्थामा मेला अशी बातमी पसरविण्यात आली.

जेव्हा द्रोणाचार्याने  उधिष्टराला विचारले तेव्हा  युधिष्टीर म्हणाला
" अश्वस्थामा मेला  पण नरो वा  कुंजरो वा "
 "अश्वस्थामा  मेला पण तो नर होता का हत्ती  माहित नाही"

ते ऐकून द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले.
मला द्रोणाचार्यांच्या ह्या कृतीचे नेहमी आश्चर्य वाटते.

अश्वस्थामा  चिरंजीव आहे हे त्यांना माहित नव्हते का?
का त्यांना बहाणा हवा होता शास्त्र खाली ठेऊन  सत्याचा विजय करण्यात भागीदार होण्याचा?

आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे  बुद्धी आणि तर्काच्या पलीकडे असतात .
तसाच काहीसा हा निकाल  गुजरातच्या जनतेने दिला आहे.

असो. नुकताच सोशल मीडियावर आलेला लेख विचार करावा असा  वाटला तो शेअर करीत आहे.


Why are liberals, leftists and most mainstream journalists arrayed against progressive Indians? 
Read the link below on the nexus:
http://indiafacts.org/nexus-lutyens-meet-forces-conspire-india/
No comments: