Saturday, May 11, 2013

Your Health is your True Power

तुमचे स्वस्थ आणि निरोगी शरीर हीच तुमची खरी शक्ती असते . तुमचे शरीर स्वस्थ आणि निरोगी नसेल तर प्रेम आणि ज्ञान मनातल्या मनात मरून जातील. मग तुम्ही कितीही कमावलेली पैश्याची शक्ती तुमच्या काही उपयोगी येणार नाही . पैसा आयुष्यात महत्वाचा आहेच पण प्रेम आणि ज्ञान ह्याशिवाय सुखाचा शोध पूर्ण होऊ शकत नाही . प्रेम आणि ज्ञान ह्यांना तुमच्या जीवनात आणायचे असेल तर बळाची (पैसा आणि निरोगी शरीर) ह्याची नितांत आवश्यकता असते. बलवान निरोगी शरीर , निर्मळ आणि सतेज बुद्धी आणि प्रेमळ परंतु प्रसंगी वज्राप्रमाणे कठोर होणारे ह्रुदय ह्या सर्वांची जीवनातील खर्या सुखाचा शोध घेण्यासाठी नितांत आवश्यकता असते. ह्या निरोगी ,स्वच्छ ,स्वस्थ शरीराच्या द्वारात सर्व पुरुषार्थ प्राप्त करून घ्यायचा असतो.

म्हणून नियमित व्यायामाची सवय असणे खूप गरजेचे असते. तुमच्या व्यायामात खालील तिन्ही प्रकाराचा समावेश असणे आवश्यक आहे.

1)Stamina & Power-  Aerobics, Running, Walking, Weight lifting,Pushups
१)शक्ती आणि क्षमता ( धावणे आणि वजन उचलणे,पुशप  , सूर्यनमस्कार )

2)Stretching - ( Yoga - stretching exercise)
२) ताणाचे व्यायाम ( योगासन ,
सूर्यनमस्कार)

3)Yoga - (Breathing exercise & Meditation)
३)योग - कपालभाती , प्राणायाम आणि ध्यान

व्यायामा सोबत योग्य आहाराची सुद्धा तेवढीच आवश्यकता असते. तुमच्या शरीराला सर्व जीवनसत्वे ( Vitamins) योग्य प्रमाणात आवश्यक असतात . ड जीवनसत्व ( D - Vitamin) तर फक्त सकाळचे कोवळे उन अंगावर घेऊन फुकटात मिळवता येते. अशी सोय निसर्गाने करून ठेवली आहे पण 
 तिचा उपयोग करायला  आपण विसरतो किंवा आपल्या जवळ वेळ नसतो. ज्यांना वेळेची कमी आहे त्यांनी सकाळच्या कोवळ्या उन्हात वरील व्यायामाचा एखादा प्रकार करून दुहेरी  फायदा करून घ्यावा .

A Happy Day of Lifeव्यायाम -> ध्यान ->ज्ञान - >प्रेम->कर्म ->नृत्य 
-Exercise -> Meditation/Yoga - > Knowledge - > Love - > Karmayog (Actually Doing some work instead of just thinking/Planning ) - > Dance

  • दिवसाची सुरुवात व्यायाम करून झाली 
  •     ध्यानामुळे ज्ञानाला अर्थ प्राप्त झाला    
  •          प्रेमामुळे कर्माचा आनंद मिळाला 
  •             दिवस जगलो या आनंदाने मी नाचलो दमलो आणि            शांत झोपलो


1 comment:

दिलीप भदाणे said...

खुपच सुंदर.