Sunday, September 30, 2012

PSR - झाडे आणि मुले वाढ्वितांना...

झाडे लावा झाडे लावा असे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत पण फक्त झाडे लावल्यामुळे आपले कर्तव्य संपते असे नाही. झाडे लावल्यानंतर ती जगवणे जास्त महत्वाचे असते . त्या साठी काही महिने काही वर्ष ती झाडे स्वावलंबी होई पर्येंत त्यांची काळजी घेणे गरजेचे असते. जी गोष्ट आपल्या मुलांसाठी लागू होते आणि आपण आपले कर्तव्य म्हणून पार पडतो तशीच काळजी आपण झाडांची घ्यावयाची असते.

आमच्या सोसायटीच्या मागे टेकडी आहे त्या टेकडीवर एक हनुमान मंदिर आहे आणि बरीच मंडळी सकाळ संध्याकाळ ह्या टेकडीवर झाडे लावून त्यांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करीत असतात. ह्या पावसाळ्यात

मी पण त्या टेकडीवर १५ झाडे लावली आहेत. आणि झाडे लावण्याचे एक तंत्र मी ह्या मंडळीन कडून शिकलो आहे. झाड लावताना खोल खड्डा खणल्या नंतर त्या झाडा शेजारीच ते एक बुड कापलेली बाटली

लावावी. मग रोज टेकडीवर फिरायला येतांना पाण्याच्या बाटल्या घेवून याव्यात आणि ह्या बाटलीत ते पाणी घालावे म्हणजे कमी पाणी झाडाच्या मुळा पर्येंत पोहचण्याची सोय होते आणि कमी पाण्यात झाडे जागविता येतात.

तर तुम्हीपण फिरायला जातांना पाण्याची बाटली बरोबर घेऊन जात जा आणि काही झाडे दत्तक घेउन त्यांना
स्वावलंबी होई पर्येंत वाढवण्याची जबाबदारी स्वीकारा. मी ह्याला PSR - Personal Social Responsibility असे म्हणतो.

हाच नियम मूला - मुलींसाठी सुद्धा लागू पडतो . तुमची मुले स्वावलंबी होई पर्येंत त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आपले कर्तव्य असते. आणि आता तर फक्त चांगल्या विद्यालयातून चांगली डिग्री मिळवली म्हणजे नौकरी मिळेल असे चित्र आता राहिले नाही. चांगल्या डिग्री सोबत नवीन अद्यावत कौशल्ये शिकणे (Adding additional current new skill sets to our resume) हि काळाची गरज झालेली आहे. ईश्वर कृपेने माझा IT - Information technology क्षेत्रात चांगला अनुभव झाला आहे. तोच अनुभव आणि ज्ञान नवीन तरुण पिढीशी Share करावे हे माझ्या PSR (Personal Social responsibility) मधील एक Target असेल.

तर तुम्ही पण तुमचे PSR Target ठरवा आणि पूर्ण करा.






दिनांक :५-ऑक्टोबर-२०१२
जनहित याचिका

काल टेकडीवर गेलो असतांना एका विचित्र घटनेने मन विचलित झाले.
आमच्या मागील हनुमान टेकडीवर सेवाभावी मंडळींनी झाडांच्या शेजारी मुळा पर्येंत पाणी झीरपण्यासाठी बुड कापून लावलेल्या ३0-३५ बाटल्या कुणी तरी काढून टाकल्या होत्या.
प्रथम मला वाटले हे भंगारवाल्यांचे काम असावे. पण नंतर असेही कळले कि हे टेकडी स्वच्छ करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे पण काम असू शकते. आणि तसे असेल तर त्या सेवाभावी संस्थेचे जाहीर कौतुकच करावयास हवे. टेकडी प्लास्टिक मुक्त आणि स्वच्छ करण्यासाठी त्यांना फक्त नेमक्या त्याच
३०-३५ बाटल्या दिसल्या ह्या बद्दल ते जाहीर सन्माना साठी नक्कीच लायक आहेत. त्या व्यतिरिक्त तेथे पडलेला दुसरा कचरा त्यांना दिसला नाही. तर तुम्हाला ह्या सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यान बद्दल काही माहिती असेल किंवा त्यांना माहिती देणार्यान बद्दल काही माहिती असल्यास त्वरित कळवावे

त्या सेवाभावी माणसाला मला एक सुचवावेसे वाटते कि बाटल्या काढून टाकण्या ऐवजी बाटल्या लावणाऱ्या सेवाभावी लोकांना झाडे जगल्यानंतर काही महिन्यांनी बाटल्या काढून टाकाव्यात अशी सूचना केली असती तरी समजण्या सारखे होते.
पण....असो.


देव तारी त्याला कोण मारी.

सकाळ पासून पडणारा उत्तम पाउस झाडांना जागविण्या साठी पुरेसा आहे.काही लोक नियमांचा उपयोग फक्त लोकांना त्रास देण्यासाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठीच करतात
तर काही लोक नियम धाब्यावर बसवून लोकांच्या भल्यासाठी काम करतात. ह्या पैकी योग्य अयोग्य हे ठरविणारी रेषा खूप सूक्ष्म असते.

नियम ह्यामधील जो "यम" आहे तो कधीच बदलत नसतो "नियम" मात्र कालानुरूप बदलत असतात. खरे बघितले तर नियम हे समाज सुधारणे साठीसमाजातील लोकांच्या भल्या साठी असतात पण प्रत्येक नियमात एक पळवाट लपलेली असते किंवा त्याच नियमाचा उपयोग त्रास देण्यासाठी सुद्धा करता येतो.ते शोधून त्याचा दुरुपयोग करणे आणि नियम करणार्यांनी त्याच्याकडे काना डोळा करून समर्थन करणे हे प्रकार जेव्हा समाजात वाढत जातात तेव्हा समाज व्यवस्था रसातळाला जाण्यास सुरुवात होते. तेव्हा समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने नियमातील यमाचा विचार करूनच नियम पाळावयास हवेत.नियम म्हणजे जे काळनुरूप बदलत जातात. नियमातील यम हा भाग त्रिकालाबाधित सत्य असतो आणि तसाच राहतो. ह्याचे भान समाजातील सर्व लोकांनी ठेवणे आवश्यक असते.


No comments: