Monday, August 18, 2025

ITSOLMUKTAI


Simplify life, amplify success

Learn AI, the power tool of this era.














✅ Live Training

✅ Project-Based

✅ Self Learning

Our mission is to bridge the digital
divide by bringing the latest world-class
IT knowledge—typically accessible
in urban cities—directly to every
student and small entrepreneur
in the villages across India. 

आमचा उद्देश म्हणजे डिजिटल तफावत कमी करणे, म्हणजे
शहरांमध्ये सहज उपलब्ध असलेले आधुनिक व जागतिक
दर्जाचे IT ज्ञान प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना आणि
लहान उद्योजकांना थेट पोहोचवणे.
खूप जणांना भीती वाटते की AI मुळे नोकऱ्या कमी होतील,
पण खरं म्हणजे धोका AI मध्ये नाही तर त्याचे 
कौशल्य शिकण्याच्या संधीच्या कमतरतेत आहे. 
भविष्यात नोकऱ्या संपणार नाहीत,
तर त्या मिळतील त्या लोकांना जे नवीनतम 
AI ज्ञान आत्मसात करतील.


म्हणूनच, आम्ही ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना
आणि लहान उद्योजकांना जागतिक दर्जाच्या AI
शिक्षणाशी जोडण्याचा निर्धार केला आहे —
त्यांना नवी डिजिटल युगात स्पर्धा करण्यासाठी,
यशस्वी होण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी 
सज्ज बनवण्यासाठी.


Click to View the Course brochure


Please fill out this Google form to connect

with us and express your interest.


Click this link to contact us


                                  
                       My Profile


Saturday, August 16, 2025

J.E.School- सुंदर शालेय दिवसांची आठवण

 सुंदर शालेय दिवसांची आठवण



मागच्या आठवड्यात मला माझ्या शालेय मित्र विनोद बोथरा 
यांच्या वाढदिवसाला जाण्याची सुंदर संधी मिळाली. अजून खास म्हणजे
तिथे आमचे बरेच जुने शालेय मित्र भेटले. विनोदच्या मुलांनी खूप छान
त्याला सुद्धा surprise असा हा कार्यक्रम आयोजित केला होता.
विनोद यांच्या जीवनप्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचे सुंदर दर्शन घडवणारा
हा सोहळा खूप भावपूर्ण आणि आठवणींनी भरलेला होता.
त्यातील सर्वात सुंदर क्षण म्हणजे आम्ही सगळे जुने शालेय मित्र एकत्र
जमून घेतलेला तो फोटो, हातात “स्कूल चले” लिहिलेली पाटी धरलेली. 
त्या एका क्षणाने आम्हाला थेट बालपणात नेऊन सोडले.



त्या संध्याकाळी माझ्यासाठी अजून एक खास अनुभव मिळाला.
कुणीतरी मला शीर्षासन योगासन करण्याचे आव्हान दिले.
खूप वर्षांपासून केलेले नव्हते, पण मी प्रयत्न करायचे ठरवले.
आणि आश्चर्य म्हणजे मी यशस्वी झालो! जरी मी नियमित व्यायाम करत असलो
तरी शीर्षासन माझ्या सरावाचा भाग नव्हता. पण त्या क्षणी असे वाटले की
शाळेत शिकलेले धडे अजूनही माझ्या अंगी आहेत.




हे करताना मला आठवले ते आमचे ८ वीचे दिवस. 
आमचे पी.टी. शिक्षक भांगळे सर यांनी आमच्यासाठी योगाभ्यासाचे वर्ग घेतले होते.
त्याच वेळी माझ्या आयुष्यात योग आणि व्यायामाची आवड निर्माण झाली.
त्या काळी लागलेली सवय आजही माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे.
आणि त्याच सवयीमुळे मी शीर्षासनाचे आव्हान इतक्या सहजतेने पूर्ण करू शकलो.
याच आठवणींत भर टाकणारा अजून एक क्षण होता
१५ ऑगस्टचा. शाळकरी मुलांची प्रभात फेरी पाहण्याची संधी मिळाली.
शालेय काळात आपणही अशा फेरीत भाग घेत असू.
मुलांना तितक्याच उत्साहाने चालताना पाहून स्वातंत्र्यदिनाच्या शालेय जीवनच्या
त्या आठवाणी आठवणि पुन्हा डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या.



या सगळ्या अनुभवांकडे पाहताना जाणवते की
शालेय दिवस आपल्याला आयुष्यभर आकार देत राहतात
—मित्रांच्या सहवासातून, परंपरांमधून आणि शिक्षकांनी दिलेल्या धड्यांमधून.
काळ पुढे सरकत असतो, पण त्या सुंदर आठवणी कायम हृदयात कोरलेल्या राहतात.