Sunday, February 4, 2018

पत्रास कारण की



पत्रास कारण की.. 

ती. रु. आजोबा ,

त्रास कारण कि आज  आयुष्यातील रिटायरमेंट च्या दशकात येऊन पोहोचलो आहे . तेव्हा ह्या पत्रा  द्वारे तुमच्याशी थोडे बोलावे असा विचार केला. खर म्हणजे तुमच्याशी बोलणे हा बहाणा आहे त्या निमीत्ताने   स्वतःशीच  बोलावे हा इरादा आहे. आजोबा  लहानपण  कोणतेच डिजिटल गॅझेट नसल्यामुळे डब्बा गोल,विटी दांडू सूरपारंब्या  असले खेळ खेळण्यात मजेत गेले तसेच तुमच्या सोबत महाभारतातील गोष्टी ऐकत माझे बालपण घडत गेले. आता डिजिटल गॅझेट च्या दुनियेत मुले हरवली आहेत आणि मैदानी खेळ खेळायला विसरली आहेत त्या  दोघांचा सुवर्ण मध्य समजावून सांगणाऱ्या तुमच्या सारख्या आजोबांची सध्या खूप गरज आहे. 

थोडा मोठा  झालो तेव्हा  क्रिकेट  कळायला लागले आणि रेडिओवर  फक्त  कोमेंट्री  ऐकून  एवढ्या    Excitement चा अनुभव मिळू शकतो ते  अनुभवास मिळाले . त्यानंतर  टीव्ही आणि अमिताभ ने वेड लावले. अगदी लहानपणी १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला देश भक्तीची गाणी  आणि स्वतंत्र लढ्याच्या कथा ऐकून भारावून जात होतो . पण अमिताभ च्या ज्वलंत अभिनयामुळे मुळे  म्हणा किंवा  आयुष्यात आलेल्या काही कटू अनुभवांमुळे म्हणा आयुष्यातील ग्रे शेड जाणवायला लागली कधी आणि आवडायला लागली कशी हे कळलेही नाही. लहान पणा  पासून  कृष्ण हा माझा आवडता पण कृष्णकृत्य हे चांगल्या अर्थी का वाईट हा संभ्रम माझा अजूनही आहे. तसेच गांधी चांगले होते का वाईट हा प्रश्न मला लहानपणीच  पडला होता. पण तुम्ही  योग्य वेळी मला योग्य मार्गदर्शन करून नीट समजावले . मी एकदा तुमच्या  समोर गांधी विरोधी मत प्रदर्शित केले तेव्हा तुम्ही  म्हणाले. "गांधी वर मत द्यावे एवढे तुझे वयही नाही आणि अभ्यासही नाही. त्यांनी देशासाठी जे केले त्यात काही चुका झाल्या असतीलहि पण देशाला बरेच काही दिले हे सुद्धा एक सत्य आहे.तर त्याचा आदर करायला शिक. चुका तर मानव जन्म घेतल्या नंतर देव चुकवू शकले नाहीत; आपण तर सर्व सामान्य माणसे आहोत. "


आजोबा तुम्ही  महाभारतातील गोष्टी सांगून आणि त्याचा खऱ्या जीवनाशी असलेला संबंध समजावून   माझे बालपण घडवले त्या बद्दल तुमचे खूप खूप  आभार . तुम्ही  मला  नेहमी कर्मयोगाचे महत्व शिकवले.  तुम्ही म्हणायचे

" तुमच्या वाट्याला जे आले आहे किवा तुम्ही जो व्यवसाय स्वीकारला आहे तो खऱ्या अर्थाने एक कर्मयोगी बनून तुम्ही पूर्ण केला पाहिजे. तुम्ही सैनिक असाल तर  शत्रूला मारणे हेच तुमचे कर्तव्य आहे तेथे अहिंसे बद्दल विचार करून चालणार नाही. तुम्ही डॉक्टर असाल तर रोग्याला बरे करणे हे तुमचे कर्तव्य आहे. त्याच्यामुळे मला रोग झाला तर असा विचार करून  तुम्हाला चालणार नाही. शिक्षक असाल तर खरे विद्यादान करणे तुमचे कर्तव्य आहे आणि राजकारणी असाल तर  खऱ्या अर्थाने जनतेच्या भल्यासाठी तुम्ही राजकारण करणे हेच तुमचे कर्तव्य आहे."


आजोबा महाभारत युद्धामध्ये कौरव बरोबर होते का पांडव ? हा प्रश्न तुम्हाला विचारायचा राहुल गेला कारण कृष्ण ज्या बाजूने तेच योग्य आणि तेच जिंकणार हीच त्या वेळेची समज आणि भावना होती.  आजच्या भारतातील राजकीय महाभारत युद्धामध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.  २०१९ च्या निकालानंतर कळेल कृष्ण कोण आणि कोणत्या बाजूने होता. 😊

तुम्हाला माहित आहे का? असल्यास कळवावे . लोभ असावा. 

आपला ,

रो. संजीव चौधरी  














No comments: