Thursday, August 27, 2026

My Favourite Corner — माझा निवांत कोपरा

 

घरातला एक कोपरा… जिथे मी स्वतःला भेटतो


कोमट लिंबूपाणी, पुण्याची थंडगार धुक्याची सकाळ आणि मनात आलेला एक साधा विचार…

तुमच्याही घरात असा एखादा खास कोपरा आहे का, जिथे बसल्यावर संपूर्ण जगापेक्षा 
जास्त निवांत, शांत आणि आपलंसं वाटतं? 😊



माझा निवांत कोपरा

तुमच्याही घरात आहे का 


असा एखादा कोपरा,
जिथे बसल्यावर 
विसर पडतो जगाचा सारा?

सगळेच इतके नशीबवान नसतात,
आयुष्य निघून जाते 
एक घर बनवण्यात…


घर तर बनतं,
पण मनासारखा 
कोपरा मिळत नाही.

कोपरा मिळाला,
तर निवांत बसायला 
वेळ मिळत नाही.


वेळ मिळाला,
तर मनाला 
शांतता मिळत नाही…

आणि म्हणूनच—

घर असणं हे भाग्य,
घरात आपला कोपरा असणं हे सौख्य,
आणि त्या कोपऱ्यात निवांत बसून
स्वतःशीच दोन शब्द बोलायला वेळ मिळणं…
हेच कदाचित खरं आयुष्य! 😊


— संजीव 

🪔📖 दिवाळीचा आनंद… आणि आपल्या हक्काचा ‘PUSH’ दिवाळी अंक! 🌸
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या रोटरी क्लब ऑफ पुणे शिवाजीनगरच्या PUSH टीमने अतिशय सुंदर दिवाळी विशेषांक प्रकाशित केला आहे. या अंकामागे असलेली टीमची मेहनत, कल्पकता आणि उत्साह खरोखरच कौतुकास्पद आहे! 👏💐
या अंकात माझाही ‘घरातला एक कोपरा… जिथे मी स्वतःला भेटतो!’ हा मनाच्या अगदी जवळचा विषय मांडणारा लेख आहे. तो तुमच्यासोबत शेअर करताना विशेष आनंद होत आहे. 😊❤️






वेळ काढून हा सुंदर दिवाळी अंक जरूर वाचा. विशेषतः माझा लेख वाचून तुम्हाला काय वाटलं, हे नक्की सांगा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी नेहमीच मोलाच्या असतात! 🙏
संपूर्ण PUSH टीमचे मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा! 🌷✨


No comments: