Thursday, March 26, 2020

चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस



नवा आरंभ नवा विश्वास 
नव्या वर्षाची हीच खरी सुरुवात 
गुढी पाडव्याच्या तुम्हा सर्वांना  हार्दिक शुभेच्छा!!
 हे नवीन  वर्ष आणि 
कोरोनाचा नायनाट  करणारे 
घरातील कौटुंम्बिक बंदिवासचे दिवस  
तुम्हा सर्वांना  सुखाचे, समाधानाचे,ऐश्वर्याचे , आनंदाचे  आणि आरोग्याने समृद्ध असे जावो

चैत्र गुढी पाडवा सृष्टी निर्मितीचा दिवस. सृष्टी निर्मिती हा विचारच मनात अनेक प्रश्नं आणि कुतुहुल निर्माण करून जातो. हि सृष्टी कशी निर्माण झाली असेल , फक्त मानवच ह्या पृथ्वीवर येवढा प्रगत कसा झाला . मानव विचार केव्हा करायला लागला . हजोरो वर्षापूर्वी मानवाच्या मनात आलेला विचार मला आजही अंतर्मुख करतो
सृष्टि निर्माण होण्या पूर्वी सत असत नव्हते 
अन्तरिक्ष पण नव्हते अणि आकाशही नव्हते
पण असे काय लपले होते कोणी कोणाला झाकले होते.
त्यावेळेस अगम असे पाणीही नव्हते. 




गणितातली अत्यंत कठीण गणिते आपण 'क्ष' मानून सोडवतो. 'क्ष'ला तशी किंमत नसते. पण त्याच्या मदतीशिवाय गणित सुटत नाही.
शेवटी आपल्याला उत्तर सापडल्यावर मानलेला 'क्ष' नामानिराळा होतो. मग जीवनातल्या अवघड समस्या व न सुटणारी कोडी सोडवण्यासाठी लोकांनी हा हातचा 'क्ष' म्हणजे देव मानायला सुरुवात केली असावि. मग कोणी X , कोणी Y तर कोणी Z अशी वेगवेगळी नावे देऊन आपापली उत्तरे शोधू लागलेत.

परमेश्वर आहे का ?श्रद्धा असावी का ?

श्रद्धा आणि अंधविश्वास ह्याला विभागणारी सूक्ष्म रेषा म्हणजे काय
ह्याचे खरे उत्तर कुणाकडेही नाही पण मला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून एवढेच सांगावेसे वाटते



"श्रद्धा हि असावीच लागते मग ती दगडाच्या ठिकाणी का असेना"
"शून्याची किंमत मानावीच लागते जरी ते शुन्य का असेना "


2 comments: