Tuesday, December 19, 2017

गुजराथ निवडणूक - Judgement Day



गुजराथ निवडणुकीचा  निकाल  देश  कोणत्या  दिशेने चालला आहे हे दाखवणारा ठरला.
एका बाजूला स्व कर्तृत्वाने  कर्तृत्व  दाखवून लढणारा लढवय्या तर दुसऱ्या बाजूला कोणतेही कर्तृत्व  नसतांनाही  हि बरोबरची टक्कर देणारा जुना मुखवटा टाकून नवीन मुखवटा धारण केलेला चेहरा.   तरीहि जनतेने दिलेला निर्णय हा देशहिताच्या दृष्टीने अतिशय योग्य निर्णय जनतेकडून काळाने घडवून आणला असे  मला वाटते.  त्यामुळे भाजपाला  यशाची  धुंदी  उतरवून जमिनीवरच राहायला जनतेने निर्देश दिले आहे आणि काँग्रेसलाहि  विरोधी  पक्षाची महत्वाची  भूमिका पार पाडण्यासाठी संजीवनी दिली आहे.  उत्तम लोकशाही साठी सक्षम विरोधी पक्ष असणे आवश्यक असते.  ह्या पुढे १५ वर्षे तरी असाच निकाल देऊन जनतेने भारताच्या  विकासाचा रथ  वेगाने पुढे नेण्यात आपले योग्य योगदान करावे

गुजरात विजयानंतर  मोदी म्हणाले हा "विकासाचा विजय आहे"


आणि मी पण त्याच्याशी सहमत आहे


निवडणूक काळात  टीव्ही  वर आजतक वर दाखविण्यात आलेली एक क्लिप  ज्यात मोदी आणि राहुल दांडिया खेळत आहेत  ते मला खूप आवडले. 
राजकारण  इतक्याच खेळीमेळीने व्हावे  किंबहुना  पडद्या मागे ते तसेच असते.  सामान्य  जनतेला जे दिसते  किंवा  दाखविले जाते ते  असते  सास बहू  मालिके  प्रमाणे अतिरंजित  ज्यात  सामान्य जनता  गुंतत  जाते. 




ह्या निवडणुकीत महाभारतामधील प्रसंगा  प्रमाणे दोन्ही पक्षांकडून  खोटा  प्रचार केला गेला .
अश्वस्थामा मेला अशी बातमी पसरविण्यात आली.

जेव्हा द्रोणाचार्याने  उधिष्टराला विचारले तेव्हा  युधिष्टीर म्हणाला
" अश्वस्थामा मेला  पण नरो वा  कुंजरो वा "
 "अश्वस्थामा  मेला पण तो नर होता का हत्ती  माहित नाही"

ते ऐकून द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले.
मला द्रोणाचार्यांच्या ह्या कृतीचे नेहमी आश्चर्य वाटते.

अश्वस्थामा  चिरंजीव आहे हे त्यांना माहित नव्हते का?
का त्यांना बहाणा हवा होता शास्त्र खाली ठेऊन  सत्याचा विजय करण्यात भागीदार होण्याचा?

आयुष्यात काही प्रश्नांची उत्तरे  बुद्धी आणि तर्काच्या पलीकडे असतात .
तसाच काहीसा हा निकाल  गुजरातच्या जनतेने दिला आहे.

असो. नुकताच सोशल मीडियावर आलेला लेख विचार करावा असा  वाटला तो शेअर करीत आहे.


Why are liberals, leftists and most mainstream journalists arrayed against progressive Indians? 
Read the link below on the nexus:
http://indiafacts.org/nexus-lutyens-meet-forces-conspire-india/




Tuesday, November 14, 2017

Happy Childrens Day



Happy Childrens Day


On Children
 Kahlil Gibran

Your children are not your children.
They are the sons and daughters of Life's longing for itself.
They come through you but not from you,
And though they are with you yet they belong not to you.

You may give them your love but not your thoughts, 

For they have their own thoughts.
You may house their bodies but not their souls,
For their souls dwell in the house of tomorrow, 
which you cannot visit, not even in your dreams.
You may strive to be like them, 
but seek not to make them like you.
For life goes not backward nor tarries with yesterday.

You are the bows from which your children

as living arrows are sent forth.
The archer sees the mark upon the path of the infinite, 
and He bends you with His might 
that His arrows may go swift and far.
Let your bending in the archer's hand be for gladness;
For even as He loves the arrow that flies, 
so He loves also the bow that is stable.
- Kahlil Gibran


Friday, October 20, 2017

जिंदगी इत्तेफाक है



जिंदगी इत्तेफाक है !


फेब्रुवारी २००१  ची हि खरी  घटना  आहे, आम्ही  माझ्या भाचीच्या लग्नासाठी  संपूर्ण कुटुंब नवीनच घेतलेल्या एसटीम कार ने  पुण्याहून नागपूरला  गेलो  होतो.   तेव्हा परतीच्या  प्रवासात घडलेली हि घटना आहे.
दुपारची वेळ होती.  वाहनांची गर्दीपण नव्हती त्यामुळे मी थोडा वेगानेच गाडी चालवीत होतो.  मी वेगाने एका  ट्रक  ला  oevertake  करीत होतो तेव्हड्यात समोरून  एक   टेंम्पो ट्रॅक्स येतांना दिसली  आणि  मी  सिग्नल दिला  मला वाटले तो त्याचा वेग कमी करून मला oevertake  करू देईल  पण त्याने उलट सिग्नल देऊन त्याचा वेग वाढविला . आणि तो एक क्षण आम्ही सर्वांनी साक्षात समोरून मृत्यूचा अनुभव घेतला . शेजारी ट्रक  समोर टेम्पो ट्रॅक्स .  तो एक क्षण head on collision च्या रूपात मृत्यूचे साक्षात दर्शन करून गेला , काय करावे ... मी झुपकन उजवीकडून  गाडी रोडच्या खाली उतरवून  रोड  भाषेत ज्याला wrong cut मारून झुपकन गाडी काढली.
तो त्याच वेगाने सरळ गेला , आणि अपघात टळला .
पण त्याने पण माझ्या सारखाच त्याच क्षणी wrong cut मारला  असता  तर ?
गाडीतील सगळे स्तब्ध झाले होते. मीना म्हणाली तिच्या  तर  पायातले  त्राणच  गेले होते. कारण रस्त्याच्या कडेवर  एक माणूस पण उभा होता त्याच्या अगदी जवळून गाडी गेली. पण मला मात्र तो माणूस खरंच दिसला नव्हता .
दिसला असता तर कदाचित इतका fine wrong cut मला जमलाही नसता.  एकंदरीत काय एका बेसावध क्षणी मृत्यूचे साक्षात दर्शन घेऊन आम्ही सुखरूप बचावलो.   ह्यात माझे  स्वतःचे क्रेडिट घेण्यासारखे कर्तृत्व  कोणतेच नव्हते . खरे बघितले तर wrong oevertake   करणे आणि wrong cut  घेणे दोन्ही माझ्याच चुका होत्या. पण मनुष्य म्हटंले म्हणजे चुका होऊ  शकतात  . आपण काही पुरुषोत्तम असू शकत नाही सदा सर्वदा परिपूर्ण आदर्श आयुष्य जगायला. पण  असे अनुभव एक अनुभव देऊन जातात  एका अज्ञात शक्तीच्या असण्यावर

ह्या अनुभवावर मी मीनाला गमतीने म्हणतो आपल्या कुंडलीतील मंगळाचे (आम्ही  दोघे मांगलिक आहोत ) युद्ध होते हे.  पण माझ्या धनु लग्नातील  गुरु ने वाचविले.


अर्थात आमचे लग्न कुंडली बघून मुळीच झाले नाही. लग्ना नंतर दोघांना  मंगळ आहे  हा  निव्वळ  योगा  योग  आहे हे कळले.


आणि म्हणूनच गाण्याचे बोल आठवतात


जिंदगी  इत्तेफाक है !

  कल  भी इत्तेफाक थी
    आज भी इत्तेफाक हैं !!

- संजीव चौधरी






You can read this article and many in below Rotary club of pune shivajainagar Diwali Issue.

Rotary Club of Pune Shivajainagar - PUSH Diwali Issue

Click this to download pdf RCPS PUSH DIWALI ISSUE 2017

Click this to view all pages




Tuesday, October 10, 2017

सहस्रचंद्रदर्शन सोहळा

डॉ . सी . एस चौधरी

सहस्रचंद्रदर्शन सोहळा
७ ऑक्टोबर २०१७
मुक्ताईनगर 



धन्यवाद आजच्या डिजिटल युगात वेळात  वेळ  काढून आमच्या कौटुंबिक  सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यासाठी   उपस्थित   राहिलेल्या  (किन्ही- भुसावळ  खान्देश ) येथून आलेल्या आणि विदर्भातून आणि थेट नागपूर येथून आलेल्या आमच्या सर्व  नातेवाईकांना  मनापासून धन्यवाद.   ५६ वर्षे मुक्ताईनगर  येथे वैद्यकीय व्यावसाय आणि शैक्षणिक  संस्थेशी संलग्न सामाजिक कार्य करून दादांनी जोडलेली माणसे त्यांची  उपस्थिती  आणि कार्यक्रमाचे  आयोजन  करण्यासाठी क्षणोक्षणी  केलेली निःस्वार्थ मदत  आणि दादांवरील प्रेम मनाला स्पर्श करून गेले.त्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद


खास  करून  आशाताईने नागपूर येथून करून आणलेल्या १०८ पणत्या आणि व्यक्त केलेले मनोगत अप्रतिम होते. ५६ वर्षे मुक्ताईनगर  येथे वैद्यकीय व्यावसाय आणि सामाजिक कार्य करून दादांनी जोडलेली माणसे आणि त्यांची  उपस्थिती  आणि दादांवरील प्रेम मनाला स्पर्श करून गेले.

खास आठवण ठेऊन सौ. मंदाकाकू खडसे आणि सौ.रोहिणी खडसे खेवलकर (अध्यक्ष जे  डी  सी सी बँक जळगाव ) हे कार्यक्रमाला उपस्थित होते. 

 सौ. रोहिणी ह्यांनी उत्तम मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल धन्यवाद.  

आमदार खडसे काका  बाहेर गावी  गेल्या कारणाने उपस्थित  राहू शकले नाहीत पण त्यांनी आवर्जून फोन केला त्याबद्दल धन्यवाद.  

खासदार रक्षा खडसे  ह्यांना  बाहेरगावी जायचे होते त्यामुळे त्या आठवण ठेऊन सकाळीच  घरी येऊन  दादांना शुभेच्छा देऊन  गेल्यात  त्या बद्दल त्यांचे धन्यवाद.



 प्रि . व्ही आर पाटील  सर ह्यांनी मनोगत  व्यक्त केले त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.प्रा  साळवीं सर ह्यांनी  उत्तम निवेदन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद .  प्री  सुजित पाटील सर , उ.प्रा एस एन पाटील  सर , राजू पाटील आणि  मुक्ताईनगर मधील दादांचे अनेक सहकारी  सर्वांची नावे  घेऊ शकलो नाही त्या साठी क्षमस्व  आणि सर्वांचे मनापासून आभार 











Friday, September 29, 2017

विकास खरंच वेडा झालाय?

विकास खरंच वेडा  झालाय?  पण हा विकास कोण ? ह्याचा मी जेव्हा शोध घेण्याचा   प्रयत्न केला तेव्हा जाणवले  हा विकास म्हणजे नक्की तो असावा ज्याने  काळ्या पैश्याची प्रचंड माया जमविली असावी आणि  अचानक झालेल्या नोट बंदी मुळे  त्याला मोठा फटका बसला असावा . तर असा हा विकास  वेडा  होणे  स्वाभाविक आहे.  तर हे  विकास  आमच्या सारख्या सर्व सामान्य जनते  (१२५ करोड) समोर  किती असतील ?  मला वाटते अगदीच नगण्य  असो . पण  त्यांच्या बरोबर जे झाले ते खरंच वाईट झाले आणि  ते  वेडे होणे स्वाभाविक  आहे. असो  पण असे  सतत स्वतः ला  विकास वेडा  झाला म्हणणे बरोबर नाही.

The pain you feel today is the strength you feel Tomorrow



Always ask yourself what will make you happy over the long term.” 
― Steven RedheadLife Is Simply A Game








Rural Entrepreneurship Development- ग्रामीण उद्योजकता विकास








Wednesday, September 27, 2017

Rural Entrepreneurship Development- ग्रामीण उद्योजकता विकास


ग्रामीण उद्योजकता विकास  - हि काळाची गरज आहे.

डॉ . मिंलिंद  पांडे ह्यांनी ह्या विषयावर Shree Sant Gajanan Maharaj College of Engineering, Shegaon  येथे E-Summit 2017 अंतर्गत Rural Entrepreneurship Development Programme आयोजित केला होता . त्या बद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन .

 IT ( Indian talent -इंडियन टॅलेंट )  ह्यांनी अश्याच प्रकारे ग्रामीण भागात जाऊन ग्रामीण उद्योजकता विकास भारतातिल ग्रामीण भागात तळागाळा पर्येंत पोहचवावा हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.

खानदेशचा शोध घेतांना-Rural Development






Friday, August 4, 2017

Induction for Engineering students




Addressed E&TC first batch student of Sinhagad Engineering College Lonavala. As being E&TC engineer passout of 1984 batch shared my professional life experiences with them and addressed importance of 3s- Science Spirituality and Sustaniability 

The best part of my addressing was when I shared my experience "how I mentored my elder son Harshvardhan to be a SAP Consultant after completion of his graduation in BBM-IB management graduation from MITSOM. " and students and parents clapped ...that was my greatest reward  got from new aspiring engineering students & the parents attending that Induction event. Proud of my son Harshvardhan as well who worked hard to achieve his goals.

And all the Best to all students who started new inning of their career.


Summary points of Induction talk to Students and Parents


  • Keep  an eye on upcoming technologies which are not part of your syllabus but will be in the market when you will start your dream job search. In short keep updated yourself with the current and future technologies.
  • Shared my experience - after completion of my BE  I stayed back in college for 1 month to learn Microprocessor which was not in our syllabus. And College and our HOD Dr. Rao allowed me to use laboratory to learn microprocessor. In short utilize your college resources and faculty knowledge resources.
  • Sense the opportunity and do not miss it-Shared my experience how I grabbed opportunity to learn and write my first program in COBOL by the opportunity provided by ICIM manager Mr. Handa.
  • My younger son Abhishek who is Engineering E-TC student in MIT Kothrud , I told him to keep eye on IoT workshop. And he grabbed the opportunity and participated in one IOT workshop. IIT Powai conducted the IoT workshop and competition under Techradiance, powered by Harbour Technology.  http://sccnhub.com/IoT

  • Grab the opportunities to work on live projects. Build the LinkedIn and Github profile . This will help you to find your dream job.
  • Master the skills of Google search and copy and paste techniques to complete the job.
  • For parents my message -  Frequent communication with your ward is very important. Most of the family problems are solved by healthy communication  between parent and ward.
  • Students should understand and believe that  parents are the most trustworthy reliable source of their life and parent should work to fulfil their wards’ trust.